गुढीपाडवाची पूजा माहिती आणि वेळ नक्की वाचा

नमस्कार मंडळी

गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या दिवसापासून मराठी वर्षाला प्रारंभ होतो. तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी शुभ कार्यास आरंभ केला जातो. तसेच या दिवसापासून चैत्र नवरात्री उत्सव हीच प्रारंभ होतो आणि हा राव नवमीपर्यंत राहतो.

असे मानले जाते की ब्रम्हदेवाने ह्या दिवशी विश्वाची निर्मीती केली. याच दिवशी वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला श्रीरामाने मुक्त केले. आणि या मुक्त झालेल्या प्रजेने उत्सव साजरा करताना आनंदने गुढ्या उभारल्या होत्या. त्यामुळेच या दिवसाला गुढीपाडवा हे नाव मिळाले. असे मानले जाते की या दिवशी श्रीराम १४ वर्षाचा वनवास भोगून अयोध्येमध्ये परत आले होते.

गुढीपाडव्याच्या दिवशी धारांमध्ये गुढी उभारली जाते ही गोढी प्रवित्र मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या वर्षी गुढीपाडवा हा दोन एप्रिल रोजी आला आहे.हिंदू कालगणनेनुसार सरते वर्षं फाल्गुन मांसाने पूर्णत्वास जाते आणि नवीन वर्षाचा शुभारंभ चैत्र मांसाच्या आगमनाने होतो. या ब्रह्मध्वजाचे या दिवशी पूजन केले जाते.

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे व कशी उभारावी गुढी आणि गुढीचे पूजन कसे करावे? हे आपण जाणून घेणार आहोत. गुढीपाडवा तिथी प्रारंभ होणार आहे एक एप्रिल ११ वाजून ५६ मिनिटाला गुढीपाडवा संपणार आहे. २ एप्रिल सकाळी११ वाजून ५८ मिनिटाला. आणि गुढी ही आपण २ एप्रिल रोजी सकाळी सूर्योदयानंतर उभारायची आहे.

गुढी उभारण्यासाठी असणारा शुभ वेळ म्हणजे ८ वाजून २९ मिनिट पर्यंत वेळ अत्यंत शुभ वेळ आहे. आणि गुढी ही संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आधी खाली उतरायचे आहे. गुढी उभारण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे वेळूची काठी, उटणं, सुगंधीत तेल, हळद-कुंकू, अष्टगंध, अक्षदा आणि केशरी रंगाचा मोठ वस्त्र, कडुलिंबाचा पाला

आणि चाफ्याची फुलं, साखरेची माळ, तांब्याचा कलश, दोरा, पाट रांगोळी, आंब्याचे तोरण, निरंजन, सुपारी कडुनिंबाचा प्रसाद होय. हे सर्व साहित्य गुढी उभारण्यासाठी गरजेचा असतं.गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे, उटणे आणि सुगंधी तेल लावून अभ्यंगस्नान करावे. दरवाजाला तोरण बांधावे.

गुढी ही नेहमी दरवाजाच्या उजव्या बाजूस उभारावी. गुढी उभारण्याच्या ठिकाणी पाठ ठेवायचं आहे. पाटावर रांगोळी काढून मध्यभागी स्वस्तिक काढावे. त्यावर हळदी-कुंकू वाहून त्याचे पूजन करायचं आहे. त्यानंतर सर्वात पहिले श्री गणेशाचे पूजन करायचे आहे. एक बांबूची काठी घेऊन ती बांबूची काठी पूर्णपणे पाण्याने स्वच्छ करायचे आहे.

त्यानंतर काठी वरती केशरी रंगाचे किंवा कुंकवाचे पट्टी ओढायचे आहे.काठीचा एका टोकाला केशरी वस्त्र बांधावे. कलशाला पाच गंधांचे पट्टे ओढावे आणि गजरा बांधावा. मग यानंतर कलश उलटा ठेवावा आणि काठीला आंब्याची डहाळी लिंबाचा पाला बांधावा.चाफ्याच्या फुलांची माळ घालावी.

गुढीला साखरेच्या गाठींची आणि फुलांचा हार सुद्धा घालावा. गुढी उभारल्यानंतर ” हे ब्रह्म ध्वज माझा तुला नमस्कार असो” अशी प्रार्थना करावी.गुढीची ओम ब्रह्मध्वजय नमः म्हणून पूजा करावी व कडुलिंबाचा किंवा गुळाचा प्रसाद दाखवावा. त्या दिवशी पंचांग पूजनाचे सुद्धा महत्त्व आहे

त्यामुळे नवीन पंचांग आणला असेल तर त्याचे पूजन करावे. हा कडुनिंबाचा प्रसाद तयार करण्याचे साहित्य म्हणजे, कडुलिंबा ची पाने, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग मिश्रणाने कडुनिंबाचा प्रसाद करावा. त्यादिवशी थोरामोठ्यांचा आशीर्वाद सुद्धा घ्यायचे आहेत. दुपारी आपण घरी जे काही जेवायला केले आहे.

त्याचा नैवेद्य गुढीला दाखवावा. गुढी उभारल्यानंतर ” हे ब्रह्म ध्वज माझा तुला नमस्कार असो” अशी प्रार्थना करावी. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल आणि कल्याण होउ दे. सायंकाळी गुढीला खोबऱ्याचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवून सुर्यास्ताच्या आधी ती खाली उतरायचे आहे.

अशाप्रकारे गुढीपाडवा हा मांगले समृद्धीचे प्रवित्र जपणारा सण आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडवा हा सर्व कुटुंब आणि आनंदाने साजरा करावा.गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *