कोणत्या वारी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे सप्तरंग

नमस्कार मंडळी

आपल्या समोर आज एक आगळा वेगळा विषय आला आहे निसर्गाने अगदी भरभरून दिले आहे पण बऱ्याच वेळी आपल्याला माहीत नसल्याने त्याचे महत्व कळत नाही आठवड्यात सात वार असतात प्रत्येक वराला ग्रहनुसार रंगाची निवड केली आहे व त्या रंगानुसार त्या त्या ग्रहांची सत्ता असते तेच पण आज विश्लेषण करून पाहणार आहे

मानवाचे जीवन कसे रंगेबी रंगी आहे आपण ज्या भाज्या किंवा फळे खातो त्यांचेसुद्धा वेगवेगळे रंग आहे वेगवेगळ्या रंगाची फुले तर मनमोहन जातात विश्वात एकच रंग असता तर कदाचित विश्वात एकच कलर असतो तर आयुष्य कंटाळवाणे झाले असते कोणत्याही कामात उत्साह राहिला नसता परमेश्वराने संपूर्ण सृष्टी रंगीबिरंगी केलेली आहे

आकाशात आपल्याला जे प्रहगोल दिसतात त्यांना देखील विशिष्ट रंग आहे चंद्राचा रंग पांढरा शुभ्र तर मंगळाचा रंग लालसर सकाळी पूर्वेकडे उगवणारे शुक्राचे चांदणे दिसते तेही शुभ्र आणि चमकदार असते गुरु ग्रहाचे तुम्ही निरीक्षण केले या पिवळ्या रंगाच्या छटा दिसतात एकूणच काय तर ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एक विशिष्ट रंग आहे

तसेच त्या ग्रहाचे विशिष्ट कार्यक्षेत्र सुद्धा आहे विशेष वारानुसार त्या विशेष ग्रहाचे कर्तताचे शुभ फळ मिळत असते आणि जीवनात यशही मिळते आता आपण प्रत्येक वारानुसार आणि ग्रहानुसार कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे व त्यानुसार आपल्याला कसे फळ मिळेल ते आपण आज पाहू या

सोमवार पांढर्‍या रंगाचे वस्त्र परिधान करावे या दिवसावर ती चंद्राची सत्ता असते त्यादिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण केल्यास सन्मान प्रसिद्धी शांतता व मातृ सुखाची प्राप्ती होत

मंगळवार या दिवशी लाल रंगाचे वस्त्र धारण करावे यावर मंगळाची सत्ता असते हे रंगाचे वस्त्र धारण केल्यास कार्यक्षमता वाढते उत्साह येतो कामात वेग राहतो

बुधवार या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करावे बुधवार या वारा वरती बुधाची सत्ता असते बुध हा बुध्दीचा कारक ग्रह आहे त्यामुळे या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र धारण केल्यास विद्या व्यापार यात प्रगती होते सुखशांती प्राप्त होते

गुरुवार या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करावे हा गुरु ग्रहाचा वार आहे गुरु म्हणजे ज्ञान प्रसिद्धी आणि धार्मिक आचरण या गोष्टी प्राप्त होतात तसेच संतती सुखही मिळते

शुक्रवार श्वेता किंवा चमत्कार वस्त्र धारण करावे शुक्राची सत्ता या वारा वरती असते शुक्र म्हणजे सौंदर्य कला संपत्ती भौतिक सुखांची प्राप्ती होण्यास यांची मदत होते

शनिवार काळे निळे किंवा करडे वस्त्र या दिवशी धारण करावे या वारावरती शनी ग्रहाची सत्ता असते चिकाटी मेहनत आणि महत्वकांक्षा ठेवून गोष्ट साध्य होते

रविवार या दिवशी लाल तांबडे वस्त्र धारण करावे या वारावर सूर्याची सत्ता असते तेज शक्ती आरोग्य प्राप्त होते व आत्मविश्वास वाढतो हे रंग सातत्याने त्यादिवशी वापरल्यास अनुभव येऊ शकते नक्की आपण अनुभव घेऊन बघा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *