फेब्रुवारी २०२२ राशी फळ ४ राशींचे भाग्य चमकणार ४ राशींसाठी राजयोग तर ४ राशींचे भारीनुकसान

नमस्कार मंडळी,

फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली असून या महिन्यात ग्रह नक्षत्रात अनेक बदल घडून येणार आहे. फेब्रुवारी मध्ये बनत असलेली ग्रह दशा काही राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार असून काही राशींवर मात्र नकारात्मक परिणाम दिसून येईल.फेब्रुवारी मध्ये बनत असलेली ग्रह दशा , ग्रहांची होणारी राशांतरे आणि ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्तिथीचा ४ राशींवर अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल.

यांच्या जीवनातील आर्थिक समस्यांचा काळ आता समाप्त होणार असून पैशांची आवक वाढणार आहे. धन लाभाचे योग जमून येणार आहेत.या काळात धन लाभाचे योग जुळून येणार आहेत.आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल असणार आहे. त्यांच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. तर या ४ राशींच्या जीवनात राजयोगाचे संकेत आहेत. सुख सौभाग्य आणि ऐश्वर्यात वाढ होणार आहे.

सर्वच कामासाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश मिळणार आहे. उद्योग व्यापार असो किंवा समाज राजकारण असो , कार्यक्षेत्र , नोकरी , कला साहित्य अशा अनेक क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होणार आहे. तर इतर ४ राशींसाठी फेब्रुवारी महिना त्रासदायक ठरू शकतो.तुमच्या जीवनात अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

एकूण ८ राशींसाठी हा महिना लाभकारी ठरणार असून ४ राशींसाठी मात्र नकारात्मक ठरणार आहे. चला तर जाणून घेऊयात तुमच्या राशीला कोणते फळ प्राप्त होणार आहे.

मेष – मेष राशी साठी फेब्रुवारी महिना शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. सूर्य गुरु शुक्र आणि शनी हे तुमच्या साठी शुभ फळ देणार आहेत.नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल असणार आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून नोकरीची कामे पूर्ण करण्याचे संकेत आहेत.

तुमच्या काम करण्याच्या उत्साहात वाढ होणार आहे. प्रत्येक कामात यश प्राप्त होत असल्याने काम करण्याच्या उत्साहात वाढ होणार आहे. या काळात आरोग्य उत्तम राहण्याचे संकेत आहेत. पैशाची आवक वाढणार आहे. अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल.उद्योग व्यापारात मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे.

वृषभ- या राशीसाठी फेब्रुवारी महिना थोडासा अडचणींचा किंवा त्रासदायक ठरू शकतो. सूर्य आणि बुध हे शुभ फळ देणार असले तरी मंगल शुक्र राहू हर्षल हे अडचणींमध्ये वाढ करणार आहेत. उद्योग व्यापारात आर्थिक अडचणी वाढू शकतात. या काळात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मित्र परिवाराची हवी तशी साथ तुम्हाला लाभणार आहे. या काळात तुम्हाला हित शत्रूंपासून त्रास होऊ शकतो. भोळेपणाने वागणे सोडून द्यावे लागेल.

मिथुन – या राशीसाठी फेब्रुवारी महिना सर्वच दृष्टीने अनुकूल असणार आहे. गुरु शुक्र केतू हर्षल हे तुमच्या साठी लाभदायक ठरणार आहे. उद्योग व्यापारात भरपूर प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. भाग्याची भरपूर साथ तुम्हाला लाभणार आहे.व्यवसायात तुम्हाला लाभ प्राप्त होईल.भागीदारमध्ये सुरु केलेले व्यवसाय लाभदायक ठरू शकतात.

राजकारणामध्ये यश प्राप्त होणार आहे.या काळात कोणावरही अति विश्वास ठेवून चालणार नाही किंवा अति विश्वास ठेवू नका. रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या कमाईमध्ये वाढ दिसून येणार आहे.घर परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयन्त करणार आहात.व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल असणार आहे.घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल.

कर्क- या राशीसाठी हा महिना मिश्र फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.काही कामांमध्ये अडचणींमध्ये वाढ होणार असून काही कामात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळू शकते.हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.या काळात तरुण तरुणीच्या जीवनात विवाहाचे योग जामुं येतील.आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे खर्चाचे प्रमाण देखील वाढू शकते. व्यवसायातून आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल.

सिंह – या राशीसाठी हा महिना अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. गुरु शुक्र शनी आणि राहू हे तुमच्या साठी शुभ फळ देणार आहेत.कुटुंबातील लोकांवर तुमचे प्रेम वाढणार आहे किंवा कुटुंबातील लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या काळात मनापासून प्रयन्त करणार आहात.

पारिवारिक सुखात वाढ होणार आहे. उद्योग व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार असून या काळात भरभराटीचे दिवस तुमच्या वाटेला येणार आहे.या काळात नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील.खर्चामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते यामुळे अनावश्यक खर्च सुद्धा टाळावा लागेल.

कन्या – या राशीसाठी अडचणींचा ठरू शकतो फेब्रुवारी महिना , या काळात भाऊ बंधकीमध्ये वाद वाढू शकतात.या काळात भागीदारी किंवा उद्योग व्यवसायात भांडणे होऊ शकतात.आर्थिक प्राप्तीसाठी धावपळ तुम्हाला करावी लागेल.या काळात तुम्हाला अतिशय कुशल बुद्धिमत्तेचा वापर करून वागावे लागेल.सोबतच रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

तूळ – तूळ राशीसाठी हा महिना अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. या काळात मंगळ बुध गुरु आणि शुक्र हे तुमच्या साठी शुभ फळ देणार आहेत.नोकरीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहेत.आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल असणार आहे.हित शत्रूंपासून सावध राहणे आवश्यक आहे.शत्रूवर करडी नजर ठेवणे हिताचे असणार आहे.या काळात संततीची काळजी घेणे आवश्यक आहे.नोकरीच्या कामात बदल घडून येऊ शकतो.सहकाऱ्यांची चांगली मदत मिळणार आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

वृश्चिक – या राशीसाठी संमिश्र स्वरूपाचा ठरू शकतो हा महिना.नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. बेरोजगारांना नव्या रोजगाराची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत. एखादा छोटासा लघुउद्योग सुरु करण्यासाठी काळ विशेष अनुकूल असणार आहे.हाती घेतलेल्या कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल.

धनु / मकर – या राशीसाठी हा महिना लाभदायक ठरणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असणार आहे.नोकरीमध्ये यश प्राप्त होईल या काळात तुमच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येतील आरोग्याची देखील विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तरुण तरुणीच्या जीवनात विवाहाचे योग जमून येतील.परिवारात सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. महत्व पूर्ण व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे. आर्थिक प्राप्ती समाधान कारक असेल.या काळात तुमच्या जीवनात आनंदायी घडामोडी सुद्धा घडून येणार आहेत.

कुंभ – हा महिना या राशीसाठी थोडासा अडचणींचा ठरू शकतो.उद्योग व्यापारानिमित्त प्रवास घडून शकतात.या काळात मनाला हवे तसे यश प्राप्त होणार नाही. मित्र मंडळी लोकांची हवी तशी मदत तुम्हाला लाभणार नाही. आर्थिक प्राप्तीमध्ये सुधारणा घडून येण्याचे संकेत आहेत. नोकरी मध्ये अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.या काळात जपून वागणे हिताचे ठरणार आहे.

मीन – हा महिना या राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे. या महिन्याच्या शेवटी परिस्थती अनुकूल असणार आहे. काळ अनुकूल असल्याने हाती घेतलेल्या कामांना यश मिळू शकते.नोकरीमध्ये तुम्हाला आनंद देणाऱ्या घटना घडून येणार आहेत.शेतीतून आर्थिक आवक वाढणार आहे.अध्यात्मिक आवड या काळात निर्माण होऊ शकते.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *