नमस्कार मंडळी,
सनातन परंपरेत जीवनातील संकटे दूर करुन सुख प्राप्तीसाठी केलेल्या दान हे अत्यंत प्रभावी लवकर फळ देणारा मानला जात. दान केल्याने मनोकामना पूर्ण होतातच. पण याशिवाय पुण्य फळाची प्राप्ती देखील होते. नवग्रहांची संबंधित सर्व दोष आणि पापांपासून मुक्ती होण्यासाठी दान हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे.
कोणत्या ग्रहाचा त्रास दूर करण्यासाठी काय दान करायचे आहे. या बाबत ज्योतिष शास्त्रामध्ये सविस्तर सांगण्यात आला आहे. चला तर मग त्या बद्दल माहिती जाणून घ्याव्यात. जोतिषशास्त्रांमध्ये सूर्यदेवाला ग्रहांचा राजा मानला जात. कुंडलीत सूर्य देवा कडून शुभ फळं मिळण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित सर्व दोष दूर करण्यासाठी रविवारी गहू, तांबे, सोने ,गुळ ,तूप, यांचे दान करावे असे सांगण्यात येते.
ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारक आहे. अशा स्थितीत कुंडलीतील चंद्रग्रहण बलवान होण्यासाठी आणि त्याचे सर्व दोन्ही दूर करण्यासाठी तांदूळ, साखर, पांढरे, वस्त्र, चांदी, आणि पांढऱ्या वस्तूंचे सोमवारी दान करावे. असे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ग्रहांचा सेनापति मानला जातो.
कुंडलीतील पृथ्वी पुत्र मंगळ ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी आणि त्याचे शुभं फळं मिळवण्यासाठी मंगळवारी गहू, मसूर, लाल वस्त्र, गुळचे दान करावे. असं म्हंटलं जातं बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. बुद्धीचा कारक बुध ग्रह याच्याशी संबंधित दूर करण्यासाठी आणि त्याची शुभ फळ प्राप्त करण्यासाठी बुधवारी मूग, हिरव्या रंगाचे कपडे ,कापूर, इत्यादींचे दान करावे.
असे सांगितले जाते. आता वळूया गुरु ग्रहाकडे ज्योतिषशास्त्रमध्ये देवगुरु बृहस्पती ला सौभाग्याचा कारक मानला जातो. अशा स्थितीत गुरुशी संबंधित त्रास दूर करण्यासाठी आणि त्याचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी हरभरा डाळ पिवळा रंग पिवळी हळद पिवळी मिठाई आणि शक्य असल्यास सोन्याचे दान करावे.
असे म्हटले जाते कुंडलीतील शुक्राची संबंधित त्रास दूर करण्यासाठी आणि त्याचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी चांदी, तांदूळ, दूध, आत्तर, या गोष्टींचे दान करावे. शनी ग्रहाची संबंधित त्रास दूर करण्यासाठी त्याचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी शनिवारी तिळाचं तेल, तीळ, काळे कपडे, काळी घोंगडी या वस्तूचे दान केले जाते.
राहू जर तुमच्या जीवनामध्ये अडथळा आणत असेल तर शनिवारी निळ्या रंगाचे कपडे, मोहरी,उडीद डाळ, इत्यादींचे कपडे ज्या मुळे होणारा त्रास दूर होईल.केतुचा त्रास दूर करण्यासाठी तीळ आणि लोकरीचे कपडे दान करा आणि शुभ परिणाम प्राप्त करा. सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे रोज तुम्ही नवग्रह स्तोत्राचा पाठ केल्यास नवग्रहांच्या सर्वच दोषांपासून मुक्ती मिळते. आणि आयुष्यात आनंद येतो.