कालसर्प दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी महाशिवरात्रीला करा हे खास उपाय

नमस्कार मंडळी

कुंडली मध्ये कालसर्प असेल तर जीवनात अनेक संकटे येतात असे म्हटले जाते राहू आणि केतू मिळून कालसर्प दोष निर्माण होतो जेव्हा सर्व ग्रह हे राहू केतूंच्या प्रभावा मध्ये येतात तेव्हा कालसर्प दोष तयार होतो कालसर्प दोष घरातील शुभ कार्यात व्यत्यय आणतो संतती प्राप्ती आणि प्रगती मध्ये अडथळे निर्माण करतो

तणावाचे वातावरण घरामध्ये निर्माण होते जर तुम्हाला ही ह्या सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी त्याच निवारण तुम्ही करू शकता काय उपाय करावा त्यासाठी चला पाहूया महाशिवरात्रीच्या दिवशी कालसर्प दोष दूर करण्यासाठी शिवलिंगावर तांब्याचा मोठा नाग अर्पण करू शकता

ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता त्या सोबत नाग आणि नागीण याची चांदीची जोडी ठेवहावी या दिवशी शिव मंदिरात जाऊन शिवलींगा वरती चांदीचा नाग आणि नागीण यांची जोडी सुद्धा अर्पण करू शकता लाल लोकरीच्या आसनावर ती बसून रुद्राक्ष माळा घालून नाग गायत्री मंत्राचा जप करावा

त्यानंतर कालसर्प दोष नीट करण्यासाठी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची प्रार्थना करावी महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक केल्यानंतर सर्व समस्या दूर होतात तुम्ही जाणकाराच्या देखरेखीखाली रुद्र अभिषेक करावा आणि काल सर्प दोष यापासून मुक्त होण्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करावी

कालसर्प दोष टाळण्यासाठी गणपती आणि माता सरस्वतीची उपासनाही फायदेशीर ठरते महाशिवरात्रीच्या दिवशी गणपती आणि माता सरस्वतीची विशेष उपासना करावी गणपती बाप्पा केतू ग्रहामुळे निर्माण होणारे दोष शांत करतो आणि देवी सरस्वती राहू च्या ग्रहापासून आपल्याला दूर करते

हे उपाय केल्याने आपल्याला असेलेला कालसर्प दोष मिटतो तुम्हीही नकी करून पहा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *