नमस्कार मंडळी,
आज असे एका उपयुक्त पानाचे उपाय पाहणार आहोत , हे उपाय केल्याने तुमचे पांढरे झालेले केस काळे होतील , चेहऱ्यावरील पिंपल्स जाऊन गोरा होईल आणि काळे वांग सुद्धा राहणार नाही. ती वनस्पती म्हणजे सदाफुली , हिंदी मध्ये सदाबहार म्हणतात. सदाफुली हि अशी एकमेव वनस्पती आहे ज्याला वर्षभर फुले असतात आणि हि कोणत्याही परिसरामध्ये सहज उपलब्ध होते. तुम्ही कधी विचार हि केला नसेल कि हि एक वनस्पती आपले आयुष्य बदलू शकते.
लवकरच अकाली केस पांढरे झाले असतील किंवा चेहऱ्यावरचे तेज कमी झाले असेल , वांग आले असतील , अशक्तपणा असेल , उच्च रक्तदाबाने तुम्ही खूप त्रस्त झाले असाल तर हे उपाय नक्की करून पहा. हि वनस्पती कधीच तुम्हाला म्हातारपण येऊ देत नाही, अगदी सहज उपलब्ध होणारी अशी आहे. ह्या वनस्पतीचे सर्व भागांचा उल्लेख आयुर्वेदामध्ये केला आहे. फुल, पान , मुळे सुद्धा गुणकारी आहेत. चला तर जाणून घेऊयात कि माणसाला किती उपयोगी आहे हि वनस्पती –
सर्वात प्रथम म्हणजे ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी काळजीपूर्वक हा उपाय करणे गरजेचे आहे. ज्यांना असा उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवतो ते लोक औषधे घेतात , रोजच्या गोळ्यामुळे शरीर सुटते , सूज येणे अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. उपाय असा आहे कि सदाफुलीचे जी मुळे आहेत साधारण १० ते २० ग्राम घ्यायची आहे. हि मुळे एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायची आहे आणि सकाळी उकळून घ्यायचे आहे.
नंतर मुळे काढून टाकून थोडं थोडं दिवसातून ३ वेळा घ्यायचे आहे. ह्या सदाफुलीच्या मुळ्यांची पावडर बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल. तसेच या उपायाबरोबर तुम्ही प्राणायाम सुद्धा करू शकता. त्याने तुम्हाला खूप लवकर आणि चांगला फरक जाणवेल. दुसरा उपाय म्हणजे खूप व्यक्तींना चेहरा काळा पडत आहे असे जाणवत असते, रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. खूप सारे उपाय करून सुद्धा कधी कधी फरक नाही जाणवत आणि त्याचा वेगळा परिणाम पाहायला मिळतो.
चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या , पिंपल्स , वांग येतात , यापासून सुटका हवी असेल आणि चेहरा गोरा करायचा असेल तर तुम्हाला २० मिली दूध घ्या, १० ग्राम पर्यंत सदाफुलाची चटणी बनवा म्हणजे बारीक करून घ्या. रोज झोपण्यापूर्वी हि पेस्ट लावा आणि थोड्या वेळा ने सुकल्यानंतर धुवून टाका. तिसरा उपाय म्हणजे केस जर गळत असतील किंवा , केस पांढरे झाले असतील तर हा उपाय नक्की करून पहा – ५ ते १० ग्राम कोरफडीचे जेल घ्यायचे आहे आणि १० ग्राम ह्या फुलाची चटणी असे दोन्ही एकत्र करून केसांना लावायचे आहे.
केसांना लावल्यानंतर १ तास ठेवून केस धुवायचे आहे. हा उपाय जर तुम्ही ३ वेळा केला तर नक्कीच तुम्हाला फरक पडेल, केस गळती थांबेल.एखाद्या व्यक्तीला खूप अशक्तपणा आला आहे , ताकत नाहीये असे वाटत आहे तर त्या व्यक्तीने अश्वगंधा पावडर ३ ग्राम आणि ह्या सदाफुलाच्या झाडाच्या मुळाची पावडर ३ ग्राम एकत्र करून ठेवायचे आहे. रोज सकाळी प्राणायाम केल्यानंतर १ ग्लास पाण्यामध्ये १ चमचा घेऊन प्यायचे आहे. ह्याने शरीराची झीज भरून निघेल.