नमस्कार मंडळी,
मिथुन राशी कशी आहे , तिचा स्वभाव कसा आहे? मिथुन राशी हि द्विस्वभाव राशी आहे . द्विस्वभाव म्हणजे द्विधा मनःस्तिथी , कोणताही निर्णय घेताना हा घेऊ का तो घेऊ सतत विचार करत असतात. द्विस्वभाव म्हणजे कोणत्याही निर्णयावर ठाम राहत नाही म्हणजेच पर्यायी गोष्टी करायला खूप आवडतात.
मिथुन राशी एक गोष्ट करते तर तिचा पर्याय सुद्धा शोधून ठेवते. खूप सारे पर्याय शोधून ठेवतात आणि मग ते करताना मिथुन राशीची खूप धांदल उडते. मिथुन राशीच्या लोकांनी जास्त पर्याय ठेवू नये. मिथुन राशीचा द्विस्वभाव म्हणजे अजून एक गोष्ट कि त्यांच्या मनात एक असते आणि समोर वागताना दुसरच वागतात. जेव्हा तुम्ही मिथुन राशीच्या लोकांशी बोलता तेव्हा जाणवते कि ते बोलतात एक असतात आणि त्यांच्या मनात दुसरेच काही चालू असते.
मिथुन राशी हि सत्वगुणी राशी आहे. सत्वगुणी राशी म्हणजे यांना विद्या अभ्यासाची आवड असते. ज्ञानाची आवड असते ,पुस्तके वाचण्याची आवड असते. मिथुन राशी हि बुधाची राशी आहे. बुध हा बुद्धीचा आणि बोलण्याचा कारक आहे म्हणून मिथुन राशी हि बडबडी राशी आहे. ह्या राशीच्या लोकांना खूप जास्त बोलायला आवडते.
स्वतःजवळ असलेले ज्ञान द्यायला आवडते आणि घ्यायला सुद्धा आवडते आणि हे करता करता खूप जास्त बोलतात सुद्धा. कधी कधी असे होत कि समोरच्या व्यक्तीला ह्यांचे बोलणे आवडत नाही , वायफळ बडबड नसते , बुद्धिनेच बोलतात . ते खूप काही सांगतात आणि त्यामध्ये खूप बडबड करून जातात म्हणून मिथुन राशीच्या लोकांना हि समजायला हवे कि आपण बोलतो तो समोरचा व्यक्ती ऐकत आहे का त्याला आवडत आहे का ? त्यामुळे उगाच बडबड करू नये.
मिथुन राशी हि वायू तत्वाची राशी आहे. मिथुन राशीचे लोक खूप हुशार असतात . बुद्धिमान असतात , ह्या लोकांना हिशोब ठेवण्याची किंवा व्यवस्थित व्यवहार सांभाळण्याची आवड असते. म्हणून अकाउंट कार्यक्षेत्रात मिथुन राशीचे लोक जास्त असतात. बुधाचे किंवा वायुतत्वाचे बोलणे म्हणजे हजारजवाबी असतात. कोणत्याही गोष्टीचे उत्तर ह्या लोकांना पटकन सुचते किंवा कॉमेडी मध्ये सुद्धा जाऊ शकतात.
आपल्या गोष्टीवर लोक कसे हसतील किंवा कोणत्याही गोष्टीवर कसा विनोद करता येईल हे खूप छान जमते. बुधाची लोक कॉमेडी छान करतात , नाटक क्षेत्रात सुद्धा खूप उत्तम कामगिरी करू शकतात. मिथुन राशी हि खोडकर राशी आहे. मिथुन राशीच्या चिन्हावर ह्या लोकांमध्ये खूप बालिशपणा असतो. खट्याळ पणा सतत बडबड पणा करणे ह्या लोकांना जास्त आवडते. मिथुन राशीचा जास्त अंमल असतो तो म्हणजे फुफुसावर , श्वास नलिकेवर आणि मज्जा तंतू वर .
म्हणून मिथुन राशी बिघडली किंवा जर पाप ग्रहाने प्रवेश केला तर ह्यांना श्वासाचा त्रास होऊ शकतो किंवा मज्जा तंतूंचा आजार होऊ शकतात. मिथुन राशी हि बुद्धिमतेचा जास्त वापर करतात., कधीकधी जास्त विचार करते आणि म्हणून जास्त मेंदूवर जास्त ताण येतो. मिथुन राशीच्या लोकांनी जास्त विचार करणे सुद्धा टाळले पाहिजे. मिथुन राशीचे मंगळाच्या राशींसोबत पटत नाही. मंगल बुधाचा शत्रू आहे. मंगळाची राशी म्हणजे मेष आणि वृश्चिक राशी.
मेष आणि वृश्चिक राशींसोबत मिथुन राशीचे जास्त पटत नाही. कारण मिथुन राशीला खूप जास्त बडबड करायला आवडते , खूप विनोद करायला आवडतात आणि मंगळाच्या राशी म्हणजे एकदम कडक , धडाडी , सरळ बोलणाऱ्या असतात . त्यामुळे स्वभावात थोडा विसंगत पणा येतो आणि ह्यांचे पटत नाही. एकंदरीत मिथुन राशी विनोदी , बडबडी राशी आहे , थोड्याशा नकारात्मक गोष्टी सोडून दिल्या तर छान व्यक्ती महत्व बनू शकते.
वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका..धन्यवाद..