नमस्कार मंडळी,
लग्न गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात आणि काहींच्या जोड्या अगदीच तशा असतात, एकमेकांसाठीच बनलेल्या आणि मग त्याच्या कडे बघून सहजच लोक म्हणतात कि अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे, ज्योतिष शास्त्रामध्ये अशाच काही राशींच्या जोड्या सांगितल्या आहेत ज्यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणता येईल. चला जाणून घेऊयात कोणत्या आहेत राशी आणि त्यांचा जोडीदार –
आजू बाजूला किंवा समाजात बघतो कि अशा काही जोड्या अगदी एकमेकांसाठी पूरक असतात , ज्योतिष शास्त्रामध्ये अशा काही जोड्या सांगण्यात आले आहे , ज्यांची लग्न झाली तर ते एकमेकांसाठी पूरक असतात, तुमचे लग्न नसेल झाले तर हे एकदा नक्की वाचा आणि झाले असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर पूरक आहात कि नाही ते पडताळून पहा.
पहिली जोडी आहे तूळ राशी आणि सिंह राशी – या दोघांचे उदाहरण म्हणजे दोघांचा स्वभाव सारखाच असतो. ते मन मिळवू असतात , लोकांना भेटणे मन मोकळे पणाने बोलणे हे या दोघांचा सुद्धा छंद असतो. त्यांना स्वतःला मन मोकळे पणाने बोलायला आवडते आणि त्याचमुळे या दोन राशींचे लग्न झाले तर ते दीर्घ काळ टिकू शकते. ह्या दोघांच्या जोडीला लक्ष्मी नारायणाचा जोडा बोलू शकतो.
दुसरी जोडी म्हणजे मेष आणि कुंभ राशीची – दोन्ही राशी ची लोक एकमेकांचे जोडीदार झाले तर ते उत्तम जोडी बानू शकतात. या दोघांमध्ये प्रेम आणि रोमान्स खच्चून भरलेला असतो.हे दोघे पण सृजनात्मक असतात . ते स्वतःचे छंद जोपासतात आणि नेहमीच आपल्या जोडीदाराने स्पेस देतात. त्यांनतर आहे मेष आणि कर्क राशी – मेष राशीचे लोक नेहमी बहादूर आणि निडर असतात आणि कर्क राशीचे लोक उर्जावान असतात.
जे जोडीदाराची ऊर्जा वाढवायचे प्रयन्त करतात . त्यामुळे या दोघांची जोडी उत्तम जोडी मानली जाते. यांनतर ची जोडी आहे ती म्हणजे सर्वात पहिली राशी ती मेष आणि शेवटची राशी म्हणजे मीन राशी – मेष आणि मीन राशींचे अगदी स्नेहाचे संबंध बनतात. एकमेकांसोबत कर्तव्य निष्ठ आणि प्रामाणिक असतात. मेष राशी हि अग्नी तत्वाची राशी असल्याने स्वभावाने थोडी तापट असते पण त्यांचे लग्न जर जलतत्वाच्या मीन राशीच्या व्यक्तीशी झाले तर त्यांचे जास्त चांगले पटते ,
आपल्याकडे असे बोलले सुद्धा जाते कि एकाने आग झाले तर एकाने पाणी व्हायचे असते , यानंतर ची जोडी आहे ती म्हणजे वृषभ आणि कर्क राशी – या राशीचे दोघे सुद्धा एकमेकांना सामान आधार देणारे असतात.ते एकमेकांची भरपूर प्रशंसा सुद्धा करतात, वृषभ आणि कर्क यांच्यात उत्तम ताळमेळ असतो,कर्क राशीचे लोक हे खऱ्या मनाची असतात तर वृषभ राशीची लोक दुसर्यांना मदत करण्यासाठी तत्पर असतात, दोघे सुद्धा कुटुंबाचे महत्व जाणून असतात .
मग हि दोघे एकमेकांसाठी उत्तम जोडीदार बनू शकतात. वृषभ राशीच्या लोकांचे मकर राशीच्या लोकांसोबत सुद्धा चांगले पटते, या राशीची लोक एकमेकांसोबत प्रेमाने समझुतीने वागतात. वृषभ राशी असणारे हे नेहमी मकर राशीच्या लोकांच्या कामाची आणि प्रसन्न चित्त असण्याची प्रशंसा करतात. तर मकर राशीचे लोक वृषभ राशीच्या उदारतेला आणि समझदारीला पसंद करतात.
त्यानंतर मेष आणि धनु राशी- धनु राशीचे लोक नेहमीच आपल्या मनाचे ऐकतात कुठल्याही प्रकारचा बनावटी पणा यापासून ते दूर राहतात. हास्य विनोद करणे याना आवडते तसेच मेष राशीची लोक हि सामाजिक दृष्ट्या सक्रिय असतात आणि वास्तवात जगणे त्यांना सुद्धा जास्त आवडते , या नंतर आहे सिंह आणि धनु राशी सिंह राशीचे लोक हे स्वभावाने जिद्दी असतात, पण धनु राशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो , त्यामुळे हे दोघे हि प्रत्येक समस्यांचे समाधान काढण्यात यशस्वी होतात.
यानंतर ची जोडी आहे कन्या आणि मकर राशीची – कन्या राशीचे लोक हे काळजी करणारे असतात,ज्याने त्यांचा स्वभाव अंतर्मुख होऊन जातो.पण कन्या राशीची लोक जेव्हा बोलतात तेव्हा ते खूप मनमोकळे बोलतात आणि त्यांचा हाच स्वभाव मकर राशीच्या लोकांना प्रभावित करतो. यांनतर ची जोडी आहे वृश्चिक आणि कर्क राशीची- दोन्ही जल तत्वाची राशी आहे या राशींचे लोक संवेदनशील असतात , एकमेकांना समझून घेण्याचा चांगला प्रयन्त करतात.
पुढची जोडी आहे कुंभ आणि मिथुन राशीकडे -दोन्ही वायू तत्वाच्या राशी आहेत, या राशींचे लोक प्रत्येक चढ उत्तरामध्ये एकमेकांचे साथ देतात, मिथुन राशीचे लोक चांगल्या गोष्टींची प्रशंसा करतात, तर कुंभ राशीचे लोक सुद्धा प्रत्येक समस्येवर शांतपणाने तोडगा काढतात, तर या होत्या त्या राशींच्या जोड्या , ज्यांचे लग्न झाले तर त्यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणता येईल.मग तुमची जोडी अशी आहे का ?