Marathi Manus

Stay Up to Date With Us

तूळ राशी , तुमचा स्वभाव आहे का असा ?

नमस्कार मंडळी,

तूळ राशीची व्यक्ती हि दिसायला सुंदर असते.सरळ बांधा असतो , शरीराचा प्रत्येक भाग सुंदर असतो.तूळ राशीच्या लोकांचे केस सुद्धा सुंदर आणि कुरुळे असतात.हसताना गालावर खाली पडते.या लोकांकडे सौन्दर्य असल्यामुळे पाहताच क्षणी या लोकांच्या प्रेमात कोणीही पडू शकते.

तूळ राशीचे लोक चंचल असतात , एकाच वेळी अनेक छंद ह्या लोकांमध्ये असतात. या राशीच्या लोकांना दुसऱ्यांना आनंदी ठेवायला खूप आवडते त्यामुळे एकाच वेळी खूप कामे सोबत करणे याना आवडते.एकाच वेळी अनेक कामे हाती घेतल्याने भरपूर गोधळ सुद्धा उडालेला असतो.

कामाचा उरक चांगला असल्याने बरीच कामे पूर्ण सुद्धा होतात. तूळ राशी हि रजोगुणी राशी आहे.या लोकांमध्ये न्याय निष्ठुरपणे असतो म्हण्जेचज कोणत्याही गोष्टीचा न्याय या लोकांना व्यवस्तिथ जमतो.या लोकांमध्ये सहनशक्ती खूप जास्त असते. जीवनात असणारे दुःख दारिद्र्य आणि संकटाना अगदी सहज सामोरे जातात.

त्यांना या सर्व गोष्टी खूप चांगल्या प्रकारे हाताळता येतात. या लोकांकडे समझुतदारपणा खूप असतो म्हणजे कुठेही , कोणत्याही ठिकाणी या लोकांना सांगितले तरी ते सहज तिथे राहू शकतात. हि राशी अगदी प्रेमळ , लोकांवर दया दाखवणारी , त्यांचे दुःख जाणून घेणारी राशी आहे. तूळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे.

हि राशी खूप जास्त मेहनती आहे. या राशीच्या लोकांना मित्र मंडळी खूप असतात. सामाजिक कार्यात नेहमी यांचा समावेश असतो. तूळ राशीचे लोक सौन्दर्याची जास्त जोडलेली असतात. कोणत्याही व्यवसायात किंवा कोणत्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतात. उत्तम न्यायाधीश सुद्धा बनू शकतात.

हि राशी वायू तत्वाची राशी आहे.तूळ राशीचे लोक हे बुद्धिमान असतात.

ह्या लोकांची कल्पना शक्ती काही वाऱ्यासारखी असते. आपल्यात प्रगत असणाऱ्या कलेमध्ये सुद्धा बुद्धिमत्तेचा खूप छान वापर करतात. तूळ राशीचे चिन्ह हे तराजू आहे. हे लोक खूप छान समतोल साधू शकतात. निर्णय घेण्याची क्षमता खूप चांगली असते. एक खूप छान वृत्ती ह्या लोकांकडे असते कि कोणाकडेही भेदभाव करून पाहत नाही,

प्रत्येकाकडे समान वृत्तीने बघतात. कधीही कोणत्याच गोष्टीचा अतिरेक या लोकांकडे नसतो. प्रेम आणि कर्तव्य यामध्ये सुद्धा खूप छान संतुलन करतात. मनाचा हळवेपणा असतो पण कमकुवत नसतात. प्रेम करतात पण त्याचे पवित्र सुद्धा जपतात. खूप निश्चयी असतात पण कधी हट्ट नसतो. जिद्दीपणा ह्या लोकांमध्ये नसतो.

तूळ राशीची स्त्री हि एक आदर्श गृहिणी असू शकते. खूप स्वच्छ आणि निर्मल मनाचे हे लोक असतात. खूप उत्साही असतात पण तसेच ते भोळे हि असतात , ह्या लोकांना पटकन कोणीही फसवू शकते. तूळ राशीचे लोक हे पटकन विश्वास ठेवतात आणि बऱ्याचदा फसवले सुद्धा जातात.

तूळ राशी हि शुक्राची राशी आहे म्हणून ह्या राशीच्या लोकांचे सगळ्यांसोबत पटते.वृश्चिक राशीच्या लोकांशी यांचे सर्वात जास्त पटते, मीन राशीच्या लोकांबरोबर थोडे खटके उडू शकतात. तूळ राशीचे लोक जिथे जातात तिथे स्वतःची एक ओळख निर्माण करतात. एकंदरीत तूळ राशी खूप छान हळवी आणि प्रेमळ असते.

प्रत्येकाला हवी असते अशी राशी आहे . तूळ राशीच्या व्यक्तींनी स्वतःकडे जास्त लक्ष देणे जरुरी आहे. दुसऱ्यांची काळजी घेताना स्वतःला विचारू नये.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.