नमस्कार मंडळी,
आजकाल तुम्ही पाहता प्रत्यकाला काही ना काही शारीरिक त्रास असतोच , तसेच पायांना भेगा पडणे हा त्रास सर्वानाच आढळून येतो. काही लोकांना हा त्रास थंडीच्या दिवसांमध्ये जाणवतो , काही ना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. काही लोकांना जळवाताचा सुद्धा त्रास जाणवतो आणि त्याने सुद्धा पायाला भेगा पडतात.
किती हि उपाय केले किती हि क्रीम्स वापरल्या तरी त्या त्या दिवसांमध्ये त्या भेगा पडतातच. चला तर जाणून घेऊयात त्यावर एक साधा आणि घरघुती उपाय ज्याने तुमचे पाय अतिशय मुलायम आणि भेगांरहित होणार आहे. हा उपाय नीट समझून घ्या आणि योग्य पद्धतीने करा त्यानंतर तुमच्या टाचेवर एक हि भेग तुम्हाला दिसणार नाही.
हा उपाय करताना प्रत्यके गोष्ट नीट समझून घ्या , कोणत्या गोष्टीच किती प्रमाण हे जाणून घेणे घरजेचे आहे. त्या साठी तुम्हाला लागणार आहे एक बटाटा , आयुर्वेदामध्ये बटाटाचे खूप मोठे स्थान आहे. हा बटाटा साल न काढता तसाच किसणीच्या साहाय्याने किसून घ्या. किसून घेतल्यानंतर मिक्सर मधून बारीक करून गाळणीच्या साहाय्याने त्याचा रस काढायचा आहे. साधारणपणे ४ – ५ चमचे रस असेल तरी चालेल.
बटाटाच्या रसामध्ये अर्धा लिंबूचा रस टाकायचा आहे. लक्षात असुद्या अर्धाच लिंबू हवं आहे. त्यांनतर अर्धा चमचा मीठ हवे आहे . घरामध्ये कोणतंही टूथ पेस्ट असली तर ती अर्धा चमचा घ्यायची आहे.हे चारही गोष्टी एकत्र करून एक मिश्रण तैयार करायचे आहे.हे मिश्रण तैयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कि ह्या सर्व गोष्टी छान एकमेकांमध्ये मिक्स झाल्या पाहिजे.
आता ह्या मिश्रणामध्ये जे आपण अर्धा लिंबू वापरले आहे तेच या मध्ये बुडवून टाचेच्या भेगांवर घासायचे आहे म्हणजेच हलक्या हाताने मसाज करायचा आहे. जेणेकरून त्या भेगांमध्ये हे मिश्रण गेले पाहिजे. ५-१० मिनिटे मसाज केल्यानंतर २०-२५ मिनिटे ते तसाच ठेवायचे आहे. त्यानंतर साध्य पाण्याने पाय धुवून घ्यायचा आहे आणि नंतर थोडे गरम पाण्याने सुद्धा पाय धुवायचे आहे
हा उपाय तुम्ही कधी पण करू शकता पण हा उपाय केल्यानंतर एक काळजी घ्यायची आहे कि पायाला कोणतीही घाण लागता कामा नये धूळ माती काही हि. म्हणूनच हा उपाय राती झोपण्या पूर्वी करणे अतिशय उत्तम आहे. हा उपाय केल्यानंतर पायांना सॉक्स घाला म्हणजे अजून चांगला इफेक्ट जाणवेल.