नमस्कार मंडळी
शनी अमावस्येच्या समाप्तीनंतर मे २०२२ या महिन्याची सुरुवात झाली , मे महिना अतिशय महत्वपूर्ण मानला जात आहे, या महिन्याच्या सुरुवातीला अक्षय तृतीय आली असून अनेक महत्वपूर्ण ग्रह हे रशिपरिवर्तन करणार आहेत. मे मध्ये होणारी ग्रहांची राशांतरे किंवा बनत असलेली ग्रह दशा , या ग्रह दशेचा संपूर्ण १२ राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडणार असून काही राशींसाठी हा काळ अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे तर काही राशींसाठी हा काळ नकारात्मक ठरू शकतो.
ज्योतिषानुसार मे महिन्यात बनत असलेली ग्रह दशा ४ राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. यांचे भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहे. सुख समृद्धीची बहार येणार आहे. आता इथून पुढे यांच्या जीवनाला एक नवीन कलाटणी प्राप्त होणार आहे. जीवनातील दुःख आणि दरिद्रीच काळ आता समाप्त होणार असून अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे, तर ४ राशींच्या जीवनात राजयोगाचे संकेत आहेत. तुमच्या जीवनातील दुःखदायक परिस्तिथी आता समाप्त होणार आहे.
आता जीवनात मोठी प्रगती घडून येणायचे संकेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात अतिशय चांगले यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. सांसारिक जीवनात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. इतर ४ राशींसाठी मे महिना नकारात्मक ठरू शकतो. या राशींना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. संघर्षाचे दिवस तुमच्या वाटेला येऊ शकतात. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे-
मेष – मे महिन्याची सुरुवात मेष राशीसाठी लाभदायक असणार आहे. सूर्य गुरु शुक्र राहू हे तुम्हाला शुभ फळ देणार आहेत. उद्योग व्यापारात आनंदाचे दिवस तुमच्या वाटेला येणार आहे. व्यापारात काही नवीन योजना राबवणार आहात, आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. नोकरीमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात तुमच्या उत्साहात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. प्रेम आपुलकीमध्ये वाढ होणार आहे. खरेदीचे विक्रीचे व्यवहार करताना सतर्क राहणे आवश्यक आहे.
वृषभ- या राशीसाठी मे महिना अतिशय अनुकूल असण्याचे संकेत आहेत. मंगळ, गुरु , शुक्र शनी आणि केतू हे तुमच्या साठी शुभ फळ देणार आहे. या काळात आरोग्याची विशेष प्राप्ती सुद्धा होणार आहे. प्रवासाचे योग सुद्धा येऊ शकतात. जमीन , घर अथवा वाहन खरेदीचे योग येणार आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल असणार आहे. कोर्ट कचेरीची कामे दूर ढकलेलेली चांगले आहे.
मिथुन – मे महिना या राशीसाठी अतिशय लाभदायी ठरू शकतो. व्यवसायात चांगली प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. शेतीतून आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. जेवढी जास्त मेहनत कराल तेवढे मोठे यश पदरी पडणार आहे. सांसारिक सुखात वाढ दिसून येईल. उद्योग व्यापारात चांगला नफा तुम्हाला प्राप्त होणार आहे. परिवारातील लोक सुद्धा तुमची चांगली मदत करू शकतात.
कर्क – या राशीसाठी मे महिना अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. सूर्य बुध गुरु आणि शनी ,शुक्र हे तुमच्या राशीला शुभ फळ देणार आहेत. आर्थिक स्तिथी उत्तम राहणार आहे. पण या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शेतीमधून किंवा जमिनीमधून अनपेक्षित धन लाभ प्राप्त होऊ शकतो. धार्मिक कार्यात सहभाग घेणार आहात, अध्यात्माची आवड तुम्हाला निर्माण होऊ शकते.
सिंह – या राशीसाठी अडचणींचा ठरू शकतो मे महिना, मनामध्ये अस्वस्थ पणा वाढू शकतो, नोकरीमध्ये बघतीचे योग येऊ शकतात उद्योग व्यापारात काळजी वाढणार आहे. या काळात मन शांत ठेवून बुद्धी आणि विवेकाने कामे करण्याची आवश्यकता आहे. मोठा व्यवहार करताना मोठ्या लोकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
कन्या – या राशीसाठी मे महिना शुभ फलदायी ठरणार आहे. मंगळ , गुरु शुक्र , राहू , शनी हे तुमच्या साठी शुभ फळ देणार आहेत. व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. कौटुंबिक जीवनात चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या काळात आर्थिक प्राप्ती चांगली होणार असली तरी खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. , पैसे जपून खर्च करणे आवश्यक आहे .उद्योग धंद्यामध्ये चांगले यश प्राप्त होणार आहे. नोकरीमध्ये सुद्धा मान सन्मानामध्ये वाढ होणार आहे. या काळात व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे.
तूळ – या राशीसाठी मे महिना साधारण राहणार आहे. कौटुंबिक लोकांचा चांगला सहयोग प्राप्त होणार आहे. कुटुंबातील लोकांच्या गरज पूर्ण करण्यासाठी खर्च करावा लागेल. नोकरी निमित्त प्रवासाचे योग येऊ शकतात. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. या काळात उद्योग व्यापारात देखील अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. ज्या क्षेत्रात मन लावून मेहनत कराल. त्यात मोठे यश प्राप्त होऊ शकते. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आता इथून पुढे अनेक लाभ प्राप्त होऊ शकतात. प्रेम जीवनात काळ लाभकारी असणार आहे.
वृश्चिक – या राशीसाठी मे महिना अतिशय अनुकूल असण्याचे संकेत आहेत. बुध गुरु शुक्र आणि राहू हे तुम्हाला अतिशय शुभ फळ देणार आहेत. वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. कौटूंबिक जीवनात मान सन्मानाची वाढ होईल. हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल असणार आहे. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. व्यापारातून मनाप्रमाणे लाभ प्राप्त होणार आहे. मित्र मैत्रिणींची सुद्धा चांगली मदत तुम्हाला प्राप्त होणार आहे. घर अथवा जमीन खरेदीचे योग या काळात येऊ शकतात
धनु – या राशीसाठी मे महिना अतिशय शुभ फलदायी असणार आहे. अतिशय मंगलमय घडामोडी तुमच्या जीवनात घडून येणार आहे. मंगळ शनी राहू केतू हे तुमच्यासाठी शुभ फळ देणार आहेत. यात्रा अथवा सहली निमित्त प्रवासाचे योग येणार आहेत. सांसारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात तुमचा विजय होणार आहेत.
मकर – या राशीसाठी अडचणींचा ठरू शकतो मे महिना, मानसिक ताण तणाव दूर होणार आहे. नोकरीमध्ये बदल घडून येऊ शकतो. पण सध्या नोकरीमध्ये बदल करू नका. अचानक धन लाभाचे योग सुद्धा जमून येऊ शकतात. हाती घेतलेल्या कामांना अडचणी येऊ शकतात. आता इथून पुढे भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. काळ अनुकूल असणार आहे.
कुंभ – या राशीसाठी अतिशय शुभ फलदायी असणार आहे. शुक्र , राहू , हर्षल शुभ फळ देणार आहे. आर्थिक समस्या दूर होतील. आर्थिक सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल. या काळात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. गरजू लोकांना मदत करणे शुभ फलदायी ठरू शकते. या काळात उष्णतेचे आजार तुम्हाला जाणवू शकतात. धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकतात. मित्र मैत्रिणींची चांगली मदत तुम्हाला प्राप्त होणार आहे.
मीन – या राशीसाठी मे महिना विशेष अनुकूल असणार आहे. उद्योग व्यापारात यश प्राप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधान कारक असेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. घरातील लोक तुमची चांगली मदत करतील. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे