Marathi Manus

Stay Up to Date With Us

दिनांक २४ ते ३० एप्रिल २०२२ नवीन संधी अन् नोकरीत प्रगती; आठवड्यातील ‘हे’ दिवस तुमच्यासाठी शुभ असणा आहे

नमस्कार मंडळी

या आठवड्यात बुध, शुक्र आणि शनि यांचे गोचर होणार आहे. २४ रोजी बुध मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार असून . २७ रोजी शुक्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे . २९ एप्रिल रोजी शनि मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहस्थिती अशौ- रवि, राहू आणि हर्षल मेष राशीत असणार आहे ,

बुध वृषभ राशीत राहील. केतू तुळ राशीत राहणार आहे . प्लुटो आणि शनि यांची युती २९ पर्यंत मकर राशीत राहणार आहे . त्यानंतर शनि कुंभ राशीत जणार आहे . कुंभ राशीत मंगळ आणि शुक्र यांची युती २७ पर्यंत राहील. २७ पासून शुक्र मीनेत जणार आहे . मीनेत गुरु, नेपच्युत आहेत.

रविवार, दि. २४ एप्रिल २०२२ रोजी दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री २.५३ पर्यंत चैत्र कृष्ण नवमी राहील, सायंकाळी ५.५२ पर्यंत श्रवण तर त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र राहील. दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री पहाटे ५.३० पर्यंत मकर तर त्यानंतर कुंभ राशी राहील, दिवस चांगला असणार आहे . राहू काळ सायंकाळी ४.३० ते ६ या वेळेत राहील.

मेष राशी – नवीन संधी मिळणार आहे . हा सप्ताह धावपळीचा असणार आहे . सतत नवनवीन संधी दिसतील. महत्वाचे निरोप येतील. थोडी द्विधा मनस्थिती असणार आहे . दूरचे प्रवास होण्याचे संकेत आहे . पर्य़टनाच्या संधी मिळतील. मित्रमैत्रिणी यांच्या भेटी होतील. त्यांच्याशी बोलून मग मन मोकळे होणार आहे .

काही घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता असणार आहे . आर्थिक आवक चांगली राहणार आहे . विविध प्रकारच्या भेटवस्तू मिळतील जीवनसाथीची चांगली साथ राहील. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. टीप- सोमवार, मंगळवार, शनिवार, रविवार दिवस शुभ असणार आहे

वृषभ राशी – नोकरीत प्रगती होणार आहे . नशिबाची साथ मिळेल. जीवनसाथी आपल्याला चांगली मदत करणार आहे . जीवनसाथीचा सल्ला महत्वाचा ठरणार आहे . नोकरी अनुकूल परिस्थिती असणार आहे . अचानक मोठी संधी मिळणार आहे . नोकरीत महत्वाच्या प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाणार आहे .

त्यातून तुमचा नावलौकिक वाढेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. सहकारी मदत करतील. चांगला सल्ला मिळेल. धनलक्ष्मीची कृपा असणार आहे . कागदपत्रे सांभाळून ठेवा. मूल्यवान वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे . टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार चांगले दिवस

मिथुन राशी – भाग्य साथ देईल. ग्रहमान अनुकूल असणार आहे . महत्त्वाच्या कामात यश मिळेल. वाहने जपून चालवा. भाग्याचे पाठबळ मिळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ द्यावी लागेल . जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भागीदारी व्यवसायात सफलता मिळेल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल.

नोकरीत कामाचा ताण कमी होणार आहे . वाहन सुख मिळेल. आर्थिक उलाढाली जपून करा. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. इतरांना सल्ला देण्याचे टाळा. बाकीचे राहिले बाजुला आणि तुमच्यावरच खापर फोडले जाईल. टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस

कर्क राशी – मानसन्मान मिळणार आहे : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता येणार आहे अशी स्थिती निर्माण होईल. अनेक दिवसांपासून सहन करत असलेल्या काही अडचणी दूर होणार आहे , मनात आनंदी विचार राहतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा मिळेल.

भावंडांशी संबंधात सुधारणा होणार आहे . गैरसमज दूर होतील. मुलांकडून अपेक्षा पूर्ण होतील. आर्थिक आवक चांगली असणार आहे . काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत अचानक काही अडचण येऊ शकते. थोडे संयमाने वागा. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. टीप बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस

सिंह राशी – संमिश्र ग्रहमान. संमिश्र परिस्थिती राहील. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता असणार आहे . तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. पथ्यपाणी सांभाळा. वेळच्या वेळी आहार घ्या. जीवनसाथी आपल्याला चांगला सल्ला देणार आहे . मात्र आपण त्यातून बोध घेतला तर खरे.

घरात ताणतणाव निर्माण होणार आहे . थोडे बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे . कुणी तुम्हाला मोहात अडकवण्याचा प्रयत्न करेल. वाहने जपून चालवा. प्रवासात काळजी घ्या. इतरांच्या भानगडीत पडू नका. टीप- सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस

कन्या राशी – कटू गोड अनुभव येणार आहे . मुलांच्या प्रगतीमुळे आनंद होणार आहे . त्यांना योग्य मार्गदर्शन करा. दगदग होईल अशी कामे करू नका. प्रवास शक्यतो टाळावे . थोडे सतर्क राहणे आवश्यक असणार आहे . वाहने जपून चालवा. कायद्याची बंधने पाळा. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल.

मात्र आपण गैरसमज करुन घेऊ नका. कुणी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे व्यवहार सावधानपणे करा. कुणी काही सांगितले तर लगेच हुरळून जाऊ नका. संयम ठेवा. टीप- रविवार बुधवार, गुरुवार चांगले दिवस

तूळ राशी – दगदग होणार आहे . नोकरी कामाचा व्याप सांभाळताना धावपळ होणार आहे . थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. आपण भले आणि आपले काम भले असे धोरण ठेव्हावे . घरी पाहुणे येतील. मुलांना चांगल्या संधी उपलब्ध होणार आहे . त्यांचे कौतुक होईल. काहींना प्रवास करावा लागेल.

जीवनसाथी चांगली साथ देईल. थोडे तब्येतीकडे लक्ष द्या. कागदपत्रे सांभाळून ठेवा. तसेच कुठेही सही करताना कागदपत्रे वाचून घ्या. वादविवादात पडू नका. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल . टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस

वृश्चिक राशी – महत्वाचे कामे होणार आहे . मनात आनंदी विचार अनार आहे . अनेकांचे सहकार्य़ मिळेल. महत्वाच्या कामात सफलता मिळणार आहे . काहींना प्रवास करावा लागेल. प्रवास कार्य साधक ठरणार आहे . गुप्त शत्रुपांसून सावध राहा. आपली आपण काळजी घ्या. घरी पाव्हण्यारावळ्यांचा राबता राहील.

मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडणार आहे . प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. विवाहेच्छुंचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होणार आहे . आर्थिक आवक चांगली राहील. स्वत:चे राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहाल. टीप- सोमवार, मंगळवार, गुरुवार चांगले दिवस

धनू राशी – प्रगती होईल. प्रगतीला पूरक वातावरण असणार आहे . आपल्या अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहे . नोकरीत उच्चाधिकार प्राप्त होतील. पगारवाढ व विविध सोयीसुविधा मिळतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडणार आहे . भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल.

मुलांशी संवाद साधा, घरी पाहुणे येणार आहे . घर आणि नोकरी यात समन्वय साधताना ओढाताण होईल. व्यवहारात बरकत असणार आहे . विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. आलेल्या पैशातून गुंतवणूक करता येणार आहे . टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस

मकर राशी – नोकरी चांगली स्थिती असणार आहे . ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने असणार आहे . मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेणार आहे . नोकरीत तुमच्या मताला किंमत राहील. तुमचा अभिप्राय महत्त्वाचा ठरणार आहे . धनलक्ष्मीची कृपा असणार आहे .

विविध प्रकारचे लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होणार आहे . मात्र जुने वाद उकरुन काढू नका. व्यवसायात भरभराट होणार आहे . जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळणार आहे . टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस

कुंभ राशी – विविध लाभ होणार आहे . ग्रहांचे भ्रमण तुम्हाला विविध प्रकारचे लाभ मिळवून देणार आहे . आर्थिक आवक चांगली असणार आहे . मालमत्तेच्या कामांना गीत मिळेल. त्यात तुमचा फायदा होईल. मनासारखे भोजन मिळणार आहे . सप्ताहाच्या मध्यावधीत मनावरील ताण निघून जाणार आहे .

जीवनसाथीशी मधुर संबंध असणार आहे . तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल . व्यवसायात विक्री चांगली होणार आहे . मोठे सौदे फायद्याचे ठरतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. घरातील विजेच्या उपकरणांची दुरुस्ती वेळीच करुन घ्या. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस

मीन राशी – अनुकूल घटना घडणार आहे . मन प्रसन्न असणार आहे . नवीन संधी मिळतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे . प्रवासात काळजी घ्यावी लागणार आहे . मूल्यवान वस्तू, सामान, कागदपत्रे याकडे लक्ष ठेवा. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. घरात उत्सवी वातावरण असणार आहे . खाण्यापिण्याची चंगळ राहील. पूजापाठाचे आयोजन केले जाणार आहे . प्रेमात अनुकूल प्रतिसाद मिळेल. चैनीच्या वस्तू खरेदी करणार आहे .

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.