नमस्कार मंडळी,
तूळ राशी २०२१ ते २०३५ ,पूर्ण ४ वर्षाची भविष्यवाणी. माणसाच्या आयुष्यातील परिस्तिथी काळानुसार बदलत असते. ज्योतिष नुसार ग्रह नक्षत्रामध्ये रोज काही ना काही बदल होत असतात. यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात सुख आणि दुःखांचा सामना करावा लागतो. या जगात सर्व लोकांचे राशीचीन्ह भिन्न असतात आणि ग्रह नक्षत्रांची बदलती हालचाल देखील सर्व लोकांच्या जीवनावर भिन्न प्रभाव पाडते. ग्रहांच्या शुभ व अशुभ स्थानानुसार माणसाला आयुष्यात फळ मिळते.
चला तर जाणून घेऊयात तूळ राशीला पुढील ४ वर्ष कसे असतील.तूळ राशीसाठी हे ४ वर्ष थोडे त्रासदायक दिसून येत आहे पण प्रत्येक समस्येशी लढण्यासाठी तुम्ही सक्षम आहात. हे पुढील ४ वर्ष तुमच्या साठी आनंद घेऊन येणारे असतील पण आरोग्याच्या बाबतीत काळजीत टाकणारे सुद्धा असतील.आरोग्याकडे तुम्हाला पूर्ण लक्ष द्यावे लागेल. कुटुंबापासून दूर जाण्याचे संकेत आहेत. एखादा मोठा त्रास सुद्धा सहन करावा लागेल.ज्या लोकांना परदेशी जायचे आहे त्यांना चांगले संकेत मिळतील.
नोकरीच्या ठिकाणी बढतीचे योग सुद्धा मिळतील.प्रेम जीवनामध्ये हे वर्ष चांगले असेल, जोडीदाराचे प्रेम मिळेल आणि एकमेकांना समझून घेण्याचा प्रयन्त कराल.विवाह चे योग जमून येण्यासाठी काळ थोडा कठीण आहे. वैवाहिक जीवन खूप चांगले असेल. तूळ राशीचे लोक संबंध जपून ठेवण्यात खूप विश्वास ठेवतात. कोणतेही काम करताना जोडीदाराचा सल्ला हा मोलाचा सल्ला ठरणार आहे. आर्थिक बाबतीत थोडा संघर्ष करावा लागेल पण थोडे धैर्य ठेवा , खूप मोठा लाभ होण्याचे संकेत मिळत आहेत.
तूळ राशीच्या लोकांना सरकार कडून एखादे धन लाभ होण्याची शक्यता आहे. प्रवासामध्ये खूप पैसे खर्च होतील.स्वतःवर विश्वास ठेवून प्रयन्त करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल. नोकरीमध्ये कामाचा ताण असल्यामुळे थोडी निराशा येईल पण अखेर त्याचा चांगला परिणाम मिळेल. या काळात मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. उद्योग व्यापारात साधारण नफा राहील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे जरुरी आहे.
हि राशी अगदी प्रेमळ लोकांवर दया दाखवणारी , त्यांचे दुःख जाणून घेणारी राशी आहे. तूळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे. हि राशी खूप जास्त मेहनती आहे. या राशीच्या लोकांना मित्र मंडळी खूप असतात. सामाजिक कार्यात नेहमी यांचा समावेश असतो. तूळ राशीचे लोक सौन्दर्याची जास्त जोडलेली असतात. कोणत्याही व्यवसायात किंवा कोणत्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतात.उत्तम न्यायाधीश सुद्धा बनू शकतात. हि राशी वायू तत्वाची राशी आहे.
तूळ राशीचे लोक हे बुद्धिमान असतात. ह्या लोकांची कल्पना शक्ती काही वाऱ्यासारखी असते. आपल्यात प्रगत असणाऱ्या कलेमध्ये सुद्धा बुद्धिमत्तेचा खूप छान वापर करतात. तूळ राशीचे चिन्ह हे तराजू आहे. हे लोक खूप छान समतोल साधू शकतात. निर्णय घेण्याची क्षमता खूप चांगली असते. एक खूप छान वृत्ती ह्या लोकांकडे असते कि कोणाकडेही भेदभाव करून पाहत नाही, प्रत्येकाकडे समान वृत्तीने बघतात. कधीही कोणत्याच गोष्टीचा अतिरेक या लोकांकडे नसतो.
प्रेम आणि कर्तव्य यामध्ये सुद्धा खूप छान संतुलन करतात. मनाचा हळवेपणा असतो पण कमकुवत नसतात. प्रेम करतात पण त्याचे पवित्र सुद्धा जपतात. खूप निश्चयी असतात पण कधी हट्ट नसतो. जिद्दीपणा ह्या लोकांमध्ये नसतो. तूळ राशीची स्त्री हि एक आदर्श गृहिणी असू शकते. खूप स्वच्छ आणि निर्मल मनाचे हे लोक असतात. खूप उत्साही असतात पण तसेच ते भोळे हि असतात , ह्या लोकांना पटकन कोणीही फसवू शकते. तूळ राशीचे लोक हे पटकन विश्वास ठेवतात आणि बऱ्याचदा फसवले सुद्धा जातात.