Marathi Manus

Stay Up to Date With Us

अक्षय तृतीयेला महासंयोग आल्यामुळे या ७ राशी होणार मालामाल

नमस्कार मंडळी

अक्षय तृतीय दर वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते, या वर्षी अक्षय तृतीय मंगळवारी ३ मे ला अली आहे, हि तिथी अतिशय शुभ मानली जाते, या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी खरेदी करण्या बरोबरच दान धर्म करणे सुद्धा महत्वाचे मानले आहे.

तसेच या दिवशी केलेले दान हे अक्षय पुण्य देते, कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस चांगला मानला जातो. विवाहासारखी मंगल कार्ये सुद्धा बिना मुहूर्त पाहता तुम्ही करू शकता. या शिवाय या दिवशी तुम्ही राशीनुसार दान सुद्धा करू शकता.त्याचे सुद्धा तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळते. अक्षय तृतीय हि हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ आहे.

या वेळी अक्षय तृतीयेला दोन प्रमुख ग्रह तुमच्या राशींमध्ये आणि दोन ग्रह त्यांच्या उच्च राशीमध्ये उपस्थित राहतील. असा योगायोग ५० वर्षांनंतर घडणार आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना हा संयोग शुभ आहे आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

३ मे अक्षय तृतीयेच्या दिवशी चंद्र त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे वृषभ राशीमध्ये असेल , सुख आणि वैभव प्रदान करणारा शुक्र मीन राशीमध्ये असेल. शिवाय शनी देव हे स्वतःच्या कुंभ राशीमध्ये विराजमान असतील.आणि नेहमी शुभ फळ देणारे देवगुरु गुरु बृहस्पती मीन राशीमध्ये विराजमान असतील.

ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीयेच्या दिवशी हे ४ मोठे ग्रह अनुकूल स्थितीमध्ये असल्यामुळे या दिवसाचे महत्व वाढले आहे. आणि हा योगायोग मेष राशीच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. मेष राशीच्या लोकांनी ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी लाल रंगाच्या कपड्यामध्ये लाडू दान करावेत.

त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. वृषभ राशीच्या लोकांनी कलश भरून जल दान करावे. असे मानले जाते कि असे केल्याने शुक्र दोषाचा प्रभाव कमी होतो आणि पैशाच्या त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. अक्षय तृतीयेला मिथुन राशीच्या लोकांनी मुगाची डाळ दान करावी असे केल्याने घरात सुख समृद्धी येईल आणि घरात अचानक धनाची आवक चांगली वाढेल.

कर्क राशीवर चंद्राचे राज्य आहे अशा स्थितीमध्ये या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदीचे मोती धारण करावे. त्यामुळे त्यांचा चंद्र मजबूत होईल आणि आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारेल. सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करावे आणि गुळाचे दान करावे त्यामुळे कार्यक्षेत्रात उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

त्यामुळे तुमची प्रगती होईल. कन्या राशीच्या लोकांनी धन प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेला पाचू हे रत्न धारण करावे आणि माता लक्ष्मीची पूजा करावी यामुळे पैशाची कमतरता राहणार नाही पण पाचू घालण्यापूर्वी योग्य ज्योतिषांचा सल्ला आवश्य घ्यावा. अक्षय तृतीयेच्या शुभ सणाला तुला राशीच्या लोकंही पांढरे वस्त्र धारण करावे.

त्याच बरोबर घरामध्ये पांढऱ्या रंगाच्या देवतेची मूर्ती बसवावी. वृश्चिक राशीच्या लोकांनी ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी प्रव धारण करावा त्याच्या प्रभावाने धन लाभाचे योग बनतील आणि आर्थिक समस्या दूर होतील. धनु राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेच्या दिवशी हळदीच्या गाठी पिवळ्या कपड्यात गुंडाळून पूजेच्या ठिकाणी ठेवाव्यात तसेच पिवळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात.

असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि धनाशी संबंधित समस्या दूर होतात मकर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी तिळाचे तेल भांड्यात घेऊन घराच्या पूर्व दिशेला ठेवावे. त्याचा त्यांना लाभ होईल. कुंभ राशीच्या लोकांनी काळे तीळ नारळ आणि लोखंडाचे दान करावे. त्याच बरोबर हा काळ त्यांना अनुकूल असेल.

परिस्थिती अनुकूल होईल. अक्षय तृतीयेच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी पिवळ्या कपड्यात पिवळी फुले बांधून घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवावीत. असे केल्याने सुख समृद्धी मिळेल.

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.