परिवर्तिनी एकादशी १६ किंवा १७ सप्टेंबर जाणून घ्या अचूक तारिक करा हे एक काम माता लक्ष्मी धावत येईल

नमस्कार मंडळी ,

श्री स्वामी समर्थ ,

हिंदू धर्मामध्ये एकादशीचे विशेष महत्त्व आहे एकादशी तिथी भगवान विष्णूना समर्पित आहे शास्त्रानुसार या तिथीला भगवान विष्णूंच्या चातुर्मासाच्या झोपेच्या वेळी भगवान विष्णू आपली बाजू बदलतात म्हणजेच भगवान विष्णूच्या झोपलेल्या अवस्थेत बदल होतो

म्हणून ह्या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे म्हटले जाते परिवर्तिनी एकादशी ची तिथी गुरुवार १६ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटं पासून सुरू होते आणि १७ सप्टेंबर च्या सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीला संसाजारे करण्याच्या श्रद्धेमळे १७ सप्टेंबर शुक्रवारी एकादशीचा उपवास ठेवला जाईल

परिवर्तन एकादशीला सर्व दुःखांपासून मुक्ती देणारी एकादशी असे मानले जाते तसेच हे व्रत केल्याने वाजपेय यज्ञ केल्याच फळ प्राप्त होते या दिवशी भगवान श्री कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान सौच मधून निवृत्त झाल्यानंतर श्री विष्णूची पूजा करावी भगवान विष्णूंना फुले नारळ सुपारी लवंग कपूर दिवा पंचामृत आणि तुळशीदल इत्यादी अर्पण करावे

तसेच नैवेद्य दाखवावा आणि नैवेद्य दाखवत असताना त्यामध्ये तुळशीचा समावेश अवश्‍य करा असे मानले जाते की तुलसी शिवाय भगवान प्रसाद स्वीकार करत नाहीत तसेच मित्रांनो घरामध्ये सुख-समृद्धी आणि धनसंपत्ती यावी यासाठी भगवान विष्णू सोबतच या पवित्र दिवशी लक्ष्मीची पूजा करा यामुळे तुमच्या घरातील आर्थिक अडचणी असतील पैशासंबंधी काही प्रॉब्लेम असतील तर ते देखील दूर होतील

घरांमध्ये अनेक मार्गांनी पैसे येऊ लागेल भगवान विष्णू व महालक्ष्मी च्या कृपेने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदेल तर मित्रांनो तुम्ही देखील हे एकादशीचे व्रत करा आणि आपल्या आर्थिक समस्या पासून सुटका मिळवा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *