मार्गशीष महिन्यातील गुरुवारी फक्त एक दिवा गुपचूप लावा इथे , लक्ष्मी प्रसन्न होईल..

नमस्कार मंडळी,

या जगाचे पालनहार भगवान श्री हरी श्री विष्णू यांचा सर्वाधिक प्रिय महिना म्हणजे मार्गशीष सुरु झालेला आहे.या मार्गशीष महिन्यात अनेक माता भगिनी महालक्ष्मीचे गुरुवार चे व्रत करतात. ह्या महिन्यात ४ गुरुवार येतात.या महालक्ष्मी व्रतासोबतच हा छोटासा उपाय नक्की करून पहा.तुमच्या घरात धन ,सुख , संपत्ती ऐश्वर्य , वैभव या सर्व गोष्टी भगवान श्री हरी विष्णूंच्या कृपेने नक्की निर्माण होतील.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागेल.अगदी कोणताही दिवा , कणकेचा असो किंवा मातीचा किंवा पितळेचा असो , पण तो स्वच्छ करून घ्यायचा आहे.त्या दिव्यामध्ये शक्य असेल तर तूप टाकायचे आहे.नसेल शक्य तर तेल टाकले तरी चालेल, पण न विसरता त्यामध्ये एक चिमूटभर हळद टाकायची आहे.हे दीप दान रात्री करायचा आहे किंवा सूर्यास्ताच्या वेळी केले तरी चालेल.

केवळ ४ गुरुवारी हे असे दीप दान केल्यास भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात.दोन प्रकारे हे दीप दान करू शकतात ,पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घरात मार्गशीष गुरुवारची व्रत करत आहात तेव्हा हे व्रत करत असतानाच भगवान श्री हरी विष्णूंच्या समोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे केवळ एक दिवा मात्र या दिव्याची वात पेटवताना ती कापराच्या साहाय्याने पेटवायची आहे.

कापराच्या साहाय्याने दिव्याची वात प्रज्वलित करायची आहे.केवळ ४ गुरुवार ,मार्गशीष गुरुवार हा उपाय केल्यास भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात , माता लक्ष्मीची कृपा तर बरसणार आहेच मात्र भगवंत प्रत्यक्ष या जगाचे पालनहार भगवान श्री हरी विष्णू प्रस्नान होणार आहेत. घराबरोबरच तुमच्या परिसरामध्ये भगवान विष्णूंचे मंदिर असेल किंवा माता लक्ष्मीचे मंदिर असेल तिथे एक दिवा लावायचा आहे.

बाहेर कुठे मंदिरात दिवा लावताना दिव्याची वात पेटवताना कपूरच्या साहाय्याने पेटवायची आहे. ज्या प्रकारे कार्तिक महिन्यात दीप दानाचे मोठे महत्व आहे त्याच प्रकारे मार्गशीष महिन्यात सुद्धा दीप दान अत्यंत महत्वपूर्ण मानले आहे.हा दिवा प्रज्वलित करून हाथ जोडून भगवान विष्णूंसमोर प्रार्थना करायची आहे कि तुमच्या घरात सुख समृद्धी आणि भरभराट निर्माण होउदे .

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *