नमस्कार मंडळी,
आजकाल सर्वानाच असे वाटते कि आपण श्रीमंत असावे, पैसा असावा .आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी . पण त्यासाठी काही लक्ष्मी प्राप्तीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. काही असे नियम आहेत ज्यांचा नेहमी फायदाच होईल, तुमच्या पैशामध्ये सतत वाढ होईल.
चला तर जाणून घेऊयात असे काय आहे , जर तुम्ही सकाळी जो कोणता पहिला व्यवहार करत असाल तर त्या व्यवहारामध्ये कोणते हि नाणे म्हणजेच सिक्का मग तो १ किंवा २ किंवा जास्त रुपयांचा असेल तर तो कधीच खर्च करू नका.
ज्या ज्या वेळी तुम्ही दिवसाच्या पहिल्याच व्यवहारामध्ये सिक्का म्हणजेच नाणे खर्च करत असाल तर पैसे लगेच खर्च होऊन संपून जातात.दुसरा एक नियम म्हणजे तुम्ही तुमच्या घरात किंवा सोबत नेहमी कोणता ना कोणता सिक्का अवश्य ठेवा आणि हा सिक्का आपल्याच खिशामध्ये राहील याची काळजी घ्या तो खर्च होणार नाही हे बघा
हा उपाय खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही. विनाकारण जे खर्च होतात ते होत नाही आणि पैशांमध्ये वाढ होते.आता एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय बघुयात ज्याने तुम्हाला काही दिवसातच जाणवू लागेल कि पैशांमध्ये वाढ होत आहे.
आपल्या शरीराच्या दोन बाजू असतात डावी बाजू आणि उजवी बाजू . दोन्ही हातानी आपण पैशाची देवाण घेवाण करत असतो. हिंदू संस्कृतीमध्ये शिव पार्वती कि शिव शक्ती , भगवान शिव शंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूस आहे.
उजवी बाजू खूप शक्तिशाली मानली जाते , कोणत्याही गोष्टींना सामोरे जाण्यासाठी सामर्थ्य ह्या उजव्या बाजूस असते. याउलट जी डावी बाजू असते जिथे माता पार्वतीचे स्थान असते , हि बाजू नाव निर्मितीची बाजू मानली जाते.
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे देता न मुडपायला विसरू नका. त्या नोटांची घडी करायची आहे आणि नेहमी उजव्या हाताने पैसे द्यायचे आहे आणि घ्यायचे सुद्धा आहे.
नोट दुमडताना ती जर सरळ धरली तर तिला दोन बाजू असतात एक उजवी आणि एक डावी . जेव्हा कोणाला पैसे देत असाल तर नोटा दुमडून ज्या दोन बाजू एकत्र ठिकाणी येतात ती बाजू सतत तुमच्या कडे असावी आणि देताना नेहमी उजव्या हाताने द्यावे.
हा उपाय केल्याने पैसे कधीच वाया जात नाही , त्यात सातत्याने वाढ होत राहते.जर पैसे बॅग मधून द्यायचे असेल तर बॅगेचे तोंड तुमच्या दिशेला असले पाहिजे . पिशवी असेल तर तिचे तोंड सुद्धा तुमच्या बाजूने असले पाहिजे.
जर तुम्हाला कोणाकडून पैसे घ्यायचे असतील तर ते तुम्हाला तुमच्या डाव्या बाजूने घ्यायचे आहे , नव निर्मितीच्या बाजूने घ्यायचे आहे.हे उपाय तुम्ही अवश्य करून बघा ज्याने तुमचे नुकसान तर नाहीच होणार पण फायदा नक्कीच होईल.
वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका. धन्यवाद.