Marathi Manus

Stay Up to Date With Us

धनु राशी मार्च महिन्यात तुमच्या जीवनात या घटना घडणारच

नमस्कार मंडळी,

धनु हि राशी चक्रातील ९ वि राशी आहे आणि या राशीचा स्वामी आहे गुरु ग्रह. धनु राशीचे वैशिष्ट्य म्हणजे या राशीमध्ये शारीरिक कष्ट करण्याची अमर्याद ताकत आणि तसा बुद्धिमत्ता यांचा अनोखा संगम झालेला असतो. चला तर जाणून घेऊयात मार्च महिना धनु राशीसाठी कसा असणार आहे.

या महिन्यात नात्यांबाबत तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. कारण घरातील सदस्यांच्या कोणत्याही बाबतीत तुम्ही अनावश्यक पणे संवेदनशील वृत्ती वापरू शकता ज्यामुळे नाते संबंधातील अंतर वाढेल. जर तुम्ही खुलेपणाने बोललात तर त्याचे अधिक सकारात्मक परिणाम दिसून येतील.

धनु राशीच्या पालकांपैकी एकाची प्रकृती बिघडू शकते. म्हणून त्यांना बाहेर जाऊ देणे टाळावे. नाते वाईक तुमच्या घरी येऊ शकतात आणि ते काही दिवस तुमच्या घरी मुक्काम सुद्धा करतील. जर तुम्ही काही दिवस तुमच्या मामाच्या घरी गेला नसाल तर तुम्हाला त्यांच्या घरी सुद्धा जावे लागेल.

या महिन्यात तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत थोडा वेळ घालवाल.व्यावसायिकांसाठी हा महिना शुभ नाही.महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये पैशाच्या व्यवहारात सावध राहा कारण कोणीतरी तुमची फसवणूक करू शकते. काळजी न घेतल्यास नुकसान मोठे होऊ शकते. त्यामुळे आधीच थोडे सावध राहा आणि हुशारीने वागा.

नोकरी करणाऱ्या लोकांना जास्त त्रास होणार नाही, पण काही दिवस कामाचा ताण मात्र जाणवेल. तुम्ही तुमच्या नोकरीवर खुश नसाल आणि नोकरी बदलण्याचा विचार करत असाल त्या साठी काही ठिकाणी अर्ज करू शकता. पण तिथून प्रतिसाद न आल्याने मन आणखी निराश होऊ शकते त्याची तयारी ठेवा.

जर तुम्ही पत्रतरिकेच्या क्षेत्रात शिकत असाल तर महिन्यात तुम्हाला काही चांगल्या संधी चालून येतील. याकडे दुर्लक्ष करू नका. अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या प्रकल्प बाबतीत घाबरतील आणि शिक्षक सुद्धा तुमच्या वर नाराज होऊ शकतील आणि म्हणूनच कामे वेळात पूर्ण करा.

शाळेतील विद्यार्थी त्यांच्या प्रशिक्षणात चांगली कामगिरी करतील. घरात सुद्धा त्यांच्या कामाची प्रशंसा होईल. जर तुमचे कोणाशी प्रेम संबंध असले तर या महिन्यात तुम्ही हि गोष्ट घरात शेअर करू शकता. दोघांमधील नाते अधिक मजबूत होईल. अविवाहित लोकांना जीवनसाथी मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.

विवाहित लोक आपल्या जोडीदारासाठी काही तरी नवीन करण्याचा प्रयन्त करतील.समाजात तुमच्या बद्दल सकारात्मक प्रतिमा तयार होईल. पती पत्नीच्या नात्यामध्ये नवीन आयाम प्रस्थापित होईल.तसेच कुटुंबातील सर्व सदस्य हि तुमच्या दोघांवर जास्त आनंदी दिसतील. आरोग्याच्या दृष्टीने ह्या महिन्यात काळजी घेणे आवश्यक आहे.

आणि कोणताही अपघात होऊ शकतो थोडी काळजी घेणे जरुरी आहे. जर तुम्ही दम्याचे रुग्ण असाल तर स्वतःची काळजी घ्या. झोप न येणे , अस्वस्थ राहणे असे वाटेल. मार्च महिन्यात धनु राशीचा भाग्यशाली अंक असेल २ त्यामुळे या अंकाला प्राधान्य द्या आणि तुमचा शुभ रंग असेल नारंगी

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.