सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी दर गुरुवारी अशी करा केळीच्या झाडाची पूजा

नमस्कार मंडळी

गुरुवार हा अतिशय मुख्य आणि पवित्र आणि मुख्य दिवस असतो या दिवशी आपण आपल्या गुरुची सेवा करत असतो आणि गुरुवारी विष्णूची सेवा देखील केली जाते आणि म्हणूनच गुरुवारी आपण जे केळीचे झाड असत त्याची आपण पूजा करायची ते पूजा का करावी आणि ती पूजा कशी करावी यावर आपण माहिती घेणार आहोत

केळीचे जे झाड असत त्या केळीच्या झाडात विष्णूचा वास असतो त्याच बरोबर गुरूचा पण वास असतो तसच बृहस्पती देवाचाही वास ही केळीच्या झाडात असतो म्हणून आपण तुमचा गुरू ग्रह कमजोर असेल जे काही गुरुच पाठबळ असे आपण बोलत असतो त्या वेळेला आपण गुरुची सेवा करायची आहे

त्याच बरोबर आपण केळीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे घरात अनेक अडचणी येत असतील अनेक संकटे येत असतील किंवा वैवाहिक जीवनामध्ये समस्या निर्माण होत असतील विशेष करून ज्यां वैवाहिक समस्या असतील पती पत्नीच पटत नसेल वारंवार वाद विवाद होत असतील तर किंवा त्या गोष्टी अगदी घटस्फोट परेत जात असतील

त्यासाठी तुम्ही अतिशय लहान सहन उपाय आहे ते करून पहा त्याची तुम्हाला नक्की चांगले अनुभव मिळतील जर आपण केळीच्या झाडाची पूजा केली त्याची चागली सेवा केली तर वैवाहिक समस्या असेल त्याच तर निराकरण होतच असत त्याच बरोबर संतान प्राप्ती मध्ये अडथळे येत असतील किंवा काहींच्या अनेक अडचणी असतील मुलांच्या बाबतीत तेही या पद्धतीने सेवा करू शकता

ज्याच्या घरात आर्थिक समस्या असतील किंवा वैवाहिक जीवनातील समस्या असतील तरी देखील तुम्ही अगदी सर्व प्रभावी असा उपाय आहे नक्कीच करून पाहा तर ही जी सेवा आहे ती कोणी आणि केव्हा करावी तर पहा केळीच्या झाडाची पूजा तुम्ही प्रत्येक गुरुवारी करायची आहे आणि रोज करू शकत असेल तर या पेक्षा चंगल काही असू शकत नाही

जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक दिवशी केळीच्या झाडाची पूजा करायची आहे आणि ही पूजा कोणीही करू शकता अगदी लहानांपासून मोठ्या परेत विवाहित असेल किंवा अविवाहित असेल आणि ज्यांना विवाह जमण्यास अडचणी येत असेल तरी सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता

तर सेवा कशी करावी हे पहा प्रत्येक गुरुवारी सकाळी पहाटे उठून म्हणजे जी नित्य पने देवपूजा असते तेव्हा जरी केलं तरी चालेल आणि जे उपवास करतात त्यांनी तर करायची आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे केळीचे झाड असेल त्या ठिकाणी रोज तुम्ही गाईचे दूध असते ते अर्पण करायचं आहे पण हे दूध कच असायला हवं त्याच बरोबर जल पण अर्पण करायचं आहे

आणि अर्पण करत असताना त्यात हळद टाकायची आहे पण ही हळद चिमूटभर घ्याची आहे आणि ती पाण्यात मिसलायची आहे आणि त्याच बरोबर केळीच्या झाडाला हळद लावून पूजा करायची आहे त्याच बरोबर पिवळ्या रंगाचे पुष्प अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी नैवद्य अर्पण करायचं आहे

पण नैवेद्य पण पिवळ्या रंगाचा असायला हवा आहे नैवेद्य मध्ये गूळ आणि चना डाळ असते ती अर्पण करायची आहे आणि त्याच बरोबर त्या केळीच्या झाडाला मनोभावे नमस्कार करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावायचं आहे धूप दीप त्या ठिकणी ओवालायच आहे त्याच बरोबर त्या केळीच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहे

ज्या प्रदक्षिणा करणार आहे त्या सात किंवा अकरा करायच्या आहे आणि प्रदक्षिणा करताना ओम नमो भागवते वासू देवाय नमः या मंत्राचा जप करता प्रदक्षिण करायची आहे प्रदक्षिणा ह्या नेहमी विषम संकेतच करायच्या आहे त्याच बरोबर या दिवशी पूजा करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आशा पद्धतीने केळीच्या झाडाची पूजा तुम्हाला करायची आहे

जर तुम्हला त्या केळीच्या झाडाखाली बसायला जमत असेल तर त्या ठिकाणी बसायला सुद्धा पिवळ्या रंगाच कपडा घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला विष्णू नामस्रोत्र चा एक पाट करकायचा आहे आणि सांगितल्या प्रमाणे मंत्र ही बोलायचं आहे कमीत कमी एक माळ तरी जाप करायचा आहे

आशा पद्धतीने तुम्ही नक्कीच सेवा करू शकता ही सेवा तुम्ही रोज केली तरी चालेल आणि गुरुवारी केली तरी चालेल आणि गुरुवारी पूजा केल्यास आपला गुरु ग्रह मजबूत होण्यास मदत होते त्यामुळे आपल्या जीवनात सुख शांती सदैव राहते आशा प्रकारे ही साधी सेवा आहे आणि ती तुम्ही नक्की करा लवकरात लवकर तुम्हला या उपायांचा प्रभाव जाणवेल

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *