नमस्कार मंडळी
आचार्य चाणक्यांच्या नीती जीवनाच्या प्रत्येक बाबतीत कमी-अधिक प्रमाणात उपयुक्त आहे . मग ते जीवनात यश मिळवण्यासाठी असो किंवा श्रीमंत होण्यासाठी असो, संकटातून बाहेर पडण्यासाठी असो किंवा संकटातून मुक्त होण्यासाठी असो.
आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या नीती आजही तितकीच समर्पक आहे. चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले जाते की जर तुम्हाला जीवनातील त्रास आणि पश्चात्ताप टाळायचा असेल तर तुम्ही काही लोकांशी वाद घालणे बंद करा .
या लोकांशी वाद घालणे तुमच्यासाठी खूप घातक असणार आहे. जाणून घेऊया कोणत्या व्यक्तींशी वाद करणे आपल्याला नुकसानदायक आणि घटक ठरणार आहे आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्ख व्यक्तीशी कधीही वाद घालू नका .
यातून तुमचा वेळ तर वाया जात असतो पण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढून ते तुमची प्रतिमाही खराब करू शकतात. त्यामुळे मूर्ख व्यक्तींपासून अंतर ठेवणे कधीही चांगले .चांगला आणि खरा मित्र हा प्रत्येक सुख-दु:खाचा सोबती असतो.
जर तुम्ही त्याच्याशी वाद घालत असलं तर तुम्ही तुमच्या आयुष्या तील एक अतिशय प्रेमळ आणि विश्वासार्ह नाते गमवणार आहे . याशिवाय जर एखाद्या मित्राचे मन बदलले तर तो तुमची अनेक गुपिते उघड करून तुमचे मोठे नुकसान करण्याची शक्यता आहे
आई-वडील, भावंड, पत्नी किंवा मुलांशी कधीही अशा प्रकारे वाद करू नका की नाते तुटण्याच्या टोकापर्यंत पोहोचेल किंवा मनात तेढ निर्माण होईल. अशी चूक तुम्हाला आयुष्यभर दुःख देऊ शकते जीवनात गुरुची भूमिका खूप महत्त्वाची असते .
आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात . ते आपल्याला आव्हानांना कसे सामोरे जावे हे सांगतात, ज्ञान देत असतात . म्हणून गुरूशी कधीही वाद घालू नका, अन्यथा तुम्ही गुरूंच्या कृपेपासून वंचित असणार आहे .