नमस्कार मंडळी
आज जो उपाय सांगणार आहोत त्याने तुमच्या जन्म लग्न कुंडलीतील कालसर्प दोष निघून जाईल जन्म लग्न कुंडली मध्ये सूर्य चंद्र तसेच गुरु ग्रहा बरोबर राहू ग्रह असण्यालाही कालसर्प दोष मानला गेले आहे तसेच जेव्हा राहू आणि केतू हे एकमेकांपासून 180 कोनात असतात आणि बाकीचे ग्रह ह्या दोघांच्या मध्ये असतात
त्याला हि कालसर्प दोष म्हटले जाते कालसर्प योग हे एकूण 12 प्रकारचे असतात ते कुंडलीतील ग्रहांच्या वेगवेगळ्या स्थितीवर आधारित असतात तर आता जाणून घेऊया हे कालसर्पयोग कोणते कोणते आहे
१- अनंत कालसर्प योग , २- कुलिक कालसर्प योग , ३- वासुकी कालसर्प योग , ४ -शंखपाल कालसर्प योग ,५- पद्म कालसर्प योग , ६ -महापद्म कालसर्प योग ७- तक्षक कालसर्प योग , ८ – कर्कोटक कालसर्प योग , ९ – शंखचूड काल सर्प योग, १०- घातक कालसर्प योग ११ – विषधारा कालसर्पयोग , १२ – शेषनाग कालसर्प दोष तर मग चला आता जाणून घेऊ.
ज्या कालसर्प योगा पासून मुक्ती मिळवण्याचे उपाय कालसर्प योगाने पीडित असलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप नकारात्मकता येते. अशी व्यक्ती मानसिक रित्या खूप अशांत असते त्याच्या प्रत्येक कामात काही ना काही कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे अडथळे येत असतात प्रत्येक कार्याला विनाकारण विलंब होत असतो
मनामध्ये अकारण चिंता लागून राहते. अशा व्यक्तींमध्ये आत्मसन्मानाची कमी असते तसेच मानसन्मान ही अशा व्यक्तीला कमी मिळतो परिवारामध्ये सतत वाद चालू राहतात कोणतेही कार्य करण्यास घेतल्यास परिवाराकडून हवे तसे समर्थन मिळत नाही. व्यवसायात नेहमी नुकसान होते किंवा बेरोजगारी राहते संपत्ती आणि धनाची हानी होते लग्न होण्यास विलंब होतो एकलकोंडी पणाची भावना वाढीस लागते.
तर चला आता जाणून घेऊया एक महा उपाय
ज्यायोगे कोणत्याही प्रकारच्या कालसर्पयोगापासून तुम्ही स्वतःची सुटका करून घेऊ शकता जाणून घेऊया नक्की करायचे काय आहे तुम्हाला हा उपाय कोणत्याही सोमवारपासून करायचा आहे आणि जर हा उपाय श्रावणी सोमवारी केलात तर ह्याचे त्वरित फळ प्राप्त होते सोमवारी लवकर उठून आपल्या नित्य कर्मातून मुक्त होऊन
आपल्याला एक पिंपळाचे पान घरी घेऊन यायचे आहे हे पान कुठेही तुटलेले किंवा फाटलेले असू नये.घरी आणल्यानंतर ते पिंपळाचे पान स्वच्छ पाण्याने धुऊन पुसून घ्यायचे आहे त्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी विभूती किंवा अंगारा घेऊन त्यामध्ये थोडे पाणी मिसळून त्याचा आपल्याला एक घोळ तयार करायचा आहे
आणि त्याचे लेपन पानाच्या वरच्या बाजूने म्हणजे जो भाग गुळगुळीत आणि चमकदार आहे त्याभागावर करायचे आहे पूर्ण पान विभूतीने लेपन करायचे आहे व थोडावेळ तसेच ठेवून अर्धवट सुकवायचे आहे.अर्धवट सुकल्यानंतर ह्या पानावर एक मंत्र लिहायचा आहे हा मंत्र आपल्याला उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लिहायचा आहे
मंत्र आहे ओम रां राहवे नमः मंत्र लिहून झाल्यावर हे पान मंत्र आतल्या बाजूला जाईल असा गुंडाळायचा आहे व ह्यांनंन्तर त्याला काळ्या धाग्याने बांधायचे आहे अश्या प्रकारे पानाची गुंडाळी करून झाल्यावर त्याला आपल्या देवघरात किंवा एखाद्या पाटावर ठेवावे व त्याला धूप दीप दाखवावा. व ओम रां राहवे नमः ह्या मंत्राचा यथा शक्ती जप करावा
जप करून झल्यावर हे पान घेऊन आपल्याला जवळच्या शिव मंदिरात जायचे आहे व हे पान शिवलिंगावर मंत्र जप करत अर्पण करायच आहे आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे कि आपण माझ्या आयुष्यतील सर्व प्रकारचे कालसर्प दोष समूळ नष्ट करावे माझी सगळी संकटं सगळे त्रास समूळ नष्ट करावे
ह्या उपायाने कोणताही खर्च न करता आपल्या आयुष्यातील कालसर्प दोषाची शांती होईल