शुन्यातून करोडपती कसे व्हायचे ?

नमस्कार मंडळी

आपण बऱ्याच ठिकाणी असे पाहिले असेल किंवा अनुभवले असेल की श्रीमंत लोक अजून श्रीमंत आणि गरीब अजून गरीब होत चालला आहे. जेव्हा आपण स्टॅटिक स्टिक पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की या जगात मध्ये ७० टक्के लोक हे अब्जाधीश आहे. हे ७० टक्के अब्जाधीश हे शुन्यातून अब्जाधीश झाले आहे.

म्हणजे त्यांच्याकडे काही नसताना त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर अमाप संपत्ती कमवली. हे पाहून असं लक्षात येतं की या जगात कोणतीही व्यक्ती भले आता त्याच्याकडे काही नाही पण त्याने दृढ निश्चय केला तर तो एक दिवस नक्कीच करोडपती अब्जाधीश होऊ शकतो. या ७० टक्के अब्‍जाधीश लोकांमधले पाच कॉमन नियम आज आपण जाणून घेणार आहोत.

पहिला नियम आहे मनात शंभर टक्के विश्वास असू द्या की मी करोडपती होणारच श्रीमंत होण्याची सुरुवात तुमच्या श्रीमंत मानसिकतेतून होते. तुमच्या मनामध्ये शंभर टक्के विश्वास पाहिजे कि एक दिवस मी नक्की करोडपती होणारा आणि यामध्ये तुम्हाला जरासुद्धा संशय नसावा. मराठी माणूस सर्वात मोठी चूक करतो त्याला असं कधी वाटतच नाही. कि आपण सुद्धा आयुष्यात करोडपती होऊ शकतो. अब्जाधीश होऊ शकतो.

त्याला असे वाटतं करोडपती फक्त गुजराती-मारवाडी होऊ शकतात. आता तुम्हीच विचार करा तुम्ही साधा करोडपती होण्याचा विचारच करत नसाल. तर तुम्ही वास्तविक आयुष्यामध्ये कसे करोडपती व्हाल. वॉरन बफेट त्यांची सहा लाख करोड पेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यांनी लहानपणी शपथ घेतली होती. जर मी तीस वर्षाच्या आत मिलेनियर झालो नाही तर मी बिल्डिंग वरून उडी मारेल त्यामुळे मनात एक विचार पक्का करून ठेवा. एक दिवस नक्की करोडपती होणार.

दुसरी गोष्ट आहे. तुमचे करोडपती होण्याचे ध्येय गाठण्यासाठी कॅल्क्युलेशन करा. जसं पहिला पॉईंट मध्ये आपण पाहिले कोणतेही ध्येय गाठण्यासाठी स्व:तावर विश्वास पाहिजे. की मी ते ध्येय पूर्ण करू शकतो. जर तुम्ही करोडपती होण्याचे ध्येय ठेवले असेल तर आता जरा तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचा आहे. कोण कोणत्या मार्गाने मी पैसे कमवू शकतो. जसे की तुम्हाला दहा हजार लोक शोधावे लागतील की त्यांना तुम्ही एक हजाराची प्रॉडक्ट् विकू शकता.

तेव्हा तुम्हाला एक करून मिळतील. किंवा तुम्हाला दहा हजार असे लोकं शोधावे लागतील ते तुम्हाला शंभर रुपये बारा महिने देतील. तेव्हा तुम्ही महिन्याला दहा लाख आणि एका वर्षाला एक करोड तीस लाख कमवू शकाल. सांगायचा मुद्दा ध्येय ठेऊन गप्प बसू नका. योग्य कॅल्क्युलेशन करून त्याच्यावर काम करायला सुरुवात करा.

तिसरी गोष्ट आहे तुमची उत्पादनाचे मार्ग वाढवा. एकदा तुम्ही कॅल्क्युलेशन केले की तुम्हाला जाणीव होईल की करोडपती होणे जास्त अवघड नाही. आता तुम्हाला उत्पन्नाचे मार्ग वाढवण्या वरती भर द्यायचा आहे. आज इंटरनेट च्या युगामध्ये तुम्ही अनेक मार्गाने पैसे वाढवू शकता. जसा की यूट्यूब चैनल, ब्लॉग्स, ॲप बनवून. मार्केटिंग, वेब डिझाईनिंग, ई-कॉमर्स, किंवा रियल इस्टेट, शेअर मार्केट एखादा साइड बिझनेस, टिचिंग असे बरेच काही वगैरे वगैरे

चौथा आहे. कोणत्या प्रकारच्या लोकांकडून तुम्ही पैसे मिळवू शकता. त्यांचा शोध घ्या. स्वतःला एक प्रश्न विचारा माझा पैसा नक्की कोणाकडे आहे. म्हणजे तुमच्या आजूबाजूला अशी कोणती लोक आहे ज्यांना तुम्ही तुमचे प्रोडक्ट विकू शकता. किंवा सर्विस देऊ शकता जसे की डॉक्टर ,वकील, विद्यार्थी, शिक्षक, व्यवसायिक, नोकरदार, यांची एक यादी बनवा आता तुम्ही या लोकांना कोणत्या प्रॉडक्ट विकू शकता

किंवा त्यांना कोणती सर्विस देऊ शकता. किंवा त्यांना असे कोणते मार्गदर्शन करू शकता ज्याचे ते तुम्हाला पैसे देतील यांचा विचार करा.असे केल्याने तुम्हाला वेगळ वेगळया कल्पना सुचतील. या जगात पैशांची कमी नाहीये. तुम्हाला फक्त योग्य नियोजन करून अशा व्यक्तींचा शोध घ्यायचा आहे. ज्यांना तुमची गरज आहे.

पाचवी गोष्ट आहे तुमचा खिसा नेहमी रिकामा ठेवा. तुम्ही कितीही पैसे कमवा तुमचा खिसा नेहमी रिकामा ठेवा. याचा अर्थ काय तुमच्याकडे पैसे यायला सुरुवात झाली. की लगेच त्याची चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा. ते पैसे बँकेमध्ये साठवून ठेवू नका. कारण जेव्हा आपल्याकडे पैसे असतात तेव्हा आपण आनवश्यक खर्च करतो.

तेव्हा मग आपण गरज नसलेल्या गोष्टी सुद्धा विकत घेतो. अशाने वायफळ खर्च होतो. आणि याचे दुसरे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही पैशाला कामाला लावतात. तेव्हा तो पैसा अजून जास्त पैसे तुम्हाला करून देतो. आणि तुमची श्रीमंती कडे वाटचाल होते. बँकेत कमी पैसे असण्याचा अजून एक फायदा म्हणजे तुम्हाला अजून पैसे कमवण्यासाठी मोटिवेशन मिळते

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *