हनुमान जयंती, करा हा एक उपाय सात पिढ्या पैश्यावर राज करतील

नमस्कार मंडळी,

१६ एप्रिल शनिवार चा दिवस आणि याच दिवशी आली आहे हनुमान जयंती , चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी या दिवशी आहे, या हनुमान जयंतीचा उत्सव हा संपूर्ण भारतभर तसेच संपूर्ण विश्वभर साजरा केला जातो अनेक भक्त त्यांची संकटे दूर करण्यासाठी घरावर किंवा घरातील लोकांवर आलेली काही बाधा असेल तर ती दूर करण्यासाठी हनुमान जयंती ला विशेष अशी पूजा करतात.

अनेक उपाय सुद्धा करतात. हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही धन प्राप्तीसाठी एक उपाय करू शकता. हा उपाय तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी मध्य रात्री करायचा आहे. हा उपाय तुम्ही सकाळी केला तरी चालेल. पण रात्री ११ नंतर ची वेळ चांगली मानली जाते. या उपायासाठी तुम्हाला एक लवंग लागणार आहे.

ती लवंग तुटलेली नसावी , फुटलेली नसावी. तिला छान फुल देखील असावे. या उपायासाठी मोहरीचे तेल सुद्धा लागेल. मोहरीचे तेल नसेल तर जाईचे तेल वापरले तरी चालेल. तुम्हाला तुमच्या आसपास च्या हनुमान मंदिरात जायचे आहे आणि शक्य नसेल तर तुम्ही एक हनुमानाचा फोटो घेतला तरी चालेल.

त्यानंतर हनुमंताची पूजा तुम्हाला करायची आहे. मात्र एक काळजी घ्या कि पूजा करताना हनुमानजींचे तोंड हे दक्षिण दिशेला असेल पूजे साठी एक सुंदर पाट घेऊन त्यावर लाल रंगाचा एक रुमाल अंथरायचा आहे. त्यावर हनुमानजींची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. हे सगळे झाल्यावर विधिवत पूजा करायची आहे.

त्यांना गूळ आणि भाजलेले हरभरे यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. सोबतच लाल रंगाची फुले अर्पण करायची आहे. जो दिवा तुम्ही लावला आहे त्या दिव्याची वात हि लाल रंगाची असेल तर अतिउत्तम. जो कापूस किंवा धागा असतो त्याची वात बनवताना त्यात केसर किंवा कुंकू मिसळायचे आहे.

असा दिवा लावल्यानंतर ती लवंग दिव्यामध्ये टाकायची आहे. आणि २ लवंगा हनुमानजींच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. असा हा दिवा लावल्यानंतर तुम्ही हनुमान चाळीसच्या पाठ करायचा आहे. तुमची जी इच्छा असेल ती बोलून दाखवायची आहे. तुम्हाला तुमच्या कष्टाला फळ मिळूदे अशी प्रार्थना करायची आहे.

आणि त्यांनतर ज्या दिव्यामध्ये एक लवंग टाकली आहे त्यानेच आरती ओवाळायची आहे. या उपायाने तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. हनुमान जयंती च्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन त्यांना रुईच्या पानांची माळ तेल आणि शेंदूर अर्पण करायला विसरू नका. मंडळी तुम्ही सुद्धा बजरंग बलीचे भक्त असाल तर हा उपाय नक्की करून पहा,

उपाय करताना मनोभावे हा उपाय करा, पूर्ण श्रद्धेने करा , तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *