नमस्कार मंडळी,
सुखी मनुष्य हि व्याख्या आजकालच्या या जगामध्ये दिसतच नाही. प्रत्येकजण आपल्या सुखासाठी धडपडत करत असताना दिसत असतो प्रत्यकाला वाटते आपले आयुष्य खूप सुंदर असावे , कधीच कशाचीच कमतरता नसावी, सुख समृद्धीने भरलेले , पैसा पाणी सगळे कसे नीट असायला हवे . भरपूर अशा गोष्टी आहेत जिथे पैसा लागतो. पैशाशिवाय काहीच काम होत नाही.
खूप लोक आहेत ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. पैशाअभावी मन मारावे लागते. खूप इच्छा मनातच ठेवाव्या लागतात. खूप लोक असे आहेत कि त्यांना त्यांची स्वप्ने सुद्धा पूर्ण करता येत नाही.भरपूर मेहनत करून सुद्धा कधी कधी त्याचे पाहिजे तसे फळ मिळत नाही. यावर खूप उपाय सुद्धा केले जातात त्यामुळे थोडाफार फरक जाणवतो.
जेव्हा पैसे यायला सुरुवात होते किंवा परिस्थिती सुधारते तेव्हा आपण देवाला आणि त्या उपायाला विसरून जातो. जेव्हा पुन्हा काही समस्या येतात तेव्हा देवाची आठवण होते. जेव्हा तुम्ही काही ठरवता काही नियम स्वतःला लावून घेता तर शेवटपर्यंत त्या नियमांचे पालन केले पाहिजे. चला तर आज असेच काही उपाय पाहुयात ज्याने आर्थिक अडचण कमी होण्यास मदत होईल. घरामध्ये पैसा सतत येईल.
आज काही उपाय पाहुयात जे गुरुवारी करू शकतो ज्यामुळे चारही दिशांनी तुम्हाला यश मिळेल.गुरुवारी श्री विष्णूंचे व गुरूंचे पूजन केल्याने लाभ होतात.गुरुवार हा धनलक्ष्मी चा सुद्धा वर असल्याने काही उपाय केले तर तर परिणामकारक ठरतात. हातामध्ये पैसे राहत नसतील किंवा धन येण्याचे मार्ग बंद झाले असतील तर गुरुवारी हे काही उपाय करून पहा.
चला तर पाहुयात काही उपाय ज्याने धन येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि घरात सुख समृद्धी भरभरून येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा हे उपाय गुरुवारीच करायचे आहे मग तो कोणताही गुरुवार असो.
१) गुरुवारची सकाळी अंघोळ केल्यानंतर तुळशीला २ ते ३ चमचे कच्चे दूध अर्पण करायचे आहे. हे केल्यामुळे आर्थिक अडचणी लवकरात लवकर कमी होऊन पैसा येईल.२) गुरुवार हा श्री विष्णूंचा आवडता दिवस आहे तसेच दत्त गुरूंची पूजा सुद्धा ह्याच दिवशी केली जाते. आणि असे म्हंटले जाते कि पिवळा रंग हा श्री विष्णूंना आवडणारा रंग आहे. म्हणून शक्यतो गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालावे. असे केल्याने तुम्ही हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल.कपडे नसतील तर पिवळा रुमाल जवळ ठेवावा.
३) गुरुवारच्या दिवशी जर काही महत्वाचे काम करण्यासाठी बाहेर पडायचे असेल तर त्या दिवशी पिवळ्या रंगाची मिठाई आणून श्री विष्णू किंवा माता लक्ष्मी ला प्रसाद म्हणून दाखवावा आणि नंतर हा प्रसाद घेऊन मगच बाहेर पडावे.
४) शक्य असेल तर प्रत्येक गुरुवारी श्री विष्णूंच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले पाहिजे आणि पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी. जर श्री विष्णू आणि लक्ष्मीचे मंदिर नसेल आसपास तर दुसऱ्या कोणत्यापण मंदिरात जाऊन पिवळी फुले अर्पण केली पाहिजे.
गुरुवारच्या दिवशी जर श्री विष्णू किंवा दत्त गुरूंचे नामस्मरण केले तर पुण्य मिळते. गरजू लोकांना मदत करा आणि जमत असेल तर अन्न दान सुद्धा करा. श्री विष्णूनसोबत माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला मिळतो म्हणजेच पैशाची अडचण दूर होऊन धन संपत्ती ने घर भरून जाते.