नमस्कार मंडळी
नवीन वर्ष सुरु झालं की प्रत्येक जण आपल्या घरी कॅलेंडर लावतात वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावण्याची दिशा जर योग्य असेल तर आपले घरामध्ये बरकत येते. घराची भरभराट होते घराची बरकत होते. या उलट जर चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावलं गेलं तर आपल्या घरामध्ये विविध बाधा समस्या निर्माण होऊ लागतात.
आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही नवीन कॅलेंडर खरेदी करून घरात आणला असेल तर गेल्या वर्षीचा म्हणजे जुना कॅलेंडर त्वरित काढून टाका. जुना कॅलेंडर घरामध्ये अस नाही आपल्यासाठी हानीकारक मानलं जातं जुना कॅलेंडर कुठेतरी गुंडाळून ठेवून द्यावा मात्र ते भिंतीवर ठेऊ नये. नवीन कॅलेंडर विकत घेतल्यानंतर भिंतीवर ते कोणत्या दिशेला लावावं याबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण होते.
चार दिशा प्रमुख दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण यापैकी दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा मानली जाते आणि यामध्ये व त्याची दिशाही दक्षिणचा आहे म्हणून कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला चुकूनही लावू नये. जर कॅलेंडर दक्षिण दिशेला लावलं तर घराची प्रमुख व्यक्ती आहे ती करती कमावती व्यक्ती आहे ती सारखी सारखी आजारी पडत राहते त्यामुळे अनेक संकटं सुद्धा येत असतात
दक्षिण दिशा ही थांबण्याची दिशा आहे. म्हणून दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नये कॅलेंडर असेल किंवा घड्याळ असेल हे आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीचे सूचक असतात आपल्या प्रगतीच्या मार्गावर कोणतेच अडथळे येऊ नये असे वाटत असेल तर दक्षिण दिशा नेहमी टाळा. दक्षिण दिशा सोडून इतर तीनही दिशांना आपण कॅलेंडर लावू शकतो. उत्तर पश्चिम आणि पूर्व या प्रत्येक दिशेच आपलं वेगवेगळे एक महत्त्व आहे.
वेगवेगळे फायदे आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या दिशेला कॅलेंडर लावल्याने आपल्याला कोणते कोणते फायदे होतात. सुरूवात पूर्व दिशेपासून करूयात कॅलेंडर पूर्व दिशेला लावला तर हे अत्यंत शुभ मानला जाते. यामुळे करिअरमध्ये प्रगती होते तूमचं जे काही करिअर आहे नोकरी आहे किंवा उद्योग धंदा आहे त्यामध्ये प्रचंड प्रगती होते.
आणि संपूर्ण वर्षभर नोकरीच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या येत नाही पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे म्हणून जर तुम्ही लीडरशिप करत असाल तर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं नेतृत्व करायचं आहे. तर अश्या वेळी पूर्व दिशेला कॅलेंडर लावावं दुसरी गोष्ट म्हणजे ज्याना भरपूर पैसा कमवायचा आहे. अशा लोकांसाठी उत्तर दिशा ही अत्यंत शुभ मानले जाते.
उत्तर दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावलं तर कुबेर देवता प्रसन्न होते. करण कुबेराची दिशा ही उत्तर दिशा आहे.सोबत आपल्या घराची आर्थिक स्थिती मजबूत बनते. असे घरात राहणाऱ्या लोकांना प्रचंड धनलाभाचे योग सुद्धा प्राप्त होतात. थोडक्यात धनप्राप्ती जर करायची असेल. पैसा प्राप्त करायचा असेल तर उत्तर दिशा ही फार महत्त्वाचे असते म्हणून कॅलेंडर उत्तर दिशेला लावावे.
तुम्ही जर जॉब करताय नोकरी-व्यवसाय मध्ये प्रमोशन होत नसेल. तर अशा वेळी पूर्व दिशेला कॅलेंडर लावलेला अत्यंत शुभ मानले जातात. जर तुमच्या प्रत्येक कामांमध्ये अडथळे येत असतील कोणतेही काम निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर कार्यामध्ये यशप्राप्ती होण्यासाठी कार्यामध्ये सफलता प्राप्ती होण्यासाठी कॅलेंडर हे पश्चिम दिशेला लावावा यामुळे तुमची कार्य पूर्ण होतील. तुमची कार्यक्षमता वाढेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये कॅलेन्डर लावू शकता