नमस्कार मंडळी
आलेलं वर्ष २०२२ हे आपल्याला कसं जाईल हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. आणि त्यातही सगळ्यात मोठी चिंता असते ती साडेसातीची ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रहांमध्ये शनी हा संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनिदेव आपल्या राशी चक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे तीस वर्षे लावतात. अशा स्थितीमध्ये २०२२ मध्ये शनिच राशि परिवर्तन होणार आहे. शनी कुंभ राशीत प्रवेश करेल.
शनिच्या राशी परिवर्तन बदलामुळे काही राशिन वरती याचा परिणाम दिसून येईल. यादरम्यान काही राशींना शनी दशा आणि शनिच्या साडेसातीला सामोरे जावे लागेल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशी आहेत त्यांना शानिच्या साडेसातील सामोरे जावे लागणार आहे. आणि कोणत्या राशीची या मधून सुटका होईल.
२०२२ मध्ये १ जानेवारी ते २९ एप्रिल या कालावधीत मिथुन आणि तूला या लोकांवरती शनीची दशा असेल. त्यानंतर १२ जुलै पर्यंत कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शानि दशा राहील. मकर राशीत शनी ने गोचर केल्यानंतर मिथुन आणि तूळ राशींच्या लोकांवरती शनीची दशा असेल.त्याना १७ जानेवारी २०२२ ते २०२३ पर्यंत शनी दशा ला समोर जावे लागेल.
आता बघु साडेसाती कोणाला असेल.१ जानेवारी २०२२ ते २९ एप्रिल या कालावधीमध्ये धनु मकर आणि कुंभ राशीच्या लोकांवर साडेसाती प्रभाव राहील २९ एप्रिल रोजी शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच मीन राशि चा लोकांवर साडेसाती सुरू होईल.तर धनु राशीच्या लोकांना काही काळा का होईना पण साडेसाती च्या काळातून मुक्ती मिळेल.
करणं १२ जुलै पर्यंत कुंभ राशीत राहील्या नंतर शनि परत मकर राशीत प्रवेश करेल त्यामुळे धनु राशीच्या लोकांवर पुन्हा शनीची पकड असेल आणि मीन राशीच्या लोकांना १७ जानेवारी २०२३ पर्यंत साडेसाती पासून मुक्ती मिळेल. असं असलं तरी सुद्धा ज्या लोकांचा राशीवरती साडेसाती आहे. त्यांनी अगदी घाबरून जायचं काही कारण नाही.
करणं साडेसाती ही नेहमी वाईटच असते असं नाही. साडेसाती मध्ये आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळतात अस म्हटलं जातं. मग चांगली कर्म असेल तर चांगल्या कर्माची चांगली फळ याच काळात मिळू शकतात. म्हणूनच तर आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला नेहमी चांगले सांगितली गेली आहे चांगल्या कर्माची फळे ही नेहमी चांगली असतात तर वाईट कर्माची फळे ही नेहमी वाईटच असतात.
म्हणून आपली कर्मा आपणं नेहमी सावधगिरी ने करायला हवी. कारण त्याची फळं आपल्याला कधी ना कधी मिळतात. साडेसाती मध्ये धैर्य ठेवून नेहमी चांगली कामं करत राहावे. हनुमानाची उपासना सुद्धा साडेसाती मध्ये नक्की करावी. त्याचबरोबर दानधर्म अन्नदान इत्यादी पुण्याची कामसुद्धा करावीत म्हणजे आपली साडेसाती नक्कीच सुखद होईल.