नमस्कार मंडळी,
२९ एप्रिल २०२२ रोजी शनी राशी बदल करत आहेत.या राशी बदलामुळे काही राशींच्या जीवनात शनीची साडेसाती सुरु होईल.यामध्ये या व्यक्तींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.आरोग्याच्या काही समस्या येऊ शकतात.विशेष करून हाडांना दुखापत होऊ शकते.प्रत्येक कामामध्ये थोडीशी काळजी घ्या.
अचानक असे काही अनपेक्षित खर्च असे समोर येतील. मात्र नवीन मित्र बनतील, या मित्रांकडून किंवा घरातील मोठ्या भावंडांकडुन आर्थिक लाभ सुद्धा प्राप्त होण्याची शक्यता आहे.स्पर्धा परीक्षेची जे लोक तयारी करत आहेत त्यांच्या साठी शनीचे हे राशी बदल , संक्रमण फायद्याचे ठरणार आहे.जे लोक स्वतःचा व्यवसाय चालवतात त्या लोकांसाठी शनीचे संक्रमण मात्र थोडेसे प्रतिकूल राहील.
त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये तोटा होण्याची धन हानी होण्याची म्हणजे पैशांची हानी होण्याची शक्यता दिसून येते. यामध्ये कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला गरजेपेक्षा जास्त मेहनत , कष्ट करावे लागतील.अशा वेळी शनीची हि साडेसाती कमी करण्यासाठी काही छोटे छोटे उपाय सुद्धा तुम्ही करू शकता.
ज्या लोकांची राशी मीन आहे , हि जलतत्त्व असणारी राशी असून तिचा स्वामी गुरु आहे.तर या मीन राशीची साडेसाती २९ एप्रिल २०२२ पासून प्रारंभ होत आहे. जरी हा थोडा कठीण काळ असला तरी घाबरून जाऊ नका. तुम्ही शनिवार च्या शनी देवांच्या मूर्तीवर मोहरीचे तेल अर्पण करा. मोहरीचे तेल वहा.
रोज शनिवारी सायंकाळी तुम्ही कोणत्याही गोर गरिबांना कपड्यांचे दान करा त्यामुळे शनी साडेसातीचा जो तुमच्यावर वाईट प्रभाव आहे तो बऱ्याच अंशी कमी होतो.धनु राशीच्या लोकांची या साडेसाती पासून सुटका होत आहे, मीन राशीच्या लोकांची साडेसाती सुरु होत आहे, तर कुंभ राशीवर शनी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होत आहे.
त्यांनी सुद्धा सावध राहणे गरजेचे आहे. मकर राशीच्या लोकांसाठी हा तिसरा म्हणजे शेवटचा टप्पा असेल.शनीची साडेसाती हि साडे सात वर्षांची असते , तिला अडीच वर्षांमध्ये विभागले जाते त्यामुळे प्रत्येकी ३ टप्पे असतात.प्रत्येक राशीच्या लोकांना आयुष्यामध्ये ३ वेळा हि शनीची साडेसाती सहन करावी लागते.
या काळामध्ये शनिदेव त्यांना त्यांच्या कर्माचे फळ प्रदान करत असतात आणि म्हणून कर्माचे फळ प्रदान करणारी हि देवता आहे.