नमस्कार मंडळी
मित्रांनो या चार लोकांना कधीही रिकाम्या हाताने माघारी पाठवू नये मित्रांनो आपण प्रत्येकजण कष्ट करतो मेहनत करतो आणि त्यातून पैशांची कमाई करतो मित्रांनो जे काही आपण कमवत असतो हा सर्व भाग ईश्वराने आपल्याला दिलेला असतो परमेश्वराची आपल्यावर कृपा असते आणि म्हणून या कमाईतील थोडासा भाग आपण दान करायला हवा
दानधर्माचे हिंदू धर्मामध्ये मोठं महत्त्व आहे दानधर्म केल्याने आपल्या जीवनातील अनेक कष्ट दूर होतात आपल्याला पुण्य लाभत मित्रांनो जर तुम्हाला हे चार लोक भेटले तर यांना कधीही रिकाम्या हाताने माघारी पाठवू नका तुम्हाला जितका शक्य होईल यथाशक्ती त्यांना दान करा तुमची जशी योग्यता आहे पात्रता आहे त्याप्रमाणे त्या लोकांना तुम्ही नक्की दान करा
मित्रांनो पहिले जे लोक आहेत ते आहेत भिकारी तुम्हाला दिसेल की अनेक जण भिक्षा मागतात तर या भिक्षा मागणार्यांना मित्रांनो कधीही नाराज करू नका त्यांचा अपमान करू नका लक्षात घ्या नर सेवा हीच नारायण सेवा असते लोकांची केलेली सेवा हीच खरी ईश्वर भक्ती मानली जाते
आणि म्हणून तुम्हाला जर रस्त्यामध्ये खराब एखादा भिकारी भेटला किंवा तुमच्या दारात जर एखादा भिकारी आला तर त्यांना दान अवश्य करा यथाशक्ती करा तुम्हाला जितके शक्य होईल तितके करा असं मानलं जातं की भिकाऱ्यांना केलेलं दान हे आपल्या धनामध्ये अनेक पटींनी वृद्धी करतात
आपल्या पैशांमध्ये अनेक पटींनी त्यामुळे वाढ होत असते आणि म्हणून आपला स्वतःचा फायदा होतच आहे मात्र नारायणाची सेवा सुद्धा यातून घडत आहे
मित्रांनो नंबर २ जे किन्नर लोक असतात तृतीयपंथी लोक असतात मित्रांनो या जगामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांच्यावर खरंतर खुप मोठा अन्याय आहे कारण या समाजामध्ये किन्नरांना समजून घेतलं जात नाही त्यांना सामावून घेतलं जात नाही मात्र लक्षात घ्यायला तृतीयपंथी यांवर बुध ग्रहाची विशिष्ट कृपा असते
खर तर बुध ग्रह नपुंसक त्याचे प्रतिक आहे या बुध ग्रहाचा प्रतीक म्हणजे हे तृतीयपंथी लोक असतात आणि म्हणून अशा लोकांचा अपमान चुकूनही करू नका कारण अशा लोकांनी जर श्राप दिला तर मित्रानो त्येचं खुप अनिष्ट अशा प्रकारचे परिणाम तुमच्या जीवनावर होऊ शकतात
मित्रांनो तुम्ही तृतीयपंथीयांना अगदी मनापासून मनोभावे जर तुम्ही या ना एखादी वस्तू दान दिली काही पैसे जर दान दिले तर मित्रांनो या लोकांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात हे लक्षात घ्या तृतीयपंथीयांनी दिलेल्या आशीर्वाद हे शीघ्र फलदायी असतात त्याचं फळ हे खूप लवकर मिळत
मित्रांनो व्यक्ती तिसरी म्हणजे दिव्यांग अलोक असे लोकीचे अपंग आहेत आजारी आहेत किंवा जे गरजू लोक आहेत ज्या ज्या वेळी एखादी गरजू व्यक्ती तुमच्या दारामधी येईल एखाद्या गोष्टीची मागणी करील तर मित्रांनो यथाशक्ती दान अवश्य करा तुमच्या पात्रतेनुसार आवश्यकता दिव्यांग लोकांना त्यांच्या दिव्यांग त्याचा अपंगत्वाचा कधीही हसी मजाक बनवू नका
मित्रांनो त्यांचा अपमान चुकूनही करू नका जर आपण अशा दिव्यांग लोकांना आजारी लोकांना गरजू लोकांना जर मदत केली तर त्यांना आपण दानधर्म केला तर मित्रांनो आपल्या कुंडलीतील शनी ग्रह आणि राहु ग्रह या शनी आणि राहू प्रकोप असतो तो कमी होतो आपल्याला माहीत असेल की आपण जर खूप कष्ट करत असाल
आणि जर यशप्राप्ती होत नसेल खूप मेहनत करूनही घरामध्ये पैसा टिकत नसेल तर मित्रांनो लक्षात घ्या शनी-राहू यांची अनिष्ट दृष्टीही आपल्यावरती पडू लागलेली आहे आणि म्हणून या शनी-राहू पासून बचाव करायचा असेल तर अशा लोकांना आपण नक्की मदत करायला हवी
मित्रांनो चौथीचे लोक आहेत ते आहेत वृद्ध जण असे लोक जे वयस्कर आहेत अशा लोकांना तर आपण आवर्जून मदत करा कारण यांचे आशीर्वाद हे खूप शुभ फलदायी असतात अशा लोक असे जे लोक असतात ते अगदी मनापासून आशीर्वाद देतात आणि म्हणूनच आपण अशा लोकांची ही सातत्याने मदत करायला हवी तर मित्रांनो असे हे चार लोक यांना यथाशक्ती मदत करा आणि आपलं भाग्य हे प्रबळ बनवा