नमस्कार मंडळी,
५ डिसेंबर रविवार चा दिवस आणि या दिवशी आलेली आहे देव दिवाळी , हिंदू प्राचीन ग्रंथांनुसार देव दीपावलीच्या दिवशी स्वर्गातून सर्व देवी देवता पृथ्वीवर गंगा नदीवर स्नान करण्यासाठी अवतरतात आणि म्हणूनच शक्य असेल तर या देव दीपावली च्या सकाळी लवकर उठून शक्यतो पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करावे.हे जर शक्य नसेल तर घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगा जल टाकले तरी चालते.
अशी मान्यता आहे कि देव दीपावलीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास किंवा गंगा जल टाकून अंघोळ केल्यास हातून घडलेल्या काळात नकळत गोष्टींचा , पापांचा नाश होतो आणि शेवटी मोक्षाची प्राप्ती होते.या देव दीपावली च्या असे काही छोटे छोटे उपाय असतात कि जे केल्याने तुमच्या जीवनातील अनेक समस्या अनेक अडचणींचा अंत होऊन जीवन सुखी आणि समृद्ध बनते.चला तर जाणून घेऊयात असे कोणते उपाय आहेत जे तुम्ही करू शकता.
दान – तुमच्या आजू बाजूला किंवा घर शेजारी असे काही गरजू लोक असतील तर अशा लोकांना तुमच्या सामर्थ्यावर या देव दीपावली च्या दिवशी कपडे अथवा अन्न किंवा कोणत्याही गरजेच्या वस्तूंचे दान करावे.हे दान करताना निस्वार्थ भावनेने करावे.हे छोटेसे दान तुमच्या जीवनातील अनेक अडी अडचणी , समस्या पासून मुक्ती मिळते.गरजू लोकांना दान केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवन सुखी आणि समाधानी बनते.
देव दीपावली च्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा नक्की लावावा.हा दिवा कसा हि असला तरी चालेल मातीचा किंवा कणकेपासून बनवला तरी चालेल. दिव्यामध्ये जर शक्य असेल तर तूप घाला किंवा तेल सुद्धा चालेल.मात्र या मध्ये जी वात असेल ती लाल रंगाची असावी , म्हणजे पूजेच्या ठिकाणी जो लाल धागा वापरला जातो तो असेल तरी चालेल. त्या दिव्यामध्ये ७ लवंग टाकाव्यात आणि या दिव्यासमोर ११ वेळा ओम र्हीम श्रीमं लक्ष्मी भ्यो नमः जाप करायचा आहे. आणि मुख्य दरवाजाच्या बाजूला तो ठेवायचा आहे.
अशी मान्यता आहे कि या दिवशी असा दिवा प्रज्वलित केल्यास तुमच्या इच्छा, ज्या काही मनोकामना आहेत त्यांची पूर्तता होते. तसेच कोणत्याही महत्वाच्या दिवशी किंवा अशा चांगल्या दिवशी जर तुम्ही कोणत्या मंत्राचा जाप केला तर त्याचे फळ खूप जास्त पटींनी मिळते.ज्या लोकांची भगवान भोलेनाथांवर श्रद्धा आहे अशा लोकांनी ओम नमो शिवाय या महा मंत्राचा जाप या दिवशी करावा, किंवा गायत्री मंत्राचा सुद्धा जाप करू शकता , तसेच तुमच्या कुलदैवताचे स्मरण सुद्धा करू शकता.