Marathi Manus

Stay Up to Date With Us

कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय गाठणारी बुद्धिमान राशी कोणती तुमची राशी आहे का ; जाणून घ्या

नमस्कार मंडळी

आज आपण वृषभ राशीच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत. वृषभ ही कालपुरुषाच्या कुंडलीतील दुसरी राशी असून . या राशीचे प्रतीक बैल आहे. बैलाचा संबंध शेतीशी आणि शेतीचा संबंध पृथ्वीशी असतो. त्यामुळे ही पृथ्वी तत्त्वाची रास असते . बैल अर्थात नंदी हा शिव शंकराच्या कुटुंबाचा सदस्य आहे. ही दक्षिण दिशेची राशी आहे.

या राशीची आणखीही स्वभाव वैशिष्ट्ये जाणून घेणार आहे .वृषभ राशीचा सर्वात मोठा गुण म्हणजे अथक परिश्रम करण्याची तयारी असते , बुद्धिमत्ता आणि कधीही हार न मानणारी दुर्दम्य इच्छाशक्ती या गुणांच्या जोरावर ते त्यांची सर्व स्वप्नं पूर्ण करत असतात वृषभ राशीचे लोक स्वतःचे नशीब बलवत्तर करतात आणि दुसऱ्यांनाही प्रोत्साहन देत असतात .

ते खूप चांगले सल्लागार आहेत . प्रामाणिक सल्ला देतात. कोणाचीही फसवणूक हे करत नाहीत. त्यांचे बालपणीचे जीवन संघर्षमय असण्याची शक्यता आहे , परंतु आयुष्याचा मध्य आणि शेवट आनंदी असतो . ते धार्मिक वृत्तीचे असतात. संकटकाळातही ते आपला मानसिक तोल जाऊ देत नाही.

मात्र, त्यांना आयुष्यात खूप मेहनत करावी लागणार आहे . या राशीचे लोक मोजकेच बोलतात परंतु मार्मिक भाष्य करत असतात . आपल्या बोलण्याने ते कधीच कोणालाही दुखवत नाहीत. त्यांच्या स्वभावामध्ये नैसर्गिकरित्या चुंबकीय आकर्षण असते. त्यांच्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर चटकन प्रभाव पडत असतो . त्यामुळे त्यांना मित्रपरिवाराची कमतरता कधीच भासत नाही.

वृषभ राशीच्या लोकांना धार्मिक स्थळी फिरायला खूप आवडत असते . प्रेक्षणीय स्थळांपेक्षा तीर्थक्षेत्राकडे त्यांचा अधिक ओढा दिसून येतो. या राशीच्या लोकांसाठी धार्मिक स्थळे उर्जाकेंद्राप्रमाणे त्यांना प्रेरणा देत असतात . धार्मिक वृत्ती असल्यामुळे देव दर्शन, पूजा विधी, सण संस्कृती यात त्यांना विशेष आवड असते

वृषभ राशीचे लोक स्पष्ट वक्ता असतात. ते आपल्या कुटुंबाला प्राधान्य देतात. या लोकांमध्ये आपुलकीची भावना अधिक असते. या राशीला शनीचे पाठबळ अधिक मिळतात असते . बुध ग्रहदेखील शुभ फळ देतो. वृषभ राशीच्या कुंडलीत बुध उच्चीचा असेल तर ती व्यक्ती खूप बुद्धिमान असते.

वृषभ राशीच्या लोकांनी आग आणि विद्युत प्रवाहापासून स्वताची काळजी घ्यावी . या राशीच्या लोकांसाठी गुलाबी रंग शुभ आहे . फिकट शुभ्र रंगाचे कपडे त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवतात. या राशीच्या लोकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित व्यायाम करायला हवा . अन्यथा विविध आजार त्यांना पटकन होऊ शकतात.

तृतीय घराचा स्वामी चंद्र असल्यामुळे या राशीच्या लोकांना संगीत, नाट्य यात विशेष रस आवड निर्माण होणार आहे . जर चंद्र उच्च स्थानावर असेल तर ते खूप कल्पक बनतात. पराक्रमाचा स्वामी चंद्र अधिक कल्पनाशक्ती देतो. अशा लोकांचे जीवन संघर्षाने भरलेले असते परंतु ते आपल्या प्रयत्नांनी आयुष्याचा मनमुराद आनंद घेतात आणि इतरांना हि देत असतात

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.