मार्गशीर्ष महिन्यात देवीची ओटी कधी व कशी भरावी नक्की जाणून घ्या

नमस्कार मंडळी ,

मित्रानो मार्गशीर्ष महिन्यात देवीची ओटी कधी आणि कशी भरावी नक्की जाणून घ्या कारण हा महिना देवीचा महालक्ष्मी मातेचा महिना मानला जातो असे मानले जाते की या महिन्यात लक्ष्मीच्या आराधनें आणि लक्ष्मी कृपा प्राप्त केले तर लक्ष्मी प्रसन्न होते म्हणून आपण या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची ओटी अवश्य आपण भरायला पाहिजे मित्रानो लक्ष्मीची ओटी भरण्यासाठी खास दिवस असतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे गुरुवारचे दिवस तास तर हा मार्गशीर्ष महिना ५ डिसेंबर पासून सुरू झाला आहे

५ डिसेंबर पासून महिना सुरू झाला आहे पहिला जो गुरुवार येत आहे तो ९ डिसेंबर च्या दिवशी पहिला गुरुवार येत आहे या नंतर ३ किंवा ४ गुरुवार असे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतात तर तुम्ही पहिल्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी तिसऱ्या चौथ्या तुम्हाला ज्या गुरुवारी वेळ मिळेल त्या गुरुवारी तुम्ही लक्ष्मीची ओटी तुमच्या घरातच भरायची आहे खास करून विवाहित महिलांनीच भरायची असते अविवाहित लोकांनी ओटी भरायची नसते तुम्ही कोणत्याही गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात ही ओटी भरू शकता सकाळी भरा संदयाकली भरा कोणत्याही वेळेस भरू शकता

ह्या ओटी मध्ये तुम्ही ब्लाउज पीस ठेऊ शकता किंवा नवीन कोरी साडी आणून ठेऊ शकता त्यानंतर नारळ आणून नारळ ठेऊ शकता ओटी भरण्याची सोपी पद्धत असते सगळ्यात आधी पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मीची मूर्ती लाल कापड टाकून स्थापन करायची लक्ष्मीच्या पाटावर काधिही सफेद कापड टाकू नये लाल रंगाचे कापड टाकावे त्यानंतर तो फोटो किंवा मूर्ती स्थापन करावी त्यानंतर साडी ब्लाउज पीस असेल तुम्ही ते पाटाच्या समोर ठेवायचे आहे साडी असेल तर साडी ठेव्हा त्यानंतर तुम्ही ५ ते ७ मुठ तांदूळ किंवा गव्हाचे त्या ओटी मध्ये टाकायचे आहे

जस तुम्ही इतर ओटी भरतात तस ते टाकल्या नंतर एक नारळ ठेवायचे त्यानंतर ११ रुपये किंवा २१ रुपये ठेवायचे तुम्हाला जो सौभाग्यच श्रुंगारचा सामान असतो तोही तुम्ही ठेऊ शकता काही लोक ठेव्हतात काही लोक नाही ठेव्हत तुम्हाला ठेव्हायचे असेल ठेऊ शकता किंवा नसेल ठेवायचे तर नका ठेऊ किंवा एखादे फळ केळी पण आणून ठेऊ शकता आशा रीतीने घरच्या घरी ती ओटी तुम्ही भरू शकता आणि जर गुरुवारी ओटी भरली तर ती ओटी रात्र भर तिथेच राहून द्याची देवी समोर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या नंतर पूजाची आवरा आवर केल्या नंतर ती ओटी तुम्ही तिथून उचलायची आहे

त्या ओटीतला नारळ तसाच ठेव्हायचा तो खायचा नाही तो कोणाला तरी दान करायचा किंवा कोणाला तरी देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यात सोडू शकता जे तांदूळ आणि गहू टाकले आहे ते तुम्ही गाईला खायला घालू शकता किंवा कोणत्या गरिबाला दान करू शकता आणि जी साडी ब्लाउज पीस असेल ते तुम्ही ज्या महिलांची ओटी भरली आहे त्या महिलेने वापरात घेतले तरी चालेल दक्षिणा सांभाळून कुठेतरी ठेऊन द्याचे त्या दक्षणाच्या नंतर तुम्ही देवासाठी काहीतरी समान विकत घेऊ शकता आशा रीतीने तुम्ही ती ओटी वापरू शकता आणि बाकी सगळे समान दान करायचे आहे

मित्रानो नक्की तुम्ही मार्गशीर्ष महिना देवीचा महिना महालक्ष्मी चा महिना मानला जातो म्हणून कोणत्याही गुरुवारी देवीची ओटी अवश्य भरा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *