नमस्कार मंडळी,
नशिबाचे खेळ फार निराळे असतात. कधी राजाला रंक तर रंकाला राजा बनवतात. जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता प्राप्त होते तेव्हा जीवनाला सकारात्मक कलाटणी मिळण्यास वेळ लागत नाही. ज्योतिषानुसार बदलती ग्रह दशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते.
ग्रह दशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा जीवनात सर्व काही शुभ घडण्यास सुरुवात होते. विजयादशमी पासून असाच काहीसा सुंदर काळ या ५ राशींच्या जीवनात येणार असून या दिवसापासून यांच्या जीवनात विजयाचे दिवस येणार आहे. जीवनातील अपयशाचे दिवस संपणार असून यश प्राप्तीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.
कामात येणारे अपयश आणि मानसिक ताण तणाव जीवनात असणारी उदासी आता दूर होणार आहे. भविष्याविषयी तुमच्या मनात असणारी भीती आता दूर होणार असून तुमच्या आत्मविश्वासात वाढ होण्याचे संकेत आहेत.विजयादशमी म्हणजे दसरा. दसरा हा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो.अश्विन महिन्यातील दशमी तिथीला हा सण साजरा होत असून या वर्षी दिनांक १५ ऑक्टोबर रोजी हा सण साजरा होणार आहे.
मान्यता आहे कि या दिवशी भगवान श्री रामाने अहंकारी रावणाचा वाढ केला. असत्यावर सत्याचा विजय झाला म्हणून हा दिवस साजरा केला जातो.वाईट कर्माचे फळ हे नेहमी वाईट च असते. असा संदेश ह्या सणातून मिळतो. म्हणून व्यक्तीने नेहमी चांगले कर्म केले पाहिजे.दिनांक १५ ऑक्टोबर शुक्रवार रोजी हा सण साजरा होणार आहे.पंचांगानुसार या दिवशी चंद्र आणि गुरु अशी युती होत असून विजयादशमी पासून पुढे येणार काळ या ५ राशीसाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.
मेष – या दिवसापासून मेष राशीच्या जीवनात विजयाचे दिवस सुरु होणार आहेत.इथून पुढे येणारा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. इथून येणाऱ्या पुढच्या काळात ग्रह नक्षत्रात होणारे बदल तुमच्या राशीसाठी लाभकारी ठरणार आहेत. हाती घेतलेल्या प्रत्येक कामना यश प्राप्त होणार आहे.प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवा व्यवसाय उभारण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. तुमची आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा आणखी मजबूत बनेल.
वृषभ- या राशींच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. विजयादशमी पासून यश प्राप्तीचे संकेत निर्माण होणार आहे. मागील काळात अडलेली कामे या काळात पूर्ण होतील.नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे.वैवाहिक सुख शांतीची प्राप्ती होणार असून आर्थिक चिंता दूर होणार आहे.आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
कन्या- विजयादशमी पासून पुढील काळात ग्रह नक्षत्राची अनुकूल परिस्तिथी असणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण होणार असून राजकीय व्यक्तीचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे.या काळात तुम्हाला धन लाभाचे योग जुळून येणार असून व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात कमाईचे अनेक मार्ग मोकळे होतील.कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस येणार आहेत.
तुला- १७ ऑक्टोबर तुमच्या राशीत होणारे सूर्याचे आगमन तुमच्या राशीचा भाग्योदय घडून आणण्याचे संकेत आहेत. या काळात सूर्याच्या कृपेने तुमच्या मान सन्मान आणि पद प्रतिष्टेमध्ये वाढ दिसून येईल.कार्यक्षेत्रातून धनलाभ होण्याचे संकेत आहेत.एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती तुम्हाला स्वतःमध्ये होणार आहे.
कुंभ- या राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहेत.कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.राजकीय क्षेत्रात मान सन्मान आणि प्रसिद्धीमध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापारात सुरु केलेल्या योजना लाभकारी असणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येतील.