नमस्कार मंडळी,
१४ जानेवारी २०२२ रोजी मकरसंक्रांतीचा सण आलेला आहे आणि मकरसंक्रांत म्हंटले कि जप तप आणि ध्यान या गोष्टींचे महत्व किती तरी पटींनी वाढते या दिवशी तुम्ही जे काही दान कराल किंवा काही ज्योतिषी उपाय करू त्याचे फळ किती तरी पटींनी जास्त असते. मात्र त्याच बरोबरीने तुमच्या हातून काही चुका झाल्या तर मात्र त्याची गंभीर अशी शिक्षा तुम्हाला मिळू शकते.
आणि ह्या काही ५ गोष्टी आहेत त्या जर कोणाला दिल्या तर तुमच्या कडे माता लक्ष्मी टिकणार नाही. मकर संक्रांति म्हणजे सूर्य देव जेव्हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात तो दिवस. या दिवसाचे महत्व खूप मोठे आहे, याच दिवसापासून उत्तरायण पर्वास सुरुवात होते. उत्तरायण मध्ये सगळे देवी देवता जागृत असतात
म्हणजे तुम्ही जे काही पुण्य कराल जी काही पूजा कराल त्याचे किती तरी जास्त फळे तुम्हाला प्राप्त होत असतात. मकर संक्रांत हा उत्तरायणाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी जर तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा गरजू व्यक्तीला कशी वस्तू दान केल्या तर खूप शुभ फळे तुम्हाला प्राप्त होतात.
पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील झाडू , तुम्ही घरातील झाडूला लक्ष्मी मानतात.हिंदू धर्म शास्त्रानुसार घरातील झाडू म्हणजे प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि म्हणून दिवाळी म्हणून किंवा इतर अनेक प्रसंगी या झाडूची लक्ष्मी म्हणून पूजा करतो तुम्ही हा झाडू जर कोणालाही दिला , अगदी ५ मिनिटांसाठी दिला तरी तुमच्या घरातील लक्ष्मी निघून दुसऱ्याच्या घरी जाईल.
मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही झाडू कधीच दान करू नका. बरेच जण मकर संक्रांतीच्या दिवशी तेलाचे सुद्धा दान करतात .ज्यांच्या घरामध्ये सुख शांती नाहीये पीडा आहे अशांती आहे.शनीचा दोष आहे , शनीची साडेसाती आहे असे लोक या दिवशी तेलाचे दान करतात. बऱ्याच वेळा लोक आपण स्वतः वापरलेले तेल दान म्हणून देतात,जेणेकरून बचत हि होते आणि दान सुद्धा होते पण अशी चूक करू नका.
असे वापरलेले तेल जर तुम्ही दान केले तर शनीची पीडा कमी नाही होणार शनी दोष जास्त वाढेल आणि ज्या घरामध्ये शनीचा दोष असतो तिथे माता लक्ष्मी कधीच जात नाही.
धारदार वस्तू – कोणत्याही शुभ प्रसंगी धारदार वस्तूंचा वापर सुद्धा टाळावा. हिंदू धर्मा नुसार धारदार वस्तूंचे दान करणे निषेध आहे , नंतर आहे जुने कपडे , बरेच लोक जुने कपडे दान म्हणून देतात ते अगदी चुकीचे आहे, मकर संक्रांतीच्या दिवशी हे कपड्याचे दान चुकून सुद्धा करू नका.कारण या मुले अनेक दोष तुमच्या माथी लागू शकतात. ज्या ज्या लोकांना तुमची हे जुने कपडे दिले आहे त्या त्या लोकांच्या आयुष्यात अनेक संकटे येऊ शकतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी कपड्याचे दान करणे शुभ मानले जाते पण ते जुने कपडे नसावे. नंतर आहे प्लास्टिक आणि स्टील ची भांडी . प्लास्टिक आणि स्टील या दोन्ही वस्तूंचे दान करायचे नाहीये, स्टील आणि प्लास्टिक च्या वस्तू ह्या मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा पसरवतात स्टील एक वेळ ठीक आहे पण प्लास्टिक च्या भांडी नकारात्मक ऊर्जा बाहेर सोडत असतात आणि त्याचा थेट परिणाम हा तुमच्या भाग्यवर होत असतो .
तुमचा विश्वास बसणार नाही पण काही गोष्टींतून विशिष्ट अशी नकारात्मक वाईट किरणे बाहेर पडत असतात आणि प्लास्टिक मधून अशी किरणे बाहेर पडत असतात. मकर संक्रांतीचा शुभ काळ आहे , माता लक्ष्मीच्या कृपेने सर्वाना आशीर्वाद लागो , सूर्य देवांच्या कृपेने उज्वल भवितव्य घडो याच शुभ कामना ..