नमस्कार मंडळी,
तुला राशीचे लोक हे अतिशय मन मिळवू स्वभावाचे मानले जातात. ते शांत स्वभावाचे प्रेम पूर्ण आणि निर्मल अंतःकरणाचे मानले जातात. न्याय निवड करण्यात अतिशय सक्षम असतात.याना मित्र फार असतात.एकटे राहणे यांना आवडत नाही.हे नाते संबंध जोडण्यात माहीर असतात.मिळून मिसळून काम करणे यांना फार आवडते.
हे फार इमानदार आणि न्यायप्रिय मानले जातात. न्यायनिवाडा करण्यात कुशल असतात हे लोक . लबाडी या लोकांना आवड नाही.स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग कसा करावा ते यांना चांगले जमते.जीवन जगण्यात एक संतुलन असते.अनेक वेळा मापून तोलून बोलतात. हे अतिशय निर्मल स्वभावाचे मानले जातात.
जे जिद्दी देखील असतात.तसेच शांत सुद्धा असतात.भांडणांपासून नेहमी दूर राहणारे लोक असतात.यांची वाणी मधुर मानली जाते.लोकांना खूप चांगल्या प्रकारे समझवून सांगतात. या लोकांकडे अनेक गुण जरी असले तरी काही दोष देखील आढळतात.हे लोक संघर्ष करण्यापासून वाचण्याचा प्रयन्त करतात. एखाद्या व्यक्ती विषयी द्वेष अथवा घृणा ठेवू शकतात.
यांना मित्र जरी खूप असले तरी मैत्रीमध्ये या लोकांना खूप वेळा धोका मिळतो. प्रेम व्यक्त करण्यात हे लोक फार घाबरतात. अनेक वेळा द्विधा मनःस्तिथी मुळे यांचे बरेच नुकसान होते.करू कि नको करू या विचारांमुळे वेळ निघून जाते. हे फार आशावादी लोक असतात. एक यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारे सगळेच गुण या राशीमध्ये आहे.
हे अतिशय चतुर मानले जातात. तुला राशीचे लोक जेव्हा काही ठरवतात तेव्हा ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. ग्रह नक्षत्र जेव्हा प्रतिकूल असतात तेव्हा यांना देखील अनेक संघर्षाचा सामना करावा लागतो. अनेक अपमान सोसावे लागतात पण हे हार मानत नाहीत. जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता प्राप्त होते तेव्हा यांच्या प्रगतीला वेळ लागत नाही.
२०२२ या नवीन वर्षाची सुरुवात तुला राशीसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. तुमच्या जीवनात चालू असणारी परेशान आता दूर होणार आहे. हा काळ आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या काळात तुमच्या प्रयन्तांना यश प्राप्त होणार आहे.अनेक दिवसापासून ज्या कामांसाठी तुम्ही प्रयन्त करत आहात ती कामे या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
प्रगतीचे मार्ग आता मोकळे होतील.अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहे. कार्यक्षेत्रातून पैशाची आवक वाढणार आहे.उद्योग व्यापार नोकरी , साहित्य राजकारण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होणार आहे. कौटुंबिक जीवनात चालू असणाऱ्या तुमच्या समस्यां दूर होतील.
तुमचे नाते संबंध मधुर बनणार आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल असणार आहे.नवीन प्रेम संबंध जमून येणार आहेत. तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून विवाह जमून येणार आहेत. सांसारिक जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत.