नमस्कार मंडळी,
तूळ राशी हि राशीचक्रातील सातवी राशी असून तूळ राशीचे जे बोधचिन्ह आहे ते म्हणजे तराजू , व्यापार , समतोलपणा, न्याय याचे प्रतीक समझला जाणारा तराजू हे तूळ राशीचे चिन्ह आहे. आणि अगदी असेच गुणधर्म या राशींच्या मंडळींसाठी सुद्धा पाहायला मिळतात. स्वभावात असणारा समतोल पणा, सामंजस्य आणि कोणत्याही विषयाचा गांभीर्यपणा खूप सुंदर रीतीने भरलेले असते.
कोणत्याही परिस्तिथीमध्ये न्याय बुद्धीने वागण्याचा यांचा नैसर्गिक कल असतो. कोणावरही अन्याय होणार नाही आणि नेहमी खऱ्याच्या बाजूने उभे राहणारे या राशीचे लोक असतात. कोणत्याही व्यापारात हि मंडळी यशस्वी होऊ शकतात. तसेच या राशीच्या कारक ग्रह शुक्र आहे वायू तत्वाची हि राशी असल्याने हे लोक प्रचंड हुशार बुद्धिमान आणि अभ्यासू स्वभावाशी हि राशी मानली जाते.
हि मंडळी कोणत्याही कामाची लाज बिलकुल बाळगत नाही, प्रत्येक काम श्रेष्ठ असते, ते काम पूर्ण अभ्यास करून कष्टाने आणि मेहनतीने करतात आणि त्यामुळे प्रत्येक कामात यश सुद्धा मिळवतात. चला तर जाणून घेऊयात एप्रिल महिना तूळ राशीच्या लोकांसाठी कसा असेल- या महिन्यात कौटुंबिक सदस्यांच्या काही बोलण्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो
आणि तुम्ही त्यांच्या बद्दल द्वेष मनात ठेवू शकता. कमीपणा घेतला नाही तर प्रकरण वाढेल. त्यामुळे वादाची परिस्तिथी निर्माण होऊ शकते. वडील तुमच्या कडून काही अपेक्षा ठेवते. या महिन्यात सगळे काही सामान्य असेल पण एखाद्या गोष्टीबद्दल वाद विवाद होऊ शकतो. संयुक्त कुटुंब असेल तर काही गोष्टींमुळे सदस्यांमध्ये वाद होतील.
त्यामुळे मन अस्वस्थ होईल. पण महिना अखेरीस सर्व काही पूर्व पदावर येईल आणि परिस्तिथी पूर्वी पेक्षा चांगली होईल. महिन्याच्या मध्यात वडीलधाऱ्या लोकांची प्रकृती बिघडू शकते. म्हणून घरातील वडील धाऱ्या लोकांची काळजी घ्या. तुमचे लहान भाऊ किंवा बहीण असतील तर त्यांना तुम्ही बाहेर फिरायला पाठवू नका. व्यावसायिकांना या महिन्यात फायदा होईल.
तुम्हाला तुमच्या ग्राहकांकडून आणि भागीदारांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या बद्दल बाहेर सकारात्मक वातावरण असेल. सगळे जण तुमच्या कामाचे कौतुक करतील.तुम्ही शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवले असतील तर तिथून सुद्धा तुम्हाला नफा मिळेल आणि तो समाधान कारक असेल.
सरकारी नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. काही महिन्यांपासून काही कामाची इच्छा असेल तर ते काम या महिन्यात पूर्ण होईल. नवीन नोकरी शोधात असाल तर या महिन्यात लक्ष ठेवा कारण काही चांगल्या ऑफर तुमच्या हातात येऊ शकतात. तुमचे लग्न होऊन थोडाच काळ लोटला असेल तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराप्रती अधिक ओढ वाटेल.
दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षणाची भावना निर्माण होईल आणि दोघेही एकमेकांना अधिक वेळ देऊ शकतील.हा महिना प्रेम संबंधासाठी चांगला परिणाम देईल आणि दोघांच्या नात्यामध्ये उबदारपणा येईल. जर तुम्ही अविवाहित असाल आणि जीवनसाथी शोधात असाल तर या महिन्यात तुम्ही सोशल मीडिया वर एखाद्याची संभाषण कराल.
जे हळू हळू प्रेम प्रकरणात बदलेल. सुरुवाती पासूनच लक्षात ठेवा कि अति उत्साही पणा टाळा. मणक्यांमध्ये किंवा कमरेमध्ये समस्या असू शकते जी दीर्घ काळ टिकेल. त्या पासून आराम मिळवण्यासाठी तज्न लोकांचा सल्ला नक्की घ्या. महिन्याच्या मध्यात काही गोष्टींबद्दल तणाव असू शकतो ज्यामुळे निद्रा नाश अस्वस्थथा अशा काही समस्या त्रास देऊ शकतात.
या सगळ्यापासून मुक्त होण्यासाठी कोणाशी तरी मन मोकळे बोला आणि तुमच्या मनातले सांगा. समस्येवर नक्कीच उपाय सापडेल.एप्रिल महिन्यासाठी तूळ राशीचा भाग्यशाली अंक असेल ६ आणि भाग्यशाली रंग असेल हिरवा , जर तुम्हाला भाऊ किंवा बहीण असेल तर तुमच्या दोघांमध्ये कटुता निर्माण करण्याचा तिसरी व्यक्ती प्रयन्त करेल.तयासाठी काही जुन्या गोष्टीचा आधार घेतला जाईल.