कणिक मळताना १ गोष्ट टाका , भरपूर पैसा येईल आणि शुभ मंगल घडेल, घरातली पीडा बाहेर पळून जाईल

नमस्कार मंडळी,

आजकालच्या ह्या कठीण परिस्थितीमुळे बऱ्याच लोकांना खूप काही सहन करावे लागते. खूप धडपड करावी लागते पैसे कमावण्यासाठी , प्रत्येक येणाऱ्या संकटांना सामोरे जाताना. तुमच्या जीवनामध्ये जर काही दुःख असेल किंवा घरामध्ये सारखे भांडणे होत असतील , घरामध्ये नेहमी पैशाची चणचण भासत असेल , तुमच्या तिजोरीमध्ये , पाकिटामध्ये पैसे नसतील , तुम्हाला मान सन्मान मिळत नसेल तर हा उपाय नक्की करा.

हा उपाय एकदम साधा सोपा आणि घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. कोणताही खर्च नाही. हा उपाय तुम्ही रोज सुद्धा करू शकतात. हा उपाय केल्यानंतर त्याचा प्रभाव प्रचंड आहे.जर हा उपाय तुम्हाला दररोज करणे शक्य नसेल तर सोमवारी , शुक्रवारी व बुधवारी , आठवड्याच्या ३ दिवशी हा उपाय जरूर करावा. हा उपाय केल्याने शुक्र मजबूत होतो. शुक्र हा ऐश्वर्य व सुखाचा कारक आहे , शुक्र मजबूत असेल तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख ऐश्वर्य मिळते .धनाचा लाभ होतो.

तसेच हा उपाय केल्याने चंद्र सुद्धा मजबूत बनतो. चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे. म्हणून जर चंद्र मजबूत असेल तर तुम्हाला मान सन्मान मिळेल.यश आणि कीर्ती मध्ये वाढ होईल, सगळे जण कौतुक करतील. समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल. कणिक हे सूर्याचे कारक आहे.म्हणून जर पिठामध्ये हि वस्तू टाकली तर आपला सूर्य हि मजबूत होईल व तुमचे तेज सूर्याप्रमाणे उजळून निघेल. एकदम साधा उपाय सहज रोज करण्यासारखा आहे. चला तर जाणून घेऊयात काय आणि कसा आहे हा उपाय

प्रत्येकाच्या घरामध्ये कणिक मळले जाते. हेच कणिक मळताना फक्त त्या मध्ये एक वस्तू टाकायची आहे. घराचा किचन त्या घराचा आत्मा असतो. हि एकमेव जागा अशी आहे जिथून सर्वाना अन्न मिळते आणि ऊर्जा सुद्धा मिळते. असे बोलले जाते कि जसे तुम्ही अन्न खाता तसे तुमचे विचार असतात. म्हणून स्त्रियांनी जेवण बनवताना नेहमी हसत मुखाने आणि प्रसन्न होऊन बनवायचे आहे. आनंदाने आणि देवाचे नामस्मरण करत करत जेवण बनवावे.

काही स्त्रिया जेवण बनवत असताना वाद विवाद करतात , भांडणे करतात , चीड चीड आदळआपट करतात , हे सर्व ते जेवणामध्ये येते आणि जो हे खातो त्याच्या मनात सुद्धा असेच नकारात्मक विचार चालू असतात. असे भरपूर वेळा घडते कि जेवण बनवताना जो विचार तुम्ही करता त्याच विषयी जेवताना बोलले जाते. तोच विषय घरामध्ये चालू असतो. घरामध्ये कणिक मळली जाते आणि ती मळून झाल्यानंतर बऱ्याच लोकांना माहित नसते कि सर्वात शेवटी त्या कणकेवर हाताच्या बोटांचे ठसे लावतात.

कणकेचा गोल गोळा का असाच नाही ठेवत ? कधी विचार केला आहे का ह्या गोष्टीचा.. याचे कारण कसे आहे कि ज्यावेळी पितृनसाठी किंवा मृत व्यक्तींसाठी पिंड बनवतो त्यावर कोणत्याची प्रकारचे चिन्ह नसते ते अगदी गोल केलेले असतात. ज्या कणकेवर असे कोणतेही ठसे नसतात ते पीठ आपण पिंडाला वापरतो. आणि त्या पिठलं पितृ किंवा वाईट शक्ती ग्रहण करतात. म्हणून स्त्रियांनी कणिक मळली कि त्यावर दोन चार बोटे लावावी.

असे केल्याने त्या कणकेवर पितृनचे किंवा वाईट शक्तीचे आकर्षण होत नाही किंवा त्यांचा अधिकार राहत नाही. म्हणून हि एक गोष्ट लक्षात ठेवा कि जेव्हा कणिक मळाल तेव्हा त्यावर तुमच्या बोटाचे ठसे लावायला विसरू नका आणि नंतरच त्याच्या पोळ्या बनवा. जेव्हा हे कणिक मळाल तेव्हा त्यामध्ये थोडेसे तूप आणि चिमूटभर साखर टाकावी . साखरेचे प्रमाण अगदी चिमूटभरच असावे फक्त उपाय करायचा आहे म्हणून टाकावी.

या उपायामुळे चंद्र व शुक्र मजबूत होऊन त्यांची सर्व शुभ फळे तुम्हाला मिळण्यास सुरुवात होते.पूर्ण जेवण बनवून झाल्यांनतर सर्वात पहिली पोळी जी बनेल ती गायीला खाऊ घालावी , दुसरी पोळी किंवा त्यातला थोडासा तुकडा कावळ्यांसाठी ठेवावा , यामुळे पितृ प्रसन्न होतील . घरामध्ये सर्वात शेवटची जी चपाती असते ती कुत्र्याला खायला दिली जाते असे करू नये त्याला अगोदरची कोणती पण पोळी द्यावी , असे केल्याने अदृश्य भीती दूर होते आणि शत्रू पीडा कमी होते.

हा उपाय करून तुम्ही घरामध्ये सुख ,समृद्धी आणि धन संपत्ती ची प्राप्ती करू शकता. हा उपाय नक्की करून पहा.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *