नमस्कार मंडळी
मे महिन्याची सुरुवात तूळ राशीसाठी विशेष लाभदायी असणार आहे, या काळात बनत असलेली ग्रह दशा , ग्रहांची होणारी राशांतरे , ग्रह युत्या आणि एकूणच ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्तिथीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव तूळ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
१ मे पासून पुढे येणारा काळ तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. या काळात अक्षय तृतीय येणार आहे. दिनांक ३ मे रोजी अक्षय तृतीय येणार असून ४ मे पासून तुमच्या जीवनात खऱ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही राबवलेल्या योजना सफल ठरणार आहेत. मानसिक सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे.
मागील अनेक दिवसापासून तुमच्या जीवनात चालू असणारा मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे. प्रेम आपुलकी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. तिरस्काराचे रूपांतर प्रेमामध्ये होणार आहे. तुमच्या मानसिक सुख शांतीमध्ये वाढ दिसून येईल. पारिवारिक समस्या आता समाप्त होतील.
परिवारामध्ये भाऊ बंधकीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. मैत्रीचे नाते देखील अधिक मजबूत बनणार आहे सामाजिक क्षेत्रात सहभाग घेणार आहात , अथवा सामाजिक कार्यात सफल होणार आहेत. नोकरीत तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. धार्मिक कार्यात सुद्धा सहभाग घेणार आहात.
एखाद्या अध्यात्मिक गुरुची भेट सुद्धा तुम्हाला या काळात होऊ शकते. अध्यात्माची आवड तुम्हाला निर्माण होणार आहे. घरात एखादे धार्मिक किंवा मंगल कार्य घडून येण्याचे संकेत आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. अनेक दिवसापासून तुमच्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होण्याचे संकेत असून आर्थिक आवक समाधान कारक असेल.
ज्या क्षेत्रात तुम्ही मेहनत घ्याल त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे. काळ अतिशय अनुकूल आणि शुभदायी ठरणार आहे. करिअर आणि कार्यक्षेत्रात मोठया प्रगतीच्या संधी चालून येतील. सोबतच नोकरीमध्ये सुद्धा बढतीचे योग येणार आहे. या काळात तुम्हाला अतिशय सावध राहण्याची आवश्यकता आहे
कारण या काळात तुम्हाला चुकीच्या कामांपासून दूर राहणे गरजेचे आहे. कोणत्याही मोहाला बळी पासून चुकीची कामे करू नका. नात्यातील लोकांना ओळखून त्यांच्या सोबत तशाच प्रकारचे संबंध ठेवणे शुभ फलदायी ठरू शकते. वैवाहिक जीवनात पती पत्नीमध्ये प्रेमात वाढ होणार आहे. जीवनातील जोडीदाराची भरपूर मदत तुम्हाला या काळात होणार आहे.
प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार आहेत. जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. हा काळ तुमच्या साठी सर्वच दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. अचानक धन लाभाचे योग जमून येऊ शकतात. कार्यक्षेत्रात चांगली प्रगती घडून येणार आहे. आता इथून पुढे नशिबाला नवीन कलाटणी प्राप्त होणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.