Marathi Manus

Stay Up to Date With Us

यशस्वी होण्यासाठी राशीनुसार सोपे ज्योतिषीय उपाय कोणते ? नक्की पहा

नमस्कार मंडळी,

आपला व्यवसाय चांगला चालायला हवा, त्यात तुम्हाला भरपूर नफा मिळायला हवा किंवा नोकरीच्या ठिकाणी यश मिळावे अशी इच्छा सगळ्यांचीच असते. व्यवसायातील चढ उत्तर हा त्याचा महत्वाचा भाग आहे. पण असे प्रसंग येतात तेव्हा सर्व प्रयन्त करून हि त्यांचा व्यवसाय चालताच नाही

व्यवसायात नफ्या ऐवजी तोटाच होत राहतो.  व्यवसायात अपेक्षित नफा मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत, ते तुम्ही नक्कीच करू शकता.

मेष राशीच्या व्यक्तीला व्यवसायात अडचणी येत असतील आणि सर्व प्रयन्त करूनही त्यांना व्यवसायात फायदा होत नसेल तर त्यांनी दीड किलो मसूर लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या दुकानाच्या एखाद्या पवित्र कोपऱ्यामध्ये कार्यालयात ठेवावा. यामुळे नक्कीच तुम्हाला यश मिळू शकेल. असे ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितले आहे.

वृषभ राशीच्या व्यक्तीला सर्व प्रयन्त करूनही व्यवसायात , उद्योग व्यापारात मंदीचा सामना करावा लागत असेल तर त्यावर मात करण्यासाठी कलाशामध्ये गंगा जल किंवा पवित्र नदीचे पाणी त्यावर पांढऱ्या कपड्याने झाकून कामाच्या ठिकाणी तो कलश ठेवा त्यामुळे परिसरात प्रसन्नता निर्माण होईल.व्यवसायात यश मिळवण्यासाठी आणि इच्छित यश मिळवण्यासाठी धनु राशीच्या लोकांनी कोणतेही धार्मिक पुस्तक पिवळ्या कपड्यात गुंडाळून तुमच्या कामाच्या ठिकाणी पूर्व कोपऱ्यात ठेवावे.

कन्या राशीच्या लोकांनी त्यांच्या व्यवसायात अपेक्षित लाभ मिळण्यासाठी एका भांड्यात कपूर भरून दुकानाच्या पूर्व दिशेला ठेवावा. हा उपाय केल्याने कन्या राशीच्या लोकांना व्यवसायात येणारे अडथळे दूर होतात. कर्क राशीच्या व्यक्तीला त्याच्या व्यवसायात आर्थिक अडचणी येत असतील आणि अनेक प्रयन्त करूनही त्यातून मार्ग निघत नसेल तर पाण्याने भरलेल्या डब्यात किंवा भांड्यात चांदीचे नाणे ठेवा .

कुंभ राशीच्या लोकांनी त्यांच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळवण्यासाठी २ खोबऱ्याच्या वाट्यांमध्ये धान्य भरून एक दान करावे आणि दुसरे कार्यालयात ठेवावे.हा उपाय केल्याने चमत्कारिक लाभ पाहायला मिळतात असे म्हंटले जाते. सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात नुकसान होत असेल तर त्यांनी एका वाडग्यामध्ये खडे मीठ भरून पूर्व दिशेला व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावे. जेणेकरून त्यांचा व्यवसाय पूर्व पदावर येईल आणि त्यांना इच्छित लाभ मिळेल.

जर मकर राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर ते टाळण्यासाठी आर्थिक लाभ मिळवण्यासाठी त्यांनी खोबरे तेलामध्ये काळे तीळ टाकावे आणि नारळावर कला धागा बांधावा . दोन्ही वस्तू कामाच्या ठिकाणी पूर्व दिशेला कोपऱ्यात ठेवावा. मिथुन राशीच्या लोकांनी पितळेचे भांडे हिरव्या कपड्यात बांधून पूर्व दिशेला ठेवावे. जेणेकरून व्यवसायात अपेक्षित लाभ होईल.हा उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होतील आणि तुम्हाला मनाप्रमाणे लाभ मिळू शकेल.

तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात नुकसान होत असेल तर त्यांनी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कोणत्याही पांढऱ्या रंगाची मूर्ती तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावी. मंगळ ग्रहाचा प्रभाव असलेल्या वृश्चिक राशीच्या लोकांनी आपल्या व्यवसायात प्रगती साठी आणि इच्छित लाभ मिळवण्यासाठी मधाची कुपी एका लाल कपड्यात गुंडाळून तुमच्या व्यवसायाच्या दक्षिणेकडील कोपऱ्यात ठेवावी.

मीन राशीच्या लोकांनी तुमच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळवण्यासाठी २ खोबऱ्याच्या वाट्यामध्ये धान्य भरून घ्यावे आणि त्यातले एक दान करावे आणि दुसरे व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावे.यामुळे चमत्कारीक लाभ पाहायला मिळतात असे म्हंटले जाते.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.