नमस्कार मंडळी
“ॐ कालभैरव नमः” हा कालभैरवाचा जप मंत्र आहे. आज दररोज एक माळ अवश्य करावा जपासाठी रुद्राक्षांची माळ वापरावी. स्फटिक माळ असले तरी चालते महिला देखील हा जप करू शकतात. भैरव प्रहार हा रात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत असतो. या प्रवाहात सेवा केल्यावर ती सेवा अधिक उपयोगी फायदेशीर ठरते. घरी देवघरात श्री काळभैरवाची पूजा करू नये. मात्र घरी काळभैरवा चा फोटो हा मुख्य प्रवेश द्वार यांच्या समोरच्या भिंतीवर सहा फुटाचा वर लावावं.
आधाराला काहीतरी असावे फोटो तसाच टांगू नये. दररोज फोटोची पूजा करून धूप दीप दाखवावे. दररोज घरातली एका व्यक्तीने रात्री उत्तरेकडे तोंड करून बसून समोर चार ते पाच उदबत्ती लावून अकरा वेळा श्री कालभैरव अष्टक स्तोत्र हे नियमित एकाग्रचित्ताने व श्रद्धेने म्हणावे. त्यानंतर उदबत्तीची पडलेली राख आहे घरातील सर्वांनी कपाळावरती उतरती लावावी. श्री काळभैरव यांस सोमवारी किंवा अमावस्या दुपारी चार नंतर ठेवून हार नारळ ठेवून आपल्या अडचणी किंवा संकट मुक्तीसाठी विनंती करावी
श्री कालभैरव जयंती ११ किंवा १०८ वेळा कालभैरव अष्टक स्तोत्र चे हवन करून श्री कालभैरव यांना बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात व लिंबू यांचा नैवेद्य दाखवून. श्री कालभैरव यांच्या मंदिरात जावं. कालभैरव यांच्या मंदिरात गेल्यानंतर हार नारळ व खडीसाखर हातात घेऊन त्यांना पुढीलप्रमाणे विनंती करावी मी अमुक नावांचा भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असून स्वामी सेवा केंद्रातील मार्गदर्शनानुसार माझ्या अमुक कामासाठी तुमच्या चरणी श्रीफळ अर्पण करत आहे.
आपण कृपा करून माझे काम करावे अशी विनंती करून अकरा वेळा श्री कालभैरव अष्टक स्तोत्र म्हणावे त्यानंतर आपले इच्छित काम झाल्यानंतर पुन्हा एकदा श्री काळभैरव यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आभाराचे श्रीफळ अर्पण करावे. आता आपण श्री कालभैरव अष्टक याचे महत्त्व जाणून घेऊयात. सुमारे आठव्या शतकामध्ये श्रीआदि शंकराचार्यांनी आपल्या भक्ती स्पर्शाचा अल्पशा काळात प्रचंड कार्य केले आहे.
मानवाच्या कल्याणासाठी आणि स्तोत्रांची रचना केली आहे त्यांनी लिहिलेल्या अनेक स्तोत्रम् बाकी कालभैरवा ची उपासना म्हणून कालभैरव अष्टक स्तोत्र हे स्तोत्र प्रचंड शक्तिशाली व प्रभावी स्तोत्र आहे. या स्तोत्रात एकूण नऊ श्र्लोक असून पहिले आठ श्लोक हे श्री काळभैरवाचे स्तुती चे असून नऊवा श्र्लोक फळश्रुती चार आहे .कालभैरवाष्टक हे प्रभावी स्तोत्र असून याची वाचनाची वेळ ही संध्याकाळ ची असेल तर अति उत्तम प्रत्येक व्यक्तीने अथवा सेवेकर्याने दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक वेळ तरी बोलावे.
अतिशय गंभीर संकट काळी रोज अकरा वेळा उदबत्ती लावून बोलावे. हा पाठ सुरू करण्यापूर्वी आपण कशासाठी हा पाठ करत आहोत त्याचा संकल्प करून श्री कालभैरव यांना विनंती करून नियमित व श्रद्धेने की सेवा करावी तुम्हाला नक्कीच संकट मुक्तीचा मार्ग सापडेल. कालभैरव स्तोत्र अकरा वेळा वाचत असताना पहिली दहा वेळा फक्त आठ श्र्लोक पर्यंत बोलावे व शेवटी नवव्या श्लोक सहीत म्हणजे फलश्रुती सहीत बोलावे.
नियमित व श्रद्धेने केलेला अकरा वेळा श्री कालभैरव अष्टक स्तोत्र ने आपल्या कुटुंब भवती कालभैरव महाराजांचे सौरक्षण कवच तयार होते. अनेक मोठ्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो. मनातील नैराश्य भीती नाहीशी होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या हक्काचे बाहेर अडकलेले पैसे मग ती मोठ्यातील मोठी रक्कम का असेना ती आपल्या नक्कीच परत मिळते. त्या शिवाय कौटुंबिक त्रासातून मुक्ती मिळते.
कोणत्याही शुभ दिवशी घरामध्ये एक कणकेचा दिवा तयार करा त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला दोन अशा वाती तयार करा म्हणजे एका दिवात दोन वाक्य असतील. त्या कणकीच्या दिव्या मध्ये तिळाचे तेल घाला. आणि त्या दिव्या मध्ये चिमूटभर पिवळी मोहरी घाला. मग हा कणकेचा दिव सायंकाळी चा श्री बटुक भैरव नाथ महाराजांच्या मंदिरात जाऊन लावावा. त्या नंतर श्री बटुक भैरव नाथ महाराजांना आपले नाव सांगून तुमच्या अडचणी बद्दल विनंती करावी.
श्री बटुक भैरव नाथ महाराजांना प्रार्थना करून तो दिवा तिथेच लावून ठेवावा. व त्यानंतर “ओम शौंन शौंन भैरवाय नमः” बोलावे व घरी परत यावे श्रद्धेने व मनामध्ये कोणताही कपडे भाव न ठेवता श्रद्धेने पूजा करावी काही लोकांचा परिसर परिसरामध्ये बटुक नाथ महाराजांचे मंदिर नसतं अशा वेळेस त्यांनी हा उपाय पिंपळाच्या झाडाखाली केला तरी चालतो.आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा श्री कालभैरवनाथ महाराज की नेहमी प्रामाणिक व शुद्ध तळमळीला धावून येतात नेहमी आपले मन हृदय व नियत स्वच्छ ठेवावे.
आपल्या घरी आपल्या स्वामींचा अधिष्ठान नक्की असायला हवा आपल्या नित्यसेवा मध्ये स्वामींचे तीन अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृत व ११ माळी श्री स्वामी समर्थ हा जप नक्की करावा कळभैरव अष्टक वाचण्यापूर्वी नेहमी एक माळ स्वामी समर्थ हा जप श्रद्धेने करा. सेवा नक्कीच सफल होईल