मिथुन राशी २०२२ मध्ये तुमच्या आयुष्यात या घटना घडणार म्हणजे घडणार..

नमस्कार मंडळी,

मिथुन राशीचे २०२२ सालचे वार्षिक राशिभविष्य , मिथुन हि द्विस्वभावी राशी आहे , तिचा स्वामी ग्रह बुध, मिथुन राशीच्या व्यक्ती अत्यंत बुद्धिमान असतात , स्वतंत्र विचार सरणीच्या असतात , प्रेमळ असतात , प्रेमात काही हि करायला त्या नेहमीच तयार असतात . प्रेमाच्या ताकतीवर अगदी रहस्यमय कार्य त्या पूर्ण करतात.

मात्र या लोकांचा एक दुर्गुण आहे . मिथुन राशीच्या व्यक्ती क्षणात क्रोधीत होतात तर क्षणात शांत होतात. त्यांना समझून घेणे कठीण असते. समाजात लोक त्यांना खूप पसंद करतात , लोकांना खुश कसे ठेवावे हे मिथुन राशीच्या लोकांना अचूक माहिती असते. मिथुन राशीचे लोक स्वभावाने रोमँटिक असतात , यांचा स्वामी ग्रह बुध असल्याने बदल यांच्या जीवनाचा एक प्रमुख नियम आहे.

ते एका ठिकाणी कधीच स्थिर राहत नाही. हजारजवाबी असतात , भाषा मधुर असते. कितीही वाईट परिस्तिथी असली तरी मार्ग काढण्याची क्षमता या मिथुन राशीमध्ये असते.

आर्थिक स्तिथी – वर्षाच्या सुरुवातीला धन लाभाचे प्रचंड योग येणार आहेत आणि म्हणूनच जास्त विचार करत न बसता तुम्ही कामावरती लक्ष केंद्रित करा. एप्रिल जुलै , ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या ४ महिन्यात तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक धन लाभ तुम्हाला नक्की होईल.संपूर्ण वर्ष भरात पैसा कधीच कमी पडणार नाही.

नोकरदारांना बढतीचे योग निर्माण होतील.मात्र या काळात जमीन मालमत्ता , संपत्ती आणि वाहन जे सुख आहे तुमच्या कडे तरी सुद्धा लालच करू नका , एखादे मोठे संकट येणार आहे. २०२२ वर्षात खर्च वाढेल पण तो शुभ आणि मंगल कार्यांवर असणार आहे. खर्च करताना उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ नक्की ठेवावा .

या वर्षी मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्तिथी हि उत्तम असणार आहे. करिअर किंवा शिक्षण – थोडीशी अस्थिरता २०२२ या वर्षी जाणवेल. कामे उशिराने होतील , कामे होणार कि नाही अशी शंका येऊ लागेल. थोडासा तणाव वाढेल, वाद विवाद होऊ शकतात. मात्र तुमच्या चांगल्या व्यवहारामुळे एखादया प्रभावशाली व्यक्तीने तुम्ही हि सर्व संकटे दूर करण्यात यश प्राप्त कराल.

या काळात तुमचे जे प्रति स्पर्धी आहेत ते तुम्हाला त्रास देऊ शकतात, एक मोठे आव्हान समोर उभे राहू शकते , तुमचे कष्ट कमी पडू देऊ नका. २०२२ या सलत जर तुम्ही नवीन काम सुरु करणार असाल तर नक्की करा. जुलै नंतर नवीन काम सुरु करण्यास खूप चांगले योग आहेत. जुलै ते डिसेंबर .

जे लोक नोकरदार आहेत , त्यांचे वरिष्ठांशी थोडे वाद विवाद होऊ शकतात मात्र तुमच्या नोकरी वर कोणत्याही प्रकारची गदा येणार नाही. ज्या विद्यार्थी वर्गाचे परदेशी जाण्याचे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होईल. ज्यांना नोकरी प्राप्त कार्याचे आहेत त्यांना नोकरीचे सुद्धा चांगले योग बनत आहेत , तुम्ही कष्टांमध्ये कमी पडू नका.

जे स्पर्धा परीक्षेमध्ये प्रयन्त करत आहेत अशा विद्यार्थी वर्गाला एप्रिल मध्ये यश प्राप्तीचे योग आहेत. थोडक्यात करिअर आणि शिक्षणाच्या बाबतीत वाद विवाद होणार नाही याकडे लक्ष ठेवा. कौटुंबिक – २०२२ मध्ये तुमचे जे कौटुंबिक जीवन आहे शुभ आणि प्रगतिकारक असेल.नवविवाहित जे दांपत्य आहेत त्यांना संतान प्राप्तीचे योग आहेत , समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल, मोठे एखादे पद मिळू शकते.

भावंडांबरोबर एखादे वाद विवाद होऊ शकतात. मात्र जे जुने वाद आहेत जर तुम्ही तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवले तर जुने वाद सुद्धा मिटून जातील. तुमच्या आई वडिलांच्या आरोग्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. मित्रांसोबत एखाद्या धार्मिक स्थळी यात्रा घडून येऊ शकते. घरामध्ये शुभ किंवा मंगल कार्य आयोजित होऊ शकतात.

आरोग्य – २०२२ हे साल आरोग्याच्या दृष्टीने ठीक ठाक आहे मात्र लठ्ठपणा , निद्रा नाश म्हणजे रात्री झोप न लागणे , पोटाचे आजार , अपचन या सर्व गोष्टी तुम्हाला संपूर्ण वर्षभर त्रास देऊ शकतात. एप्रिल पर्यंत दुखापतीचा योग संभवत आहे . त्यामुळे घाबरून न जात काळजी नक्की घ्या. एप्रिल पर्यंत स्वतःला थोडेसे जपायचे आहे.

रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा महत्वपूर्ण कामे देखील खराब होतील आणि मानसिक त्रास होईल तो वेगळाच. आता एक छोटासा महाउपाय बघुयात मिथुन राशीच्या लोकांसाठी – संपूर्ण वर्षभर तुम्ही यश प्राप्तीसाठी , फळ प्राप्तीसाठी भगवान श्री गणेशाचे पूजन करा.कमीत कमी प्रत्येक बुधवारी तरी आणि ओम गं गणपतेय नमः या मंत्राचा जर तुम्ही १०८ वेळा जाप केला

तर गणपती बाप्पांच्या कृपेने ज्या ज्या काही समस्या तुमच्या समोर निर्माण झाल्या आहेत त्यातून बाहेर पडायचा मार्ग नक्की सापडेल. सोबतच कोणत्याही बुधवारी तुम्ही पक्षांची एखादी जोडी पिंजऱ्यातून मुक्त करा. हा सुद्धा एक खूप चांगला उपाय आहे. सोबतच तुमच्या घरात ज्या श्रेष्ठ स्त्रिया आहेत मग वयाने असो किंवा नात्याने श्रेष्ठ असतील

अशा महिलांना तुमच्या घरातील हिरव्या रंगाची वस्त्रे किंवा हिरव्या रंगाचा बांगड्या किंवा दोन्ही वस्तू त्यांना भेट द्या. त्यामुळे सुद्धा तुमच्या कुंडलीमध्ये जो बुध ग्रह आहे जो स्वामी आहे तो मजबूत बनतो.मिथुन राशीमध्ये प्रचंड क्षमता आहे प्रगती करण्याची फक्त या काही गोष्टींकडे लक्ष देणे जरुरी आहे तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

तुमची राशी द्विस्वभावी आहे , तुमचे निर्णय क्षणात बदलत असतात किंवा तुमच्या तोंडून असे काही शब्द बाहेर पडतात कि समोरच्याची मने दुखावली जातात तर जिभेवर तुमचा ताबा असावा. तुमचा निर्णय हा अचूक आणि ठाम असावा. निर्णय पुन्हा पुन्हा बदलू नका , शेवटची गोष्ट म्हणजे जास्त विचार करण्यापूर्वी कामावर जास्त लक्ष द्या . या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही सर्व काही केले तर यश तुमचंच आहे.

वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका..धन्यवाद

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *