नमस्कार मंडळी
या आठवड्याच्या सुरुवातीपूर्वी अनेक ग्रहांच्या राशी बदलल्या असून . सूर्य, मेष राशीत तर राहू-केतू यांनीही आपली जागा बदलली आहे. दुसरीकडे, आनंद घेऊन येणार शुक्र देखील १७ एप्रिल रोजी राशी बदलत आहे. या सर्व बदलांचा परिणाम येत्या आठवड्यात सर्व राशींच्या आर्थिक स्थितीवर नक्कीच होणार आहे
मेष राशी : या आठवड्यात कामाच्या ठिकाणी काहींना निराशाजनक बातम्या मिळाल्याने मन उदास असणार आहे . या आठवड्यात महिलांवरील आर्थिक खर्चात वाढ होणार आहे . प्रेमसंबंधातील समस्या संभाषणातून सोडवता आल्यास बरे होईल. या आठवड्यात प्रवास पुढे ढकलणे चांगले, अन्यथा त्रास वाढणार आहे . आठवड्याच्या शेवटी उत्तरार्धात कौटुंबिक बाबतीत अचानक सुखद बदल दिसून येणार आहे आणि मन प्रसन्नली राहील. आठवड्याच्या शेवटी वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने जीवनात सुख-समृद्धी येणार आहे . शुभ दिवस : १९ ,२२
वृषभ राशी : या आठवड्यापासून हळुहळू कार्यक्षेत्रात बरेच बदल दिसून येणार आहे आणि तुम्ही नवीन प्रकल्पाकडे आकर्षित होणार आहे . आर्थिक बाबतीत सामान्यपेक्षा चांगले यश मिळेल. कुटुंबात परस्पर प्रेम वाढू शकते . सप्ताहाच्या शेवटी आनंदी बातमी मिळू शकणार आहे . शुभ दिवस : १७ ,१९ ,२० ,२२
मिथुन राशी : कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे आणि तुम्ही तुमच्या कामात पुढे जाण्यास सक्षम असाल. आर्थिक लाभासाठीही मजबूत परिस्थिती निर्माण होणार आहे आणि उत्पन्नाचे नवे स्रोतही उघडू शकतात. या आठवड्यापासून तुमच्या आरोग्यात बरीच सुधारणा दिसून येईल. कुटुंबातही तुम्ही आतून एखाद्या गोष्टीबद्दल नाराज राहणार आहे आणि ती गोष्ट उघडपणे व्यक्त करू शकणार नाही. या आठवड्यात प्रवासातून शुभ परिणाम मिळणार आहे . वीकेंडमध्ये मन थोडे अस्वस्थ असणार आहे . शुभ दिवस : १७ ,१८ ,१९ ,२१
कर्क राशी : कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि मान-सन्मान वाढणार आहे . नवीन कामात यश मिळविण्यासाठी हा सर्वोत्तम काळ ठरणार आहे हा आठवडा सुद्धा केलेल्या प्रवासाचे शुभ परिणाम मिळवून देणारा आठवडा असणार आहे . तुमच्या गुंतवणुकीचा निर्णय स्वतः घ्याल तेव्हाच आर्थिक लाभ होईल. आरोग्यातही सुधारणा होणार आहे . कुटुंबात तणाव वाढू शकतो आणि संघर्षाची परिस्थिती वाढेल. आठवड्याच्या शेवटी खर्च जास्त होईल. शुभ दिवस : १७ ,२१
सिंह राशी : कामाच्या ठिकाणी चांगली परिस्थिती निर्माण होणार आहे . आर्थिक लाभही होईल. या आठवड्यात केलेले प्रवास शुभ परिणाम देणार आहे . आठवड्याच्या शेवटी तणाव वाढू शकतो,कौटुंबिक कलह वाढण्याची शक्यता आहे . शुभ दिवस : १७ ,२१
कन्या राशी : या आठवड्यात केलेले प्रवास शुभ देणार आहे आणि मन शांत असणार आहे . नोकरीच्या ठिकाणी कोणतेही भागीदारीचे काम तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही आणि त्रास वाढ होणार आहे . तुमच्या आळशीपणामुळे आर्थिक खर्चही जास्त होईल . कुटुंबातील वृद्ध व्यक्तीमुळे मानसिक त्रास चालू असणार आहे आठवड्याच्या शेवटी अनावश्यक खर्च वाढणार आहे आणि याकडे लक्ष देण्याची गरज असणार आहे . शुभ दिवस : १९ ,२१
तूळ राशी : कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे आणि तुमच्या कार्यशैलीत खूप बदल होणार असून . आर्थिक लाभ होईल, सुरुवातीला मन कोणत्याही गुंतवणुकीबाबत थोडे साशंक असतील , पण शेवटी यश मिळणार आहे . या आठवड्यापासून तब्येतीतही बरीच सुधारणा दिसून येणार आहे. ध्यान आणि योगामुळेही आरोग्य वाढणार आहे . कुटुंबातील एक पितृ व्यक्ती पुढे येऊन तुमच्या जीवनात आनंद आणि शांती आणण्यास मदत होईल . या आठवड्यात प्रवास पुढे ढकलणे चांगले असणार आहे . सप्ताहाच्या शेवटी मन काहीसे चिंतेत राहू शकते. शुभ दिवस : १७ ,१८ ,१९ ,२०
वृश्चिक राशी : या आठवड्यात तुमच्या तब्येतीत बरीच सुधारणा होणार आहे . कुटुंबात सुख-समृद्धीचे योग जुळून येणार आहे आणि तुमच्या संयमाने अनेक समस्या सोडवल्या जातील. या आठवड्यात केलेल्या प्रवासातून सध्या यश मिळेल. या आठवड्यात आर्थिक खर्चही जास्त होणार आहे . आठवड्याच्या शेवटी व्यवहारिक निर्णय घेणे तुमच्या हिताचे असणार आहे . शुभ दिवस : १६ ,१९ ,२० ,२१
धनु राशी : कार्यक्षेत्रात शुभ परिणाम होणार आहे आणि यश मिळणार आहे . या आठवड्यापासून आरोग्यातही चांगली सुधारणा दिसून येणार आहे . कुटुंबातील ज्येष्ठांच्या आशीर्वादाने जीवनात सुख-शांती संभावना आहे . या आठवड्यात सहली पुढे ढकलल्यास चांगले होणार आहे .
प्रेमसंबंधात नवीन सुरुवात केल्यास जीवनात आनंददायी प्रसंग येऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या भविष्याबाबत काही ठोस नियोजन करणार आहे . शुभ दिवस : १६ ,१७ ,१९ ,२० ,२२
मकर राशी : आर्थिक बाबींसाठी वेळ अनुकूल असणार आहे आणि आर्थिक लाभाची परिस्थितीही निर्माण होणार आहे . या आठवड्यात तुम्हाला या संदर्भात काही आनंददायी बातमी देखील मिळण्याची शक्यता आहे . कार्यक्षेत्रात साधे यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये परस्परांमधील नात आणखी घट्ट होणार आहे . आठवड्याच्या शेवटी तुम्ही थोडे निराश असाल . शुभ दिवस : १६ ,१८ ,१९ ,२१
कुंभ राशी : कामाच्या ठिकाणी आराम मिळणार आहे आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण होणार आहे . या आठवड्यात केलेल्या प्रवासाचेही शुभ परिणाम दिसूसून येणार आणि प्रवास यशस्वी होतील. या आठवड्यात खर्च जास्त होण्याची शक्यता आहे . सप्ताहाच्या शेवटी वेळ चांगला जाईल आणि मन प्रसन्न असणार आहे . शुभ दिवस : १६ ,१७ ,२१ ,२२
मीन राशी : कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे आणि मान-सन्मान वाढेल. तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असणार आहे . या आठवड्यापासून आर्थिक लाभासाठी चांगली परिस्थिती निर्माण होणार असून , प्रेमसंबंधात जुन्या आठवणी ताज्या होणार आहे . कौटुंबिक बाबींमध्ये तुम्ही खूप व्यस्त असणार आहे . या आठवड्यात सहली पुढे ढकलणे चांगले होणार , अन्यथा मन एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या चिंतेने घेरले जाऊ शकणार आहे . या आठवड्यात आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज असणार आहे . शुभ दिवस : १६ ,१७ ,२० ,२२