नमस्कार मंडळी,
हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे, प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्व असते, आणि त्यातच आमलकी एकादशी खूप महत्वाची मानली जाते, फाल्गुन महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हणून ओळखले जाते, हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्व आहे, या दिवशी भगवान विष्णूंची विधी पूर्वक पूजा केली जाते.
मान्यता आहे कि या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व सुखाची प्राप्ती होते, मान्यता आहे कि या दिवशी व्रत उपवास करून एकादशीची कथा ऐकल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात, सोबतच एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय सुद्धा केले जातात.
आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूनबरोबरच आवळ्याच्या झाडाची पूजा करणे शुभ फलदायी ठरू शकते, भगवान विष्णूंच्या बरोबरच आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख दरिद्रीचा नाश होतो. सुख समृद्धीची प्राप्ती होते, धार्मिक मान्यतेनुसार आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याला विशेष महत्व प्राप्त आहे,
फाल्गुन शुक्ल पक्ष पुष्य नक्षत्र दिनांक १४ मार्च रोजी सोमवार आहे, या वेळी एकादशीला अतिशय शुभ संयोग बनत आहे. या वेळी एकादशीच्या दिवशी सर्वात सिद्धी योग्य बनत आहे, या संयोगाच्या शुभ प्रभावाने तूळ राशीचे भाग्य चमकण्याची संकेत आहेत, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार असून जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार आहे.
जीवनात चालू असणारी दरिद्रीची स्तिथी आता बदलणार असून सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे, सुखाची सुंदर पहाट येणार आहे, आता परिस्तिथीमध्ये बदल घडून आणण्यासाठी वेळ लागणार नाही. हा काळ तुमचा प्रगतीचा काळ ठरणार आहे, तुमच्या परिवारात चालू असणारी अमंगल काळ आता बदलणार असून
मांगल्याचे दिवस तुमच्या वाटेला येणार आहे, दिनांक १३ मार्च रोजी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी एकादशी तिथीला सुरुवात होणार असून १४ मार्च रोजी दुपारी ११ वाजूंन ३ मिनिटांनी एकादशी तिथीला सुरुवात होणार आहे, एकादशीपासून पुढे येणारा काळ तूळ राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.
आता तुमच्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेला इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. अनेक दिवसापासून तुम्ही करत असलेल्या कष्टाला आता फळ प्राप्त होणार आहे, नोकरीच्या कामासाठी काळ अनुकूल असणार आहे, नोकरीसाठी तुम्ही घेतलेले कष्ट फळाला येणार आहे.
वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. उद्योग व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत, करिअर च्या दृष्टीने काळ शुभ असणार आहे,अविवाहित तरुण तरुणीच्या जीवनात विवाहाचे योग जमून येतील. सांसारिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील.
हा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल असल्यामुळे या काळात भगवान विष्णूंची आराधना करणे तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरू शकते. सोबतच व्यवसानापासून दूर राहणे हिताचे ठरणार आहे, चुकीच्या लोकांपासून किंवा चुकीच्या कामांपासून दूर राहणे तुमच्यासाठी शुभ ठरू शकते, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे.