रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ ही प्रार्थना करा

नमस्कार मंडळी

आपण स्वामींना प्रार्थना केली तर स्वामींची कृपा आपल्यावर होईलच कारण आपल्या भावना जे काही आपल्याला सांगायचं असेल ते आपण स्वामींना किंवा अन्य कोणत्या देवांना प्रार्थनेच्या रूपात सांगू शकतो. आज आपण स्वामींच्या अशी प्रार्थना जाणून घेणार आहोत.

ती प्रार्थना तुम्ही झोपण्याच्या आधी स्वामी समोर बसून स्वामींना हात जोडून ती प्रार्थना नक्की एकदा म्हणा आणि मग झोपा ही प्रार्थना अशी काही आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी जवळ एकच प्रार्थना करा हे स्वामी राया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच आहे

जे काही ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा करून घेत आहात त्याच्यामध्ये खंड पडून देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना मी न करण्यासाठी स्वामीराया आळा घाला.

कुणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार सुड भावना ठेवू नका. कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या. आणि येणाऱ्या संकटापासून माझे माझ्या परिवाराचे आणि या घराचे रक्षण करा आणि तुम्ही सतत आमच्या सोबत असेच राहा.

आमच्या पाठीमागे रहा आमचे रक्षण करा आणि आम्हाला सतत तुमचे बोल कानात येऊ द्या की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ही छोटीशी सुंदर अशी स्वामींची प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे जवळ निर्मळ मनाने प्रार्थना करा.

स्वामी तुमच्या मदतीला सदैव धावून येतील. प्रार्थना करून जर झोप आली तर तुमचा दिवस चांगला जाईल निवांत झोप लागेल स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या वर राहील. आणि तुमचे सगळे कामे होतील कोणत्याही कामामध्ये कसलाही अडथळा येणार नाही

स्वामी सदैव तुमच्या बरोबर असतील. ही प्रार्थना नक्की करून पहा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *