Marathi Manus

Stay Up to Date With Us

गरिबीचे दिवस संपले आज शनिवार पासून राजा सारखें जीवन जगतील या पाच राशींचे लोक

नमस्कार मंडळी,

शनीची महिमा अपरंपार आहे जेव्हा शनी देव प्रसन्न होतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील दुःख दूर होण्यास वेळ लागत नाही. जेव्हा शनीची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. तुमच्या जीवनात कितीही वाईट किंवा नकारात्मक काळ चालू असुद्या जेव्हा शनीची शुभ दृष्टी पडते तेव्हा परिस्तिथीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही.

आज शनिवार पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आज शनिवार पासून शनी महाराज या राशींवर विशेष प्रसन्न होणार आहेत.आता तुमच्या जीवनातील वाईट दिवस संपणार आहेत. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि शनीची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार असून तुमच्या जीवनात अतिशय काळाची सुरुवात होणार आहे. मागील काळ तुमच्या राशीसाठी बराच संघर्षमयी ठरला असेल , मागील काळात तुम्हाला अनेक दुःख अनेक यातना भोगाव्या लागल्या असतील.

अनेक संकटांचा सामना देखील करावा लागला असणार . पण आता परिस्तिथीमध्ये परिवर्तन घडून आल्याशिवाय राहणार नाही. आज मध्य रात्री नंतर पौष शुक्ल पक्ष उत्तरा भाद्रपदा नक्षत्र दिनांक ८ जानेवारी रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाच्या दिवस असून या ५ राशींवर शनी महाराज विशेष प्रसन्न होणार आहे.शनी हे कर्म फळाचे दाता असून ते न्यायाचे देवता मानले जातात.प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात.

आता तुम्हाला हि तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला प्राप्त होणार असून शनीचा आशीर्वाद लाभणार आहे.चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.-

मेष – या राशीवर शनी महाराज विशेष प्रसन्न होणार आहेत. शनीचा सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनात प्रगतीचे नवीन दिवस घेऊन येणार आहे.तुमच्या मनावर असणारा मानसिक ताण तणाव आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. कोर्ट कचेरीमध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत.मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधान कारक असेल

मिथुन – या राशीसाठी शनी अतिशय शुभ फळ देणार आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. जीवनातील वाईट काळ समाप्त होणार असून यशदायक काळाची सुरुवात होणार आहे.नाते संबंध मधुर बनतील.व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असेल. मनाला आनंदित करणाऱ्या आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या तुमच्या उत्साहात वाढ करणाऱ्या अनेक घटना तुमच्या जीवनात घडून येणार आहे.

सिंह – या राशीवर शनी महाराज विशेष प्रसन्न होणार आहे.मागील अनेक दिवसापासुन चालू असणारा मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे.वैवाहिक जीवनात सुखाची बहार येणार आहे.पती पत्नी मध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होतील.व्यापारात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येतील.नोकरी मध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात , मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.

कन्या – या राशीवर शनीची शुभ दृष्टी पडणार असून प्रत्येक दिवस तुमच्या साठी शुभ ठरण्याचे संकेत आहेत.अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि यातना यापासून सुटका होणार आहे. सांसारिक सुखात वाढ दिसून येईल.वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत.कार्यक्षेत्रात नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. करिअर मध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

वृश्चिक – या राशीवर शनीचा आशीर्वाद बरसणार आहे.व्यवसायात प्रगतीचे नवीन संकेत प्राप्त होतील.कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे.काळ सर्वच दृष्टीने अनुकूल असणार आहे.भोगविलासतेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्यात भरघोस यश प्राप्त होईल.मित्र परिवार आणि सहकाऱ्यांची चांगली मदत तुम्हाला लाभणार आहे.यशाचे मार्ग मोकळे होतील.

कुंभ – या राशीवर शनीची कृपा दृष्टी पडणार असून या काळात शनी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देणार आहे.नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल.जीवनात चालू असणारा नाकारात्मक काळ , नकारात्मक परिस्तिथी आता बदलणार आहे.परिवारात चालू असणारा वाद आणि अनेक समस्या आता मिटणार असून कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.या काळात कार्यक्षेत्रातून समाधानकारक वाढ दिसून येईल.

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.