हत्तीची मूर्ती घरात इथे ठेवा, पैसा आणि धन येईल

नमस्कार मित्रांनो

आपल्या जीवनात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे घरात काय ठेवावे काय ठेवू नये कोणत्या दिशेला काय ठेवावे कोणती गोष्ट कशासाठी चांगले आहे या विषयाची संपूर्ण माहिती आपल्याला वास्तुशास्त्र मध्ये अगदी सहज रित्या मिळते आज आपण हत्तीच्या मूर्ती विषयी माहिती जाणून घेणार आहोत. हा हत्तीला हिंदू संस्कृतीमध्ये खूप पवित्र प्राणी मानले जाते. हत्ती जास्त वर्षे जगतो म्हणून त्याला दीर्घायुष्याचे प्रतीकही मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्याने आपल्याला खूप फायदे होतात

आपले घर असो दुकान असो ऑफिस असो किंवा फॅक्टरी असो प्रत्येक ठिकाणी हत्तीची मूर्ती ठेवणे हे खूप लाभदायी मानले जाते घरात किंवा दुकानात हत्ती ठेवताना तो वरती सोंड केलेलाच असावा याचे खूप सकारात्मक परिणाम आपल्याला मिळतात धर्मग्रंथांमध्ये दिले आहे चांदीचे भरीव हत्ती बनवून घरात ठेवल्याने आपल्या घरातील वाईट गोष्टींचा प्रभाव कमी होऊन चांगल्या गोष्टींचा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो परंतु तो हत्ती भरीव असावा छोटा असला तरीही चालेल पण पोकळ नसावा आपण हत्ती कडे एक गणपतीचे स्वरूप म्हणूनही पाहतो

घराचा मुख्य दरवाजा वरती दोन्ही बाजूला वरती सेंड केलेले हत्ती लावल्यास घरात प्रेम व आनंदी वातावरणाची निर्मिती होते आपल्या घरावर कोणाची वाईट नजर व दोषही लागत नाही घरामध्ये सतत भांडणे वादविवाद होत असतील तर घरामध्ये तीन हत्ती हे पूर्व दिशेला ठेवावे हे तीन हत्ती अशाप्रकारे ठेवावे की सर्वात मोठा हत्ती पुढे व सर्वात लहान हत्ती सर्वात मागे असावा अशा प्रकारे उतरत्या क्रमाने हत्तीचा कळप ठेवावा बेडरूम मध्ये पांढऱ्या रंगाची हत्तीची मूर्ती ठेवणे खूप शुभ असते यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम वाढीस लागते

पूर्वीच्या काळी असे म्हणत होते की कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर खर्‍या हत्तीच्या पोटा खालून निघावे. आणि हा तिच्या पायाखालची माती उचलून ती विहीरत टाकावी या उपायांमुळे आपल्या वरील सगळे कर्ज लवकरच मिटेल आपल्या शत्रूंचा त्रास खूप वाढला असेल शत्रू त्रास देत असतील शत्रूचे भय वाटत असेल तर शनिवारी एक अंकुश हत्तीच्या महुताला दान करावा यामुळे आपल्या शत्रूंचा नाश होतो व आपल्याला होणारा त्रास कमी होतो. देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपादृष्टी व्हावी घारामध्ये धन-संपत्ती वाढावी.

असं वाटत असेल तर चांदीचा एक भरीव हत्ती बनवून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावा हा हत्ती वरती सोंड केलेला असावा या उपायांमुळे देवी आईची आपल्यावरती कृपा होऊन पैशांची आवक वाढेल यामुळे आपल्या आर्थिक स्थितीमध्ये भरपूर फरक जाणवेल वरती सोंड केलेला एक हत्ती जर आपल्या ऑफिसच्या टेबलावर ठेवला आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते तसेच आपल्या निर्णय यामध्ये ही वाढ होते जर चांदीचा हत्ती आपल्याला बनवणे शक्य नसेल तर संगमरवराचा छोटा हत्ती बनवून तोदेखील आपण घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवू शकतो

आपले लिविंग रूम मध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्याने शांतता मिळते. याबरोबरच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळते घरात किंवा खिशात पर्स किंवा पाकीट मध्ये चांदीचा हत्ती ठेवावा हा हत्ती राहु दोषासाठी फार उपयुक्त आहे यामुळे आपल्याला राहूचा त्रास होत नाही आणि व्यापार व्यवसाय मध्ये ही फायदा होतो चांदीचा हत्ती घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवणे वास्तू शास्त्राचे दृष्टीने खूप शुभ असते यामुळे घरात समृद्धी येते

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *