Marathi Manus

Stay Up to Date With Us

पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवा , तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील..

नमस्कार मंडळी,

श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या या पुत्रदा एकादशी बद्दल पाहुयात तसेच कसे व्रत करायचे ते सुद्धा पाहुयात. एकादशीची तिथी प्रत्येक महिन्यामध्ये २ वेळेला येते. परंतु श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीच्या तिथीचे विशेष महत्व आहे.

श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या या पुत्रदा एकादशी बद्दल पाहुयात तसेच कसे व्रत करायचे ते सुद्धा पाहुयात. एकादशीची तिथी प्रत्येक महिन्यामध्ये २ वेळेला येते. परंतु श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीच्या तिथीचे विशेष महत्व आहे.

श्रावण महिन्यामध्ये एकादशी व्रत केल्याने कोणत्या प्रकारच्या अभिलाषेची सिद्धी होते.कोणत्या प्रकारे हे व्रत केल्याने तुमच्या एकच सहज पूर्ण होऊन जातात. श्रावण महिना व्रत वैकल्य आणि उत्साहाचा महिना आहे.

म्हणजे कृष्ण पक्ष प्रति पदेपासून शुक्ल पक्ष पौर्णिमेपर्यंत प्रत्येक दिवशी कोणते ना कोणते व्रत कोणते ना कोणते पर्व अवश्य असते.श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचे प्रत्येक क्षणाचे विशेष असे महत्व असते.

या महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीला तुमची श्री हरी विष्णूंची पूजा आराधना , उपासना करतो.अशी मान्यता आहे कि श्रावण महिन्यात भगवान श्री हरी विष्णूच्या केलेल्या पूजेमुळे मोठे फळ प्राप्त होते.

श्रावण शुक्ल पक्ष एकादशी तिथी ला पुत्रदा एकादशी व्रत असे सुद्धा म्हंटले जाते.या व्रताचे पौराणिक ग्रंथांमध्ये खूप विशेष महत्व सांगितले गेले आहे. पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने सुख संपत्ती ऐश्वर्य प्रसिद्धी यांच्या बरोबरच आज्ञाधारक , योग्य अशा पुत्राची प्राप्ती होते.

श्रावण शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी हे व्रत केले जाते. या वर्षी हि एकादशी १८ ऑगस्ट बुधवार च्या दिवशी आली आहे. हि पुत्रदा एकादशी वर्षातील २ महिन्यांमध्ये येते. एक असते ती श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये आणि दुसरी असते ती पौष महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये.

पौष महिन्यातील येणाऱ्या एकादशीला सुद्धा पुत्रदा एकादशी असे म्हंटले जाते. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही महादेवाची पूजा करता , आराधना करता. तसेच भगवान श्री हरी विष्णूंचे जर तुम्ही पूजन केले तर त्याचे महत्व खूप असते.

या पुत्रदा एकादशीच्या दिवशी शक्यतो पती आणि पत्नी दोघांनी हे व्रत करावे. विवाहित जोडप्यांची सुयोग्य संतान प्राप्तीसाठी तसेच मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी , मुलांना सौभाग्य प्राप्त होण्यासाठी हे व्रत अवश्य केले पाहिजे.

एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत करा किंवा नका करू या दिवशी तांदळाचे सेवन करू नये. या दिवशी सात्विक भोजन केले जाते. एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णूंची पूजा करताना तुळशीचा वापर अवश्य करावा.

यामुळे मुलांशी निगडित सर्व समस्या समाप्त होतात. संध्याकाळी तुळशीला तुपाचा दिवा लावावा. या उपायामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते . पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना खिरीचा नैवेद्य दाखवावा.

या उपायामुळे तुमच्या मुलांच्या रोजगार संदर्भात समस्या संपून जाऊन आर्थिक उत्पन्नाचे अनेक मार्ग मोकळे होतात. तुमच्ये जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य यांची भरभराट होते.

जर का तुम्ही एखाद्या समस्येमध्ये अडकले असाल व त्यातून कसे बाहेर पडावे हे समझत नसेल तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाला एक तांब्या जल अर्पण करावे आणि सोबत तुपाचा दिवा लावावा.

पुत्रदा एकादशीच्या दिवशी पती पत्नीने सकाळी स्वतःची सर्व कामे आटपून भगवान श्री हरी विष्णूच्या प्रतिमेसमोर बसावे व विधिवत त्यांची पूजा करावी. तसेच या दिवशी पुत्रदा एकादशीच्या महात्म्याचे वाचन करावे.

त्यांनतर भगवान श्री हरी विष्णूच्या तुम्हाला माहित असलेल्या मंत्राचा एक माळ तरी जाप करावा. जर तुम्हाला कोणताच मंत्र माहित नसेल तर तुम्ही या मंत्राचा जप केला तरी चालेल – ओम नमो भागवतेय वासुदेवाय

हे असे काही उपाय या दिवशी केल्याने मुले आज्ञाधारक बनतात , तसेच त्यांच्या मध्ये सकारात्मक बदल दिसून येतात. तर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने अपत्याची प्राप्ती होते.

या पुत्रदा एकादशीच्या अध्यत्मिकतेचे फार महत्व आहे. हे उपाय अगदी मनोभावे अवश्य करून पहा , तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील , घरामध्ये दुःख दरिद्री दूर होऊन सुख समृद्धी येईल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.