जगातील सर्वात शक्तिशाली रोप , कुठे दिसले तर लगेच घरी आणा, बक्कळ पैसा येईल घरी..

नमस्कार मंडळी,

हिंदू पुराणांमध्ये देवी देवता, मनुष्य , प्राणी पशु पक्षी तसेच वनस्पती या सर्वांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.कोणत्या दिवशी काय करावे घरात काय ठेवावे , घरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात, कोणत्या वस्तू घरामध्ये शुभ आहेत किंवा अशुभ आहेत हे सर्व तुम्हाला हिंदू ग्रंथामध्ये भेटेल. वास्तुशास्रानुसार काही झाडे आहेत जी झाडे घरामध्ये लावल्यास देवी लक्ष्मीची कृपा होते व तुम्ही करोडपती होऊ शकतात. अशीच ५ झाडांबद्दल बघुयात, ह्या पैकी एक तरी झाड घरामध्ये असेल तर देवी लक्ष्मीची कृपा होऊन तुमच्यावर धनाचा वर्षाव होईल.

चला तर जाणून घेऊयात कोणती झाडे आहेत ती जशी प्रगती होऊ लागली, नोकरीच्या शोधात किंवा कामानिमित्त बरेच लोक शहरांमध्ये स्थलांतरित होऊ लागली . अशा बऱ्याच कारणांमुळे गावाकडून शहराकडे लोक मोठया प्रमाणात येऊ लागली. पूर्वी भरपूर जागा असल्याने घरांपुढे अंगण असायचे छोटीशी बाग असायची तेव्हा झाडे झुडपे खूप प्रमाणात होती पण नंतर जागा अपुऱ्या पडायला लागल्या , घरे वाढू लागली , मोठ्या प्रमाणात वस्ती वाढू लागली.

घरे छोटी झाली, बागा कमी झाल्या ,मुलांना खेळण्यासाठी मैदान सुद्धा राहिले नाहीत. वास्तुशास्रानुसार घरामध्ये काही ठराविक प्रकारची झाडे हि वास्तूकरिता शुभ मानली जातात. घराला अंगण नसले तरी घरामध्ये किंवा बाल्कनी मध्ये तुम्ही हि झाडे नक्कीच लावू शकता. घरामध्ये तुळशी चे रोप असणे हि भारतामध्ये खूप वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. तुळशी मध्ये अनेक औषधी गुण असून यामुळे घरामध्ये विपत्ती येत नाही असे म्हणतात.

तुळशीचे रोप घराच्या उत्तर , उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला लावावे. बांबू चे रोप सुद्धा घरामध्ये सुख समृद्धी आणते. तसेच या बांबूच्या रोपामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरामध्ये शांतता आणते. हे रोप कोणताही हवेमध्ये चांगले वाढते. बांबूचे रोप हे दीर्घायुषी , सुख समृद्धी आणि उन्नती चे प्रतीक असल्याचे मानले जाते. म्हणून हे रोप घरामध्ये असणे शुभ मानले गेले आहे. हे रोप घरामध्ये कोणत्याही दिशेला लावले तरी चालते. केळीचे रोप सुद्धा घरामध्ये सुख समाधान आणते असे म्हणतात.

या रोपांमध्ये श्री हरी विष्णूंचा वास असतो , यामुळे घरामध्ये कधीच आर्थिक अडचण भासत नाही. घराच्या ईशान्य दिशेला केळीचे रोप लावावे. तुळशी प्रमाणे घरामध्ये हळदीचे रोप सुद्धा अत्यंत शुभ मानले गेले आहे. पूजा विधी मध्ये औषधी म्हणून किंवा सुंदर बनण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर हा खूप जुना उपाय आहे. म्हणून हळदीचे रोप सुद्धा तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता. तसेच आवळ्याचे झाड सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता. आवळ्याचे झाड हे पाप नष्ट करणारे आहे.

आवळ्याचे झाड हे नेहमी पूर्व व उत्तर दिशेला असावे. पारिजातक समुद्र मंथनातून उदय पावला होता त्यामुळे हे झाड घरामध्ये असणे शुभ मानले गेले आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये जास्वंद सुद्धा असणे शुभ मानले गेले आहे. घरामध्ये कोणत्या पण दिशेला जास्वंद लावता येऊ शकते. हिरव्या गर्द झाडांमुळे ऑक्सिजन मिळण्यासोबतच वातावरण देखील शुद्ध होते. घरामध्ये झाडे किंवा रोपटे ह्या मुळे  सकारात्मकता वाढते . वास्तुशास्रामध्ये अशी अनेक झाडे आहेत ज्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते.

झाडांमुळे घराचे वातावरण शुभ राहते आणि सकारात्मक राहते.  हिंदू धरामानुसार सफेद रंगाचे मंदार नावाचे रोपटे सुद्धा शुभ मानले जाते. घराच्या भोवऱ्यामध्ये हे झाड लावल्याने घरात धनाची कमतरता जाणवत नाही. ह्या झाडामुळे लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहते.जोडप्यामध्ये प्रेम वाढते आणि घराला नजर लागत नाही, कोणाची वाईट दृष्ट लागत नाही. अशोकाचे झाड घरामध्ये सकारात्मकता वाढवते .घरातील दोष दूर करण्यासाठी या झाड चा उपयोग होतो.घराच्या उत्तरेकडे हे झाड लावले जाते.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *