मेष राशीत राहु ग्रह १२ एप्रिलपासून दीड वर्षे ठाण मांडणार या राशीच्या सर्व इच्छा पूर्ण होणार

नमस्कार मंडळी

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने २०२२ हे वर्ष खूपच महत्त्वाचं असून . कारण एप्रिल महिन्यात ग्रहांच्या बऱ्याच उलथापालथ होत आहे. सर्व ग्रहांच्या राशी बदलाच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचं असणार आहे . या वर्षात शनि, राहु, केतु हे तिन्ही ग्रह राशी बदल करत आहेत. शनि अडीच वर्षांनी आणि राहु-केतु दीड वर्षांनी राशी बदलणार .

मात्र या वर्षात सर्वच ग्रहांच्या राशी बदलांची वेळ एकत्र आलेली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा उदय-अस्त होतो. तेव्हा त्याचा सर्व राशींच्या लोकांवर परिणाम होत असतो . हा बदल काही व्यक्तींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असणार आहे . १२ एप्रिल रोजी मायावी ग्रह राहू मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करणार असून .

अशुभ ग्रह राहूला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे १८ महिने लागतात. इतर ग्रहांप्रमाणे राहु ग्रहाचा गोचर सरळ नसून उलट असते . म्हणजेच हा ग्रह नेहमी मागे फिरत असतो . यामुळे ग्रह नेहमी राशीच्या मागील राशीत प्रवेश करतो. राहूचे संक्रमण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचे आहेत .

कारण राहु राजकारण, परदेश प्रवास, शेअर बाजार आणि महामारी यांच्याशी संबंधित असणार आहे . त्यामुळे या संक्रमणाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे . परंतु तीन राशी शेअर व्यवसायात चांगला नफा मिळवू शकतात. चला जाणून घेऊ यात या तीन राशी कोणत्या आहेत.

मिथुन: राहू ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ चांगले असणार . कारण राहु ग्रह तुमच्या अकराव्या भावात प्रवेश करणार आहे . या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हटलं जातं. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकणार आहे . यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होऊ शकतात.

राजकारणात प्रयत्न करणाऱ्यांनाही यावेळी यश मिळू शकते. मिथुन राशीचा अधिपती ग्रह बुध आहे. त्यामुळे मिथुन राशीचे लोक व्यवसायात चांगली कमाई करू शकणार आहे . तसेच शेअर मार्केटमध्येही चांगला नफा मिळणार आहे

कर्क राशी : १२ एप्रिलपासून तुमचा चांगला काळ सुरू होऊ शकणार आहे . कारण राहु ग्रह तुमच्या दशम भावात प्रवेश करणार आहे . या स्थानाला नोकरी आणि करिअरचं स्थान म्हणतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळणार आहे . तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पगारवाढ होणार आहे .

नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे . व्यवसायात एखादी मोठा करार निश्चित होणार आहे . ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर हा काळ अनुकूल असणार आहे .

मीन: राहू ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे . कारण राहु ग्रह तुमच्या दुसऱ्या भावात प्रवेश करणार आहे . या स्थानाला धन आणि वाणीचे घर म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे . तसेच व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे .

यावेळी तुमची शक्ती वाढेल आणि गुप्त शत्रूंचा नाश सुद्धा होईल. जर तुम्ही शेअर्स आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवले तर ते गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *