नमस्कार मंडळी,
मे महिन्यात ५ ग्रहांचा मकर राशीमध्ये महा संयोग होणार आहे आणि त्यामुळे ३ राशींना आर्थिक लाभ होणार आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या ३ राशी.
जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा योग बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो हे तुम्हाला माहीतच आहे.मे महिन्यात ग्रहांचा अनोखा संयोग पाहायला मिळणार आहे.
मे च्या शेवटी एकाच राशीमध्ये त्रिग्रही , चतुर्ग्रही आणि पंच ग्रही योग तयार होणार आहे.ज्योतिष शास्त्रामध्ये अशी घटना फार दुर्मिळ आहे.त्यामुळे या ग्रह योगांमुळे ५ राज्याच्या निवडणुकांवर हि परिणाम होऊ शकतो.तर पंच ग्रही योग सर्व राशींवर परिणाम करेल.
पण अशा ३ राशी आहेत ज्यांना या सगळ्या परिस्तिथीचा विशेष लाभ होणार आहे.या महिन्यात अनेक संक्रमणे होणार आहेत परंतु काही विशेष ग्रहांच्या संक्रमण काळात फक्त सांभाळून राहावे लागणार आहे.
मंगळ आणि शुक्र हे मुख्य ग्रह आहेत.मंगळ २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजून ४६ मिनिटांनी मकर राशीमध्ये प्रवेश करेल.हे मंगळाचे उच्च स्थान आहे.दुसऱ्या दिवशी २७ मे ला शुक्र मकर राशीमध्ये प्रवेश करेल.
त्याच बरोबर चंद्र आणि बुध देखील या राशीमध्ये असतील.त्यामुळे मे महिन्यात ५ ग्रहांचा पंच ग्रही योग बनत आहे आणि त्याचा सर्वात जास्त फायदा मेष राशीला होणार आहे.या राशीतून दशम म्हणजेच कर्म आणि करिअर च्या स्थानामध्ये पंच ग्रही योग तयार होईल.
या काळात तुम्ही व्यवसायात चांगली कमाई करू शकतात.नवीन नोकरीच्या अनेक संधी चालून येतील.तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला बढती सुद्धा मिळू शकते. या काळात तुमची चांगल्या कार्यशैली साठी ओळख होईल.
तसेच आर्थिक स्तिथीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. एकंदरीत पंच ग्रही योग तुमच्या साठी लाभकारी असणार आहे .
वृषभ राशी – तुमच्या राशीच्या नवव्या म्हणजे भाग्यस्थानात पंच ग्रही योग तयार होईल.या काळात नशिबाची साथ मिळणार आहे. जे काही काम हाती घ्याल त्याचा नक्कीच फायदा होईल.
तसेच तुमची अडलेली कामे पूर्ण होतील.व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी वेळ चांगली आहे. आता केलेली गुंतवणूक नक्कीच फायदेशीर असेल.तसेच या काळात धर्म आणि अध्यात्मिक मध्ये तुमची रुची वाढेल.
मीन राशी – तुमच्या राशीतील अकराव्या म्हणजे आर्थिक स्थानामध्ये पंच ग्रही योग तयार होत आहे. तुमचे उत्पन्न वाढेल. आर्थिक प्राप्तीचा नवीन मार्ग मोकळे होतील.खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
त्याच बरोबर अचानक तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता आहे.व्यवसायात नवीन संधी चालून येतील , तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला वेतनवाढ मिळू शकेल
जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्ही नक्कीच चांगली कमाई करू शकता.नवीन व्यवसाय संबंध निर्माण होऊ शकतील आणि व्यवसायाचा विस्तार सुद्धा होऊ शकेल. तुमची राशी आहे का यात ?