नमस्कार मंडळी
आज सूर्योदयाच्या वेळी चंद्र उत्तराभाद्रपद नक्षत्रात आणि मीन राशीत असून . बुध सध्या कुंभ राशीत गुरुसोबत आहे. उर्वरित ग्रहांची स्थिती देखील सारखीच आहे. मीन राशीमध्ये आज सूर्य आणि चंद्र एकत्र असणार आहे . मीन आणि तूळ राशीच्या लोकांना आज चंद्र लाभ मिळणार आहे . मेष आणि मकर राशीच्या लोकांना नोकरीत यश मिळणार असून . मीन आणि कर्क राशीचे लोक राजकारणात यशस्वी होणार आहे .चला आता जाणून घेऊया आज पासूनचे सविस्तर राशीभविष्य…
मेष – आज चांगली बातमी मिळणार आहे . आज आवश्यक काम आधी करा, यश मिळेल. वास्तव लक्षात घेऊन आर्थिक योजना करण्याचे प्रयत्न करा . मित्रांसोबत काही गोष्टी शेअर करू शकता . आज काही अज्ञात भीती तुमच्या मनात असणार आहे . परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना अचानक फायदा होणार आहे . सहलीला जाण्याची तयारी करत असाल, तर तुम्हाला ते काही काळ पुढे ढकलावे लागेल. नात्यात काही मतभेद होतील . संध्याकाळी एखाद्या जुन्या मित्राला भेटून तुम्हाला आनंद होणार आहे .
वृषभ – दिवसभर तुमचे शरीर आणि मन आनंदी व प्रफुल्लित असणार आहे . व्यवसायात नवीन करार होणार आहे . यशासाठी सर्व जोखीम पत्करण्याची तयारी तेव्हावी लागेल . लव्ह लाईफमध्ये लोकांना काही चांगली बातमी मिळणार आहे . तुम्हाला तुमच्या पालकांना दिलेली वचने पूर्ण करावी लागतील, अन्यथा ते तुमच्यावर रागावतील. कुटुंबातील सदस्याच्या विवाहातील अडथळे दूर होणार आहे . प्रिय व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवाल मिळेल
मिथुन – आजपासून पुढे दिवस या राशीच्या लोकांसाठी व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर असणार आहे . प्रवास करण्याची संधी देखील मिळू शकते, जी तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे . जोडीदाराला खरेदीसाठी कुठेतरी घेऊन जाण्याचे ठरेल विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षित लाभ मिळेल . काम पूर्ण झाल्यामुळे आनंदी असणार आहे . भविष्यासाठी उत्पन्नातून काही पैसे वाचवू शकता.
कर्क राशी – आजचा दिवस थोडा कठीण जाईल. कार्यक्षेत्रात तुमच्यासमोर संभ्रमाची स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहे . विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त राहावे लागणार आहे . आई-वडिलांना देव दर्शनाच्या प्रवासाला घेऊन जाणार आहे . कामाच्या विस्तारासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागणार आहे . पैशाच्या बाबतीत यश मिळणार आहे . चांगल्या वागण्याने लोकांना आकर्षित करू शकता .
सिंह राशी – आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्ततेचा असेल. कुटुंबातील लोकांशी वाद होऊ होण्याची शक्यता आहे , ज्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर रागवणार आहे . दिर्घकाळापासून राजकारणात सक्रिय असणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. अनेक बाबतीत नशिबाची साथ मिळणार आहे . स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करत राहा. कमाईचे नवीन मार्ग सुरु होणार आहे . आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. अविवाहितांना विवाह योग असणार आहे .
कन्या राशी – महिन्याचा पहिल्या दिवसापासून तुमच्यासाठी चांगला जाणार आहे . कोणतीही नवीन कल्पना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरेल. मालमत्तेची खरेदी आणि विक्री होणार आहे आर्थिकदृष्ट्या मजबूत असाल. मात्र, शत्रू त्रास देण्याची शक्यकयता आहे , त्याचापासून तुम्हाला सावध राहावे लागेल. नोकरी करणाऱ्यांच्या जबाबदाऱ्या वाढतील. कुटुंबातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल.
तूळ राशी – भूतकाळातील एखाद्या चुकीबद्दल पश्चाताप होणार आहे , यासाठी तुम्ही माफी देखील मागू शकता. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचे स्वागत होणार आहे आणि अधिकारीही तुमच्यावर खुश असणार आहे . नोकरीत यश मिळेल. मुले व्यवसायात पूर्ण सहकार्य करणार आहे . भांडवलाच्या योग्य गुंतवणुकीची काळजी असणार आहे . कलाकारांसाठी दिवस विशेष चांगला असणारा आहे .
वृश्चिक राशी – आज मित्रांशी महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे . रखडलेल्या कामात प्रगती भेटणार आहे . व्यावसायिक कामात अत्यंत सावधगिरी बाळगावी. गुंतवणुकीसाठी दिवस शुभ असणार आहे . व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस निराशाजनक असणार आहे . नोकरीसाठी तुम्हाला भटकंती करावी लागेल. मुलांकडून काही आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. भविष्याचा विचार कराल, ज्यात जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे .
धनु राशी – आज एकामागून एक तुमच्या इच्छा पूर्ण होताना दिसणार आहे , ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कुटुंबातील वादविवाद संपतील. बोलताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे . शांत चित्ताने काम केल्यास खूप फायदा होईल. लेखकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे . कामाशी संबंधित गोष्टींमध्ये हळूहळू प्रगती दिसून येणार आहे . व्यवसायाशी संबंधित कोणतीही मोठी समस्या सुटू शकते.
मकर राशी – आज अधिक खर्च होऊ शकतो. कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी तुम्हाला उसने पैसेही घ्यावे लागणार आहे . विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे . परदेशात स्थायिक होऊ इच्छिणाऱ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे . अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकणार आहे . स्वतःच्या ताकदीवर लक्ष केंद्रित करा. रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना मोठे यश मिळू शकते. आहाराची विशेष काळजी घ्या.
कुंभ राशी – या राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. नोकरीत बदली होऊ शकते. कुटुंबात सुरू असलेला वाद संवादातून संपवावा लागेल, अन्यथा ते नाराज राहतील. वर्तमानात जगण्याचा प्रयत्न कराल. सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांचे मत महत्त्वाचे ठरेल. व्यापार क्षेत्रात लाभ होईल. केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठीच खरेदी करणार आहे .
मीन राशी – आज तुमची मेहनत फळाला येणार आहे . नवीन सौदे फायदेशीर ठरणार आहे . महत्त्वाच्या व्यवहारात काळजी घ्यावी लागणार आहे . एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे . जोडीदाराला खरेदीसाठी घेऊन जाऊ शकता.